सह्याद्री प्रतिष्ठान
गड-किल्यांसाठी आंदोलन, उपोषण म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान !
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारची वाट न पाहता लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाची कास म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान !
महाराष्ट्रातील २००किल्याचे संवर्धन व्हावे याकरिता २०० पत्रे सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने राज्य पुरातत्व विभागाला दिली.
महोदय,
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यतील गड किल्यांवर दुर्ग संवर्धन कार्य करत आहे. हे कार्य राज्य पुरातत्व विभाग केंद्र पुरातत्व विभाग वन विभाग यांच्या मार्गदर्शनाने करत असून आजवर ६०० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. तर देशातील १५०० किल्यांवर दुर्ग भ्रमंती मोहिमा राबल्या गेल्या आहेत.
आज महराष्ट्रातील अनेक किल्ले असंरक्षित स्मारक आहेत. या २०० पत्रात महाराष्टातील २१ जिल्ह्यातील किल्यांविषयी त्यांची डागडुजी व्हावी,ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे तर काही किल्ले हे पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून त्याच्या यादीत नोंद करून घ्यावेत. यांच्या संदर्भात आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानचा मूळ उद्देश हे अनेक दुर्लक्षित,असंरक्षित किल्ले आहेत त्यांचे संवर्धन होऊन त्या किल्याचे जतन व्हावे व पर्यटकांना किल्याला भेट देता यावी हा आहे.
अमरावती३,अहमद नगर १२,अकोला ३,उस्मानाबाद २,औरंगाबाद ८ ,कोल्हापूर १०,गोंदिया २, चन्द्रपूर २,ठाणे २८,नागपूर ३,नाशिक १५,पुणे १५,बुलढाणा ५,भंडारा २,मुंबई ७,रंतागिरी १८,रायगड ३१,सांगली ९,सातारा १६,सिंधुदुर्ग ११,व सोलापूर ४ अश्या २०० किल्यांचा समावेश आहे.याची प्रत संस्कृतिक मंत्री मा.विनोद तावडे यांनाहि देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रातील वैभव संपन्न गड किल्याची माहिती तसेच त्यांच्या संवर्धन या दृष्टीने पुढे यावे या साठी सह्याद्री प्रातिष्ठान कार्यरत आहे.