महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,48,839

मराठ्यांची साधन सामग्री आणि मोहिमेच्या डावपेचमधे झालेला बदल

By Discover Maharashtra Views: 1345 3 Min Read

मराठ्यांची साधन सामग्री आणि मोहिमेच्या डावपेचमधे झालेला बदल –

उत्तर हिंदुस्तानात आणि सगळ्या दक्षिणेत ह्या भागामधे मराठ्यांचा पूर्ण काबू होता आणि तिकडे वावरायला मराठा फौजा एकदम स्वातंत्र्य बनले होते. ह्या वेळेस मोगल अधिकारी हे अगतिक बनले होते आणि बचावात्मक धोरण स्वीकारण्याची पाळी मोगलांवर आली होती. मराठ्यांची सत्ता जशी जशी वाढत गेली त्याचप्रमाणे त्यांच्या डावपेचात बदल पडत गेला. शिवाजी राजा आणि संभाजी राजा ह्यांच्या काळातल्याप्रमाणे ते केवळ तोडा आणि पळा असे करणारे लुटारू अथवा निव्वळ ज्यांना काही संरक्षण नाही अशा व्यापाऱ्यांना आणि खेडुतांना लुटून मोगल   सैन्य येत आहे ह्याची चाहूल लागून नुसते पळ काढणारे नव्हते .( कसय की जो पर्यंत स्वहक्कासाठी माणूस गनिमांच्या वाकड्यात जाऊन राजकारण करून सत्ता वाढवतो तो कधीच पळ काढत नसतो उलट तो दुसऱ्या हालचालींची तय्यारी करत असतो .) ह्या सगळ्या परिस्थितीला हे शत्रू मग मराठ्यांना भुरटे चोर म्हणत कारण परकीयांच्या सत्तेला तुडवत भारताचं स्वराज्य स्थापन होताना ह्या गनिमांचा जीव वर खाली होत आलेला आहे .(मराठ्यांची साधन सामग्री)

तर ह्या उलट मनूचीने इ. स १७०४ मधे अवलोकन केल्याप्रमाणे म्हटले आहे – ” हे मराठ्यांचे पुढारी आणि त्यांच्या हाताखालचे सैनीक जे आता स्वातंत्र्याच्या मार्गावर अगदी हट्टी झाले आहेत हल्लीच्या दिवसात अतिशय आत्मविश्वासाने आपल्या हालचाली करतात. ह्याचे कारण ह्या मराठा फौजेने मोगल सेनापतींना जोरीस आणले आहे आणि त्यांच्यामधे दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या मराठ्यांकडे तोफखाना ,बंदुका , धनुष्ये आणि बाण ही हत्यारे असून , त्यांचे सर्व सामानसुमान आणि राहुट्या न्हेण्यासाठी त्यांच्याजवळ हत्ती आणि उंट देखील आहेत. थोडक्यात म्हणवायचे झाल्यास त्यांच्याकडे सामग्री ही मोगलांपेक्षा वाढत चालली आहे, इतकेच नव्हे तर मराठ्यांच्या राजाच्या हाताखाली सैन्य पण मोगल फौजे प्रमाणेच आहे .

देशाच्या अंतर्गत राज्यकारभारात औरंगजेबाच्या शासनयंत्रणेची जी दुरावस्था झालेली होती तिचे स्वरूप अगदी ठळकपणे दिसून येत आहे. बादशहाचे अधिकारी अकार्यक्षम आणि सुधारण्याच्या पलीकडे असे लाचखाऊ बनले होते. त्याचप्रमाणे बादशहाच्या आज्ञा न जुमानता स्थानिक सुभेदारांनी बादशहाने मना केलेल्या रयतेकडून वसूल केल्या जाणाऱ्या सर्व कराची , पुन्हा अंमलबजावणी सुरू केली होती. बादशहाच्या वृदापकाळात दूरदूरच्या प्रांतातील अधिकारी उघडउघड त्याची अवज्ञा लागले होते. ह्याचा परिणाम म्हणजे मराठ्यांमुळे बादशहाच्या राज्यकारभारातील कुशालता नाहीशी होत गेलेली आहे. शेवटी परिस्थिती हीच की मराठा सत्ता ह्यां मुळे एवढा बदल घडतो तो ही अगदी मुळापासून मग गनिमांची पुढची वाटचाल करणं लांब राहिलं .

Amit Rane

Leave a Comment