महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,503

आहिल्याघाट पुणतांबा

Views: 2611
2 Min Read

आहिल्याघाट पुणतांबा –

अहमदनगर जिल्ह्यातील राहता कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा म्हणेजेच चांगदेव महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीच्या काठावर पुणतांबा हे गाव आहे. हे गाव शालीवाहन काळात अस्तित्वात होते. पुण्यस्तंभ आणि तांबीलिंदनापूर ही गावे मिळुन पुणतांबा अस्तित्वात आले असे मानले जाते हया गावाला प्राचीन इतिहास खूप आहे हे गाव शालीवाहन काळात अस्तित्वात होते. पुण्यस्तंभ आणि तांबीलिंदनापूर ही गावे मिळुन पुणतांबा अस्तित्वात आले असे मानले जाते प्राचीन इतिहास खूप मोठा आहेच.(आहिल्याघाट)

पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्यांच्या मुलांचा आजार बरा होत नव्हता म्हणून पुरोहिताने सांगितल्याप्रमाणे यज्ञ केले त्यातुन एक देवी बाहेर आली त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुणतांबे पुण्यक्षेत्र आहेच पण याला छोटी काशी म्हटले जाते .येथल्या एक सरदार आहिल्यादेवी होळकर हयांच्या ओळखीचे होते.तेथील गोदावरी नदीकाठी घाट बांधून दिला.गोदावरी नदीकाठी बांधलेला हा घाट म्हणजे प्रयाग मंडलेश्वर घाटाप्रमाणंच घाट म्हणावा लागेल.गोदावरी नदी गावाच्या पश्चिमेला असून उत्तरेकडे वाहते या घाटाला २६ पाय-या आहेत.या घाटाला दोन बांजूनी गोलाकार बुरूज देखील बांधले आहेत .एका बुरूजाच्या वरच्या बाजूस पुरातन असे महादेवाचे मंदीर असून सूंदर अश्या काळया दगडाच्या पाय-या बांधलेल्या आहेत.पुणतांब्याचा हा घाट अद्यापही “आहिल्या घाट ” म्हणून आजही प्रसिद्ध आहे.

– शिंदे सरकार

Leave a Comment