किल्ले अकलूज –
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या तालुक्याच्या गावी भुईकोट किल्ला आहे. अकलूज हे नाव गावात असलेली ग्रामदेवता अकलाई देवीच्या नावावरून पडले. सद्यस्थितीत किल्ल्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शिवसृष्टी उभारताना किल्ल्याचे पडलेले बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार यांची डागडुजी करून बळकट केले. शिवसृष्टी पहाण्यासारखी आहे .शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या कालावधीत गाजवलेल्या शौर्याचे प्रसंग साकारले आहेत.
किल्ल्याची उभारणी १३ व्या शतकात यादवांच्या राजवटीत झाली होती. पुढे मोगलांच्या काळामध्ये अकलूज हे “अदसपूर” या नावाने ओळखले जात होते. इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी किल्ल्यात मुक्कामी होते.
टीम – पुढची मोहीम