महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,54,768

अक्षमाला | Akshmala

By Discover Maharashtra Views: 2627 2 Min Read

अक्षमाला –

Akshmala (अक्षमाला) one of the heavenly ornaments according to the vayu purana. In the seventh rasatala rules king bali adorned with an Akshmala.

“अक्षमाला” ही “रुद्राक्ष व कमलाक्ष” यांपासून तयार झालेली असते. जी शिवाशी संबंधित असते, तिस रुद्राक्ष माला म्हणतात तर जी विष्णूशी संबंधित असते तिस कमलाक्ष माला म्हणतात. रुद्राक्ष हे ज्या झाडाचे बी आहे, ते झाड हिमालयाच्या परिसरात असून शिवाचे वास्तव्य ही कैलासावर असल्याने, हिमालयात तयार होणाऱ्या रुद्राक्षाची माळ शिवास प्रिय असणं साहजिक आहे. कमलाक्ष अर्थातच कमलबीज याचा संबंध कमळाशी असल्याचे सहजरित्या लक्षात येते. कमळाचा जलाशी जेवढा घनिष्ठ संबंध आहे, तेवढाच विष्णू चा जल व कमळाशी आहे वा जोडला गेला आहे. कारण गुप्त काळापर्यंत विष्णू चा कमळाशी संबंध नव्हता, गुप्तोत्तर काळानंतर तो जोडला गेल्याचे दिसते. कदाचित यामुळे विष्णू स कमलाक्ष माला प्रिय असावी.

सर्व साधारणपणे शिल्पाकृतीत अक्षमाला ही हातामध्ये किंवा अंजलीमुद्रा असलेल्या हातामध्ये दाखवली जाते. अक्षमाला ही 50, 81,54 ,42 ,21,108 इ. मण्यांची असते. हिंदू अक्षमालेत 50 मण्यांची संख्या उचित मानली जात असून, 50 मण्यांचा संबंध अ ते क्ष वर्णाशी असतो. बौद्ध अक्षमाला सुद्धा 108 मण्यांची असते. अक्षमालेस अक्षसुत्र, जपमाला असेही म्हटले जाते. प्रामुख्याने ब्रम्हा, सरस्वती, ऋषी मूनी, ब्राम्हणी, भ्रृंगी, ब्रम्हचारिणी, योगिनी, इंद्र, सुर्य, शनी, विरुपाक्ष इ. च्या हाती दिसुन येते.अक्षमालेस अक्षसुत्र, जपमाला असेही म्हटले जाते. प्रामुख्याने ब्रम्हा, सरस्वती, ऋषी मूनी, ब्राम्हणी, भ्रृंगी, ब्रम्हचारिणी, योगिनी, इंद्र, सुर्य, शनी, विरुपाक्ष इ. च्या हाती दिसुन येते.

Shrimala K. G.

Leave a Comment