अंबादेवी | अबब अमरावती जवळच 30 हजार वर्षे जुनी पेंटींग्ज –
मित्रांनो आज आपण अमरावती मध्यप्रदेश सीमेवर असणाऱ्या भोरकप किंवा अंबादेवी येथे असलेल्या रॉक पेंटींग सेंटर ची माहिती घेणार आहोत, खर तर अमरावती वरून ६० कि.मी अंतरावर असणाऱ्या या महत्वपूर्ण ठिकाणाची फारसी कोनाला माहिती नाही.
अमरावती वरून चांदुर बाजार मार्गे मोर्शी जातांना चिखल सावंगी फाटा लागतो या फाट्यावरून आत गेल्यानंतर चिखल सावंगी गाव लागते आणखी पुढे याच मार्गाने गेल्यावर चिंचोली गवळी व नंतर अंबादेवी किंवा भोरकप लागते, साधारणपणे या ठिकाणी एक गुहा आहे तेथे अंबा देवीची मूर्ती आहे, भरपूर भाविक अंबा देवीच्या दर्शनाला मध्य प्रदेश येथून येतात, पण या पेंटींग्ज कडे कुणी फारसे फिरकत नाही.
पण याच जंगलात एक अद्भुत विश्व आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आदी मानवांनी काढलेले चित्र याला आधुनिक भाषेत रॉक पेंटींग असे म्हणतात, asi ने केलेल्या कार्बन डेटिंग नुसार ही चित्रे तब्बल 30 हजार वर्षे जुनी आहेत, यात अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या , विविध चित्रे आहेत ही सर्व चित्रे पहाडावरील मोठं मोठया दगडावर रंगवलेली असून अजूनही त्यातील बरीचशी चित्रे स्पष्ट ओडखु येतात पण काही मात्र काळाच्या ओघात अदृश्य झाली आहेत
यावरुन या भागात अनादी काळापासून आदिवामानवाच्या टोळयांचे मोठया प्रमाणात वास्तव्य होते, हे सिद्ध होते. या चित्रांवरुन इसविसनाच्या तीस हजार वषार्पूर्वी आपल्या पूर्वजांची जीवनशैली काय होती, याचा उलगडा होतोे. त्यांची जीवनपद्धती या चित्रांमधून आपल्याला कळू शकते. तसेच त्या काळातील वृक्ष, निसर्ग व प्राण्यांबाबतही माहिती मिळते. या ठिकाणी दोन प्रकारचे चित्र आढळतात. दगडामध्ये कोरलेली चित्रे तसेच लाल रंगाने रेखाटलेली चित्र येथे निदर्शनास पडतात. हा रंग जनावरांच्या चरबीपासून तयार करण्यात आला असावा, असा अंदाज पुरातत्व खात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे. उन्ह, वारा, पाउस सोसत एवढ्या वर्षांपासून अजूनही ही चित्रे अस्तित्वात आहेत. दुसºया प्रकारची चित्रे अनुकूचिदार दगडाने पहाडांमध्ये कोरलेली आहेत. कोरलेले चित्र हे रंगाने काढलेल्या चित्रांपेक्षा अधिक जुनी आहेत. ज्यावेळी रंगांचाही शोध लागायचा होता, त्यावेळी टोकदार दगडाने चित्र कोरण्यात आले असावेत. यामध्ये प्रामुख्याने वळू, सांड याची चित्रे आहेत. कोरलेल्या चित्रांची संख्या कमी आहे. तर रंगाने रेखाटलेल्या चित्रांची संख्या जास्त आहे. जसजशा या ठिकाणी टोळया वास्तव्यास होत्या. त्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे वेगवेगळया कालखंडातील आहेत.
या ठिकाणी असलेल्या चित्रांमध्ये आदिमानवांची त्या काळातील जीवनशैली रेखाटण्यात आली आहे. आदिमानवांनी आपला चित्रमय प्रवासच या ठिकाणी मांडला आहे. वळू, वाघ, म्हैस, मधमाशा, साप, सरडा, कासव यासह विविध प्राण्यांचे चित्र येथे आहे. वाघ हरिणाची शिकार करताना, जनावरे पळतानाची चित्रे आहेत. हजारो वर्षांपासून असल्यामुळे काही चित्रे अस्पष्ट आहेत. तर काही चित्रे कशाची आहेत, याचा उलगडा होत नाही. चित्र काढलेल्या रंग कणांची तपासणी करण्यात आली असून, इ. स. पूर्व पाच हजार किंवा त्याहीपूर्वी ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
या ठिकाणी असलेल्या रॉक पेटींग या दुर्मिळ आहेत. जगभरात क्वचितच ठिकाणी अशाप्रकारच्या पेटींग्ज पहायला मिळतात. मध्यप्रदेशातील भिमबेटका, फ्रान्समधील लॅकॉक्स, स्पेनमधील शावेद या ठिकाणी अशा पेटींग्ज पाहायला मिळतात. भिमबेटका जगप्रसिद्ध ठिकाण असून, दरवर्षी हजारो पर्यटक व अभ्यासक तेथे जातात. सातपुडा पहाडांवरील या पेंटींग्जबाबत मात्र अद्याप उजेडात आल्या नाहीत. पर्यटक व नागरिकांना याबाबत फारसी माहिती नाही.
एवढा प्राचिन खजाना अमरावती जिल्हयात आहे. मात्र, याबाबत जिल्हयातीलच नागरिक अनभिज्ञ आहे. भिमबेटका एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हजारोंना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. त्याच धर्तीवर सातपुडा पर्वतरावरील या रॉक पेटींगही जागतिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येवू शकते. त्याकरिता गरज आहे या रॉक पेटींग जगात पोहोचविण्याची.(संदर्भ:- विवेक चांदूरकर)
खर तर आपल्या इतक्या जवळ इतकं सुंदर अस विश्व असतांना आपण बाहेर कुठेतरी फिरायला आणि माहिती काढायला जातो पण आपल्या घरात असलेला हा ऐतिहासिक वारसा मात्र दुर्लक्षित आहे खर आहे ते म्हणतात न जिथं पिकत तिथं विकल्या जात नाही.
शिवा काळे
प्रतीक पाथरे