महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,300

पानिपतावर देह ठेवणारे शिलेदार आनंदराव होळकर

Views: 1604
2 Min Read

पानिपतावर देह ठेवणारे शिलेदार आनंदराव होळकर –

१४ जानेवारी १७६१ रोजी अफगाणिस्तान चा बादशाह अहमदशाह अब्दाली बरोबर मराठ्यांचे घणघोर युध्द झाले या युध्दाची चिकित्सा अनेक साधनातुन करण्यात आलेली असुन युध्दात कामी आलेल्या शिलेदारांची माहिती कमी प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे.(आनंदराव होळकर)

पानिपत युध्दात मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या विश्वासराव ,सदाशिवराव पेशव्यांसोबत खांद्याला खांदा लावुन लढणारे भीष्मपराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या अनेक मात्तबर शिलेदारांनी या युध्दात देह ठेवलेला असुन सेनापती संताजी वाघराजे बरोबर आनंदरावहोळकर यांना ही लढता लढता पानिपतावर वीरमरण आल्याची नोंद त्यांच्या घराण्यांच्या वंशावळीत नुकतीच सापडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या कांबी गावात जहागीरदार होळकर राहतात हे होळकर इंदौरच्या “पंचभैय्या कमेटीतील”असुन सुभेदार मल्हारराव यांनी आपल्या कुटुंबाच्या धार्मिक बाबीकरिता पंचभैय्या कमिटी नियुक्त केली होती त्या पंचभैय्या कमिटीतील आनंदराव हे पानिपत युध्दात मल्हारराव होळकर यांचेसमवेत होते त्यांना युध्दात वीरमरण आल्याने त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र माधवराव होळकर यांना महुजवळचे सिंदोडा आणि उमरिया गावाचा सरंजाम दिला होता.

शिलेदार आनंदराव होळकर यांचे पुत्र माधवराव होळकर यांच्या घराण्यातील भगवंतराव होळकर यांना “कांबी”गावी ३०० एकर जमीन मिळालेली असुन त्यांना कांबीचे जहागीरदार तसेच दुमालदार म्हणतात द्वितीय तुकोजीराव होळकर यांनी पंचभैय्या शिलेदार माधवराव भगवंतराव यांना वाफगाव ता राजगुरुनगर च्या बदल्यात उमरिया गाव अदलाबदल करुन दिल्याची सनद उपलब्ध असुन सध्या जहागीरदार सुरेशजी होळकर  कांबी येथे वास्तव्यास असुन उर्वरित परिवार इंदुरात स्थायिक आहेत.

वा.सी.बेंद्रे यांच्या महाराष्ट्र इतिहासाची साधने पुस्तकात तसेच होळकर शाहीचा इतिहास तसेच त्यांच्या कडील कागदपत्रातुन शिलेदार आनंदराव होळकर,जहागीरदार माधवराव होळकर, भगवंतराव होळकर, विश्वासराव होळकर यांचा उल्लेख सापडतो.

श्रीमंत सुरेशराव होळकर यांचेकडे बढवाणीचे महाराज उमेदसिंह,द्वितीय तुकोजीराव होळकर यांचे अनेक पत्रासह घराण्यांचे दुर्मिळ कागदपत्रे तसेच सनद आणि जन्मपत्रिका आहेत.

श्री.रामभाऊ लांडे
अभ्यासक होळकर रियासत अंबड

Leave a Comment