महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,735

येळावी येथील प्राचीन शिवमंदिर

By Discover Maharashtra Views: 4069 2 Min Read

येळावी येथील प्राचीन शिवमंदिर –

तासगाव तालुक्यातील येळावी हे गाव यादव पाटलांचे गाव. गावात मुख्य पांढरी वरती यादवांचे वास्तव्य आहे. काही वर्षांपूर्वी तिथे पांढऱ्या मातीचा भुईकोट असावा जो आता पूर्णतः जमीनदोस्त झालेला असून नवीन बांधकामे झाली आहेत. गावात सध्या सिद्धेश्वराला ग्रामदैवत मानले जाते. इथे मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून ते कोणत्या काळातील असावे हे सांगणाऱ्या कोणत्याच खुणा शिल्लक नाहीत. सोबतीला जवळच मारुतीचे मंदिर आहे. बकेश्वराच्या मंदिराचा देखील जीर्णोद्धार झाला आहे. काही वर्षांपूर्वी तेथे काही वीरगळ आणि नागशिल्पे मी स्वतः पाहिली आहेत. परंतु गावकऱ्यांनी जिर्णोद्धार करते वेळेस ती शिल्पे विसर्जित केल्याची माहिती मिळते.येळावी येथील प्राचीन शिवमंदिर.

गावात बस स्टँड शेजारी आतल्या बाजूस एक प्राचीन शिवमंदिर आहे. ते साधारण 700 ते 800 वर्ष जुने नक्कीच असावे. मंदिराचा फक्त चौथरा शिल्लक असून मुख्य गाभाऱ्यातील सुंदर असे शिवलिंग तेवढे कसेबसे वाचले आहे. मुस्लिम आक्रमणात हे मंदिर पाडले गेले असावे. मुख्य गाभाऱ्यात डाव्या बाजूस देवकोष्टकात भग्न झालेली सप्त मातृका पट्टी आणि उजव्या बाजूस घोड्यावर बसलेल्या विराचे शिल्पांकन आहे. सध्याचे विटांचे बांधकाम हे अलीकडे साधारण 50-60 वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराची शैली काही प्रमाणात कुची येथील मंदिराशी मिळतीजुळती आहे. मंदिरातील पूजेचा हक्क जंगम समाजाकडे आहे.
स्टँड जवळील मंदिर अंदाजे चालुक्य कालीन असेल.
त्या शेजारी एक सती मंदिर आहे. गावात मारुती मंदिर समोर एक दिवळी प्रकारची समाधी आहे त्यात पती पत्नी घोड्यावर आहेत व सती चा हात आहे. त्यांची ती स्मृती शिळा आहे.

गावात बस स्टँड शेजारी आतल्या बाजूस एक प्राचीन शिवमंदिर आहे. ते साधारण 700 ते 800 वर्ष जुने नक्कीच असावे. मंदिराचा फक्त चौथरा शिल्लक असून मुख्य गाभाऱ्यातील सुंदर असे शिवलिंग तेवढे कसेबसे वाचले आहे. मुस्लिम आक्रमणात हे मंदिर पाडले गेले असावे. मुख्य गाभाऱ्यात डाव्या बाजूस देवकोष्टकात भग्न झालेली सप्त मातृका पट्टी आणि उजव्या बाजूस घोड्यावर बसलेल्या विराचे शिल्पांकन आहे. सध्याचे विटांचे बांधकाम हे अलीकडे साधारण 50-60 वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराची शैली काही प्रमाणात कुची येथील मंदिराशी मिळतीजुळती आहे. मंदिरातील पूजेचा हक्क जंगम समाजाकडे आहे.

माहिती साभार – फेसबुक काका

Leave a Comment