महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,77,078

प्राचीन शिवमंदिर, बिलवाडी

Views: 1318
1 Min Read

प्राचीन शिवमंदिर, बिलवाडी –

नाशिक जिल्ह्यातील कळवण पासून पश्चिमेला साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर असलेलं बिलवाडी हे एक छोटंसं आदिवासी बहुल गाव. गावाची लोकसंख्या तशी जेमतेम. पण गावात छोटसं पण अतिशय देखणे असे प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची अजूनही येथील स्थानिक लोकांपलीकडे कोणलाच जास्त माहिती नाही. या मंदिराकडे प्रशासनाने व पुरातत्व खात्याने देखील दुर्लक्ष केल्यामुळे मंदिराचा काही भाग आज ढासळू लागला आहे. या गावाच्या शिवारात अनेक प्राचीन मंदिरे होती असे स्थानिक लोकं सांगतात. त्या मंदिरांचे अवशेष, चिरे, कलाकुसर असलेले दगड, शिल्पं, शिवलिंग या परिसरात ठिकठिकाणी झाडीत, गवतात, शेतांच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हे एकमेव मंदिर आजमितीस शिल्लक आहे.(प्राचीन शिवमंदिर, बिलवाडी)

अहिवंतगडाच्या मागच्या बाजूस असलेल्या बिलवाडी गावात आत शेतांमध्ये हे मंदिर आहे. मंदिरावर फार कलाकुसर दिसत नाही पण मंदिराचा अंतर्भाग निव्वळ अप्रतिम. छताच्या आतले नक्षीकाम अतिशय सुंदर आणि प्रमाणबद्ध आहे. शिल्पं मोजकीच पण देखणी आहेत. मंदिराजवळ अनेक वैशिष्ट्यपूर्ण वीरगळही आहेत.

मंदिर अंदाजे बाराव्या शतकाच्या सुमारासच बांधले असावे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग काही दिसत नाही. येथील लोकांच्या माहीती नुसार मंदिरात शिवलिंग नाही तरी देखील मंदिराची पूजा केली जाते. मंदिराचा निम्मा भाग हा जमिनीखाली असल्यामुळे पावसाळ्यात पाणी मंदिरात शिरून ते पाणी कमरेपर्यंत राहते. महाशिवरात्रीला पुजा होवून कार्यक्रम साजरे होतात यावेळेस आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जमा होतात.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment