पुरातन शिव मंदिर, कोथळी, मोताळा, बुलढाणा –
कोथळी येथे दोन पुरातन शिव मंदिर आहेत. यापैकी एक गावाच्या बाहेर विश्वगंगा नदीच्या तीरावर आहे तर दुसरे गावात आहे. आज आपण गावातील मंदिर बघुया. ह्या मंदिरावरील शिल्प पाहून हे मंदिर त्याकाळी विष्णूचे मंदिर असावे. असे दिसून येते. मात्र आज रोजी मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या चहूबाजूने यक्षाचे शिल्प कोरलेले दिसून येतील. हे यक्ष मंदिराच्या भार आपल्या खांद्यावर घेऊन आहेत. तसेच चहूबाजूने दगडावर सुरेख नक्षी कोरल्या गेली आहे.
ह्या शिवलिंगाला शाळिग्राम महादेव म्हणून ओळखतात ह्या शिवलिंगाच्या खाली विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाच्ये शिल्प आहे. सकाळी सूर्य उगवताना ह्या शिवलिंगावर सूर्यकिरणे पडतात त्यामुळे ह्या मंदिराची रचना किती वैशिष्ट्य पूर्ण पद्धतीने केलेली आहे हे बघून आपण भारावून जाल..!
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बारीक कोरीव मूर्ती व शिल्प कोरण्यात आलेली दिसून येतील येथे विष्णू देव व सुरसुंदरीचे शिल्प देवी देवतांची अनेक उल्लेखनीय शिल्प ह्या मंदिरात बघायला मिळतातं…!
माहित आणि फोटो – Stories by Atul