महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,966

अंधकासुरवध शिवमूर्ती

By Discover Maharashtra Views: 1250 1 Min Read

अंधकासुरवध शिवमूर्ती –

वेरुळ लेणी समूहातील ‘सीता की नहाणी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या २९ क्रमांकाच्या विशाल लेणीत अग्रमंडपात डाव्या बाजूस असणारे ‘अंधकासुरवध’ हे शिल्प अतिशय प्रत्ययकारी आहे.

खवळलेल्या, क्रोधाने दग्ध झालेल्या आठ हात असलेल्या शिवाने एक पाय मुडपून आपल्या हातातले खड्ग वेगाने अंधकासुराच्या छातीतून आरपार खुपसले आहे. शिवाच्या कपाळावरील आठ्या, खोबणीतून बाहेर आलेले बटबटीत डोळे, उमलू पाहणारा तिसरा डोळा व भयानकपणे विचकलेले दात शिवाला आलेला भयानक क्रोध दर्शवत आहेत. तर आपला अंतःकाळ आता जवळ आलेला आहे हे ओळखून अंधकासुर दोन्ही हात जोडून शिवाची क्षमा मागतोय.

शिवाच्या उजवीकडे खालच्या बाजूला पार्वती बसली असून पतीचा हा पराक्रम पाहून तिला वाटत असलेले कौतुक तिच्या चेहर्‍यावर दिसत आहे. शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. शिवाच्या दुसर्‍या हातांमधली तलवार, डोक्यावर धरलेले चाबूकरूपी गजचर्म ही आयुधे व डोक्यावरील जटामुकुट, गळ्यातील माणिमाला, केयुर, उदरबंध आदी अलंकार फारच सुंदर दाखवले आहे.

Rohan Gadekar

Leave a Comment