महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,820

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी धोरण व सतंर्कता

By Discover Maharashtra Views: 2644 6 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी धोरण व सतंर्कता!!

शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी ताब्यात इ.स. १६५५ – १६५६  च्या सुमारास घेतली तेव्हा रायगड ही स्वराज्यात आला व तेव्हा, शिवाजी महाराजांना आरमाराची बांधणी करणे आवश्यक वाटु लागले. कारण ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे शिवाजी महाराजांचे समीकरण अगदि स्पष्ट होते. पोर्तुगीज दप्तरातील नोंदी प्रमाणे शिवाजी महाराजांनी १६५९ मधे मराठ्यांच्या आरमाराची मुहुर्त मेढ रोवली. पण आरमार भक्कम कसे करावे शत्रूवर जबर कशी बसले या दृष्टीने शिवरायांनी आरमार उभारले होते. त्याचा प्रत्येय हा आरमाराच्या आज्ञापत्रात येतो, त्यातील प्रमुख बाबी खाली मांडणार आहोत.(छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी धोरण व सतंर्कता)

शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराब, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार, या प्रकारची जहाजे असल्याचे कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. तसेच चिटनीस म्हणजे चिटनीस बखर मधे मचवे, बाभोर, तिरकती व पाल यांची नोंद दिसते. गलबतांपेक्षा गुराबा मोठ्या प्रमाणात असत आणि पाल सर्वांत भारी असे. ही सर्व जहाजे उथळ बांबधीची म्हणजे लांब प्रमाणात अधिक रुंदीची असत. तीन डोलकाठ्यांचे गुराब सामांन्यपणे ३०० टनांचे असे व छोटे १५० टनांचे. जहाजांवर तोफा असत. या जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पठाणाच्या लांबी व नाळीची लांबी तुळईची सारखी असते. पठाणाच्या नाळीकडील भाग टोकदार असे. कल्याण भिवंडीची खाडी, पनवेल, कुलाबा, विजयदुर्ग, मालवण येथे जहाज बांधली जात. जहाज बांधनी साठी लागणारे सागवाण लाकुड हे कोकणात व विशेषतः वसईच्या आसपास चांगला मिळत असे. शिवाजी महाराजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाचांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे शिवाजी महाराजांचे आरमारी प्रमुख होते.

व्यापाराचे महत्व ओळखून मिठाच्या व्यापारा करीता शिवरायांनी *वासंकित* नौदल तयार ठेवले होते. मस्कत व मोचा  या अरबांच्या बंदराशी व्यापार करण्या करिता तीन डोलकाठ्यांची जहाजे शिवरायांनी ठेवली होती. युद्धकाळात किल्ले व खाड्या यांना मोक्याची ठिकाणे म्हणून महत्व असते हे ओळखून शिवरायांनी जुने किल्ले दुरुस्ती चे व नवे किल्ले बांधणी चे काम हाती घेतले व ते बांधले. किल्ले सिंधुदुर्ग हा शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्गाचा उत्तम नमुना आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, भोई, खारवी, पालदी, (पारदी) व इतर यांचा समावेश असे कारण हे लोक समुद्रात मासेमारि ही पिढीजात करत तसेच यांचे वास्तव हे समुद्र किनारा लगत असे, म्हणून यांना समुद्रातील माहीती तसेच चिकाटी पणा हा इतरांच्या पेक्षा जात होता, अनुभव जास्त असे.

शिवाजी महाराजांच्या आरमाराचे महत्व हे आज्ञापत्रात स्पष्ट पणे दिसते व ते उमटले ही आहे. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वदल त्याची पृथ्वी प्रजा आहे. ज्याजवळ आरमार त्याचाच समुद्र. या करिता आरमार अवस्यमेव करावे. आज्ञापत्राप्राणे जे आरमारास महत्वाचे आहे त्यातील काही महत्वाच्या नोंदी:- “गुराब बहुत थोर ना लहाण यैसा मध्यम रीतीने सजाव्या तैसीच गलबत करावी. थोर —— फरगात जे वारीयावीन प्रयोजनाचेच नव्हेत यैसे करावयाचे प्रयोजन नाही.”  असे म्हटले आहे.

शिवरायांच्या आरमारी आज्ञापत्रातील काही गोष्टी शिवरायांच्या आरमारी धोरणाचा भाग म्हणून त्याची नोंद घेण्या योग्य आहे. यातुन शिवाजी महाराजांची दुरदृष्टी, युद्धनिती, राज्यविस्तार या सर्व गोष्टी पहायला मिळतात. १} आरमारावर मर्द मानसे, भांडी (तोफा) जंबुरे, बंदुखा, दारुगोळा ठेवावा. होके (होकायंत्र) २} प्रत्येक सुभ्यास ५ गुराबा व १५ गलबते असावीत. ३} आरमारास तनखा मुलखातुन नेमून द्यावी. पैदास्तीवरी नेमनुक सहसा न करावी. पैदास्तिचे नेमनुकी मुळे सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहीली पाहिजेत.—- सरकारी काढावी. ४} आरमार सजीत सजीत सजावे. आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरुन गनिम राखावा. ५} जंजिरे यांचे सामान व दारु (तोफेची दारु) वरचेवर पाववीत जावी. ———- सर्वकाळ दर्यावदी गनिमाचे खबरीत राहुन गनिमाचे मुलुख मारावा. ६} दर्यात कौल सावकारी तरांडी यांची आमदार फत्ती करावी. कौली सावकरकीच्या वाटी जाऊ देऊ नये. ७} विदेशीची गैर कौली सावकारी तरांडी येता जाता आली तर त्यास सर्व साहित्य द्यावे, अल्पस्वल्प जकात घेऊन त्यास जाऊन द्यावे. युद्धप्रसंगी ” सर्वानी कस्त करुन येक जमावे.गनीम दमानी घालुन जुंझावे. वारीयाचे बले गनिम  दमानी न येता आपण दमानी पडलो, आपले गलबत वारीयावरी न चले यैसै जाहले, परी कैसेही आपले बल असो, तर्ही  गणिमास गाठ न गालता  गाठ तोडीत तोडीत जंजिरेच्या आश्रयास यावे. तरांडीयास व लोकास सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपणास राखून गनिम घ्यावा. ननिम दमानी पडोन हरीस आला, जेर जाला तरी एकास एक उडी न घालो नये. दुरुन चौकीर्द घेरुन भांडियाचा  (तोफांचा) मारा देत असावे.” गनिम दगाबात असेल तर त्याचे जहाज फोडुन टाकावे. आरमार स्थापन करुन शिवाजी महाराजांनी मुगलशाही, अदिलशाही, डच,पोर्तुगीज, टोपीकर, हबशी,  सिद्धी, फीरंगी या आरमारी बलाढ्य सत्ताना जबर बसवली होती.

अजुन काही गोष्टी शिवरायांची आरमारी युद्धनिती किती कला कौशल्य वान आहे हे दिसते. आरमारी छावनी दर्यात तुफान येण्या पुर्विच करावी. ती जर वर्षी एकाच जंजिरेखाली किंवा उघड्यावर करु नये. कारण गनिम बेभरवस्याचा असतो आणि दर्यावर्दी स्वभावतः उन्मत्त असतो. “आरमारास डोलकाठ्या, तक्ते, सोट, आदिकरुन थोर लाकुड असावे लागते ते आपल्ये राज्यात अरण्यामध्ये सागवाणी वृक्ष आहेत त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगी ने तोडुन  न्यावे. या विरहित जे लागेल ते घरमुखितन खरेदी करुन आनवीत जावे. आंबा, फसन हेही आरमाराच्या उपयोगीचे असल्यामुळे त्याचे जतन करावे. ती वाढविण्यास कष्ट पडतात, म्हणून त्याचे मालकास योग्य मोल देऊन घ्यावीत, कोणती ही सक्ती करु नये, त्याना दुख्ख होईल असे काही ही करु नये. हे पाहता शिवाजी महाराज हे किती प्रजा दक्ष आहेत हे लक्षात येते. काही आज्ञापत्रात व पत्रात शिवाजी महाराजांचे स्पष्ट पणे धोरण दिसते, रयतेच्या काडीला ही धक्का लावु नये वाळक्या पाचोळ्यास हात लावु नये.

संदर्भ:-
¤ सभासद बखर, ¤ चिटनीस बखर,
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
शिवाजी महाराजांचे आरमार-भा.कृ.आपटे,

संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे

Leave a Comment