विदर्भातील अष्टविनायक –
१ : चिंतामणी गणेश मंदिर, कळंब, यवतमाळ –
विदर्भातील अष्टविनायक पैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.
२ : शमी विघ्नेश गणपती, आदासा, नागपूर –
नागपूर पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे, श्री क्षेत्र आदासा. पुराणात उल्लेखित या क्षेत्राचे प्राचीन नाव म्हणजे ”अदोष क्षेत्र”. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आदासा गाव जवळ उंच पर्वतावर विघ्नहर्त्याचे प्राचीन मंदिर आहे. आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन असून या क्षेत्राची महिमा वामन पुराणात आढळून येते. येथील गणपतीची प्रतिमा ही प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापित केल्याचा उल्लेख वामन पुराणात दिसून येतो. येथील गणपती हा ”शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती” नावाने प्रसिद्ध आहे.
प्राचीन कथे नुसार राजा बळीने इंद्र पद प्राप्त करण्या साठी १०० यज्ञा चा संकल्प केला. या साठी राजा बळीने सत्कार्य आणि अटल भक्ती केली. राजा बळीच्या इंद्रपद प्राप्त करण्या साठी सुरु असलेल्या यज्ञाची माहिती जेव्हा देवलोकात पसरली तेवा सगळे देव चिंतीत झाले. राजा बळीच्या हे यज्ञा चा विध्वंस करण्या करिता भगवान विष्णू ने वामन अवतार घेतला व स्वताला शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णू ने वामन अवतारात याचा अदोष क्षेत्रात भगवान गणेशाची आराधना केली. पुढे याच भगवान गणेशाच्या कृपेने वामनाने राजा बळीचा विध्वंस केला. भगवान गणेशाने दिलेल्या वरदान मुळे वामनाने राजा बळीचा विधवंस केला म्हणून वामनाने या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापित केली. आज जी आपल्याला या ठिकाणी दिसते ती मूर्ती तीच आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. १२ फूट उंच आणि ७ फूट रुंद असा आकार या मूर्तीचा असून हे ठिकाण महाजागृत मानले जाते. शिवाय विदर्भ च्या अष्टविनायका मध्ये सुद्धा हे पवित्र ठिकाण गणले जाते.
Vidarbha Darshan