महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,083

अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे

By Discover Maharashtra Views: 3915 11 Min Read

अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे –

छत्रपती शिवाजी महाराज्यांनी राज्याभिषेखावेळी आपल्या अष्ट दिशांना आपल्या अष्टप्रधानमंडळाचा राज्याभिषेखविधित समावेश करून आपल्या अष्ट्प्रधान मंडळाला धार्मिक स्वरूप प्राप्त करून दिले.अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार.

पूर्व दिशेला प्रंतप्रधान मोरोपंत पिंगळे घृतपूर्ण सुवर्ण कलश घेऊन , पश्चिम दिशेस अमात्य रामचंद्र्पंत दधिपूर्ण ताम्रकलश घेऊन , दक्षिण दिशेस सेनापति हंबीरराव मोहिते दूग्धपूर्ण रौप्य कलश घेऊन , उत्तर दिशेस पंडितराव मोरेश्वर पंडित मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन अदबीने उभे होते.

आग्नेय दिशेला पंतसचिव अण्णाजिपंत छत्र धारण करून , नैऋत्य दिशेला सुमंत रामचंद्रपंत व्यंजन घेऊन , वायव्य दिशेला मंत्री दत्ताजिपंत मोर्चेल घेऊन , ईशान्य दिशेस न्यायाधीश निराजीपंत मोर्चेल घेऊन अदबीने उभे होते.

अश्याप्रकारे महाराज्यांच्या राज्याभिषेखावेळी महाराज्यांच्या अष्टबाजूस अष्टप्रधानमंडळ उभे होते. महाराज्यांच्या उजव्या बाजूस चिटनीस बाळाजी आवजी तर डाव्या बाजूस गणकलेखक चिमणाजि आवजी अदबीने उभे होते.

छत्रपती शिवाजी महाराज्यांनी राज्याभिषेखानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी जेष्ठ वद्य त्रयोदशीला आपल्या अष्टप्रधान मंडळासाठी कानूजाबता तयार केला. अष्टप्रधानांनची कर्तव्ये व आणि कार्यभार यांविषयीचा तपशील कानूजाबतामद्धे देण्यात आला आहे. कानूजाबता म्हणजे अष्टप्रधान मंडळासाठी छत्रपतींणी ठरवून दिलेली मार्गदर्शक तत्वे तसेच मंत्री व अधिकारी यांनी करावयाच्या कामांची नियमावली.

अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यास पदभार स्वीकारताना छत्रपतींकडून मानाची वस्त्रे, अलंकार तसेच काही वस्तु त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या सन्मानार्थ तसेच स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी छत्रपतींकडून देण्यात येत असत . या लेखात आपण अष्टप्रधानमंडळ यांचा कार्यभार व त्यांना देण्यात येणारी मानाची वस्त्रे यांची थोडक्यात माहिती करून घेऊ.

पंतप्रधान (पेशवा) :

पेशवे या फारसी शब्दाचा अर्थ प्रमुख असा होतो . अष्टप्रधान मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्रीपद . छत्रपतींच्या अनुपस्थित स्वराज्याच्या राज्यकारभारावर यांचेच नियंत्रण चालत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. स्वराज्याच्या लष्करी व मुल्की राज्यकारभारावर देखरेख ठेवणे . युद्ध मोहिमा आखणे व प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. आज्ञापत्रावर शिक्का उठवणे . पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ( शिरोभूषण ) ,चादर ( आसनावर घालण्याचे आच्छादन ) , पटका , किनखाप थान व महमुदी थान ( जरतारी वस्त्र )

अलंकार :- शिरपेच ,मोत्याची कंठी ,मोत्याचा तूरा व जेहगा ( पागोट्याला बांधण्याचा मर्दानी अलंकार ) , मोत्यांचा चौकडा ( कानातील आभूषण )

शस्त्रे :- ढाल , तलवार , कट्यार.

वस्तु :- जरीपटका , सोन्याच्या दांडीची चवरी व कलमदान , शिक्केकट्यार (पत्रव्यवहारासाठी ) ,चौघडा (नौबतीसाठी ),

प्राणी :- हत्ती , घोडा.

पंत अमात्य (मजुमदार) :

मजुमदार या फारसी शब्दाचा अर्थ वसुलाचा जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी राज्यातील सर्व हिशोब तपासणे . लष्करातील हिशोब तपासणे वेळप्रसंगी युद्ध मोहिमा आखणे व प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. हिशोबाचा अहवाल लिहून तो तपासून महाराज्यांनसमोर सादर करावा लागत असे. राज्याचे दफ्तर सुरक्षित ठेवणे. आजच्या संकल्पनेनुसार अर्थमंत्री. फडणीस व चिटनीस ह्या अधिकार्‍यांवर नियंत्रण ठेवणे तसेच संबंधीत खात्याच्या कागदपत्रांवर संमत्तीची निशाणी करणे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा

पंत सचिव (सुरनीस) :

सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे. पत्रांवर शूर-सुद असा शेरा मारण्यात येई. प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. महसुलाच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा.

मंत्री (वाकनीस) :

वाकनीस मूळ शब्द वाकीया नवीस . या फारसी शब्दाचा अर्थ बातमीपत्र पाठवणारा बातमीदार .महाराजांचा खाजगी कारभारा तसेच त्यांच्या संरक्षणाकडे लक्ष ठेवणे , त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, महाराज्यांविरुद्ध रचण्यात येणारे कट , गुप्तहेरांकरवी येणारी बातमी याची सत्यता पडताळून पाहणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करणे . खाजगी व कौटुंबिक आमंत्रणे व निमंत्रणे करण्याची कामे करावी लागत. राजपत्रांवर सही करणे . प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. मंत्र्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा

सेनापती (सरनौबत) :

स्वराज्याच्या संपूर्ण लष्करचा अधिकारी सर्व सैन्यावर व सरदारांवर सेनापतींची हुकूमत चालत असे. स्वराज्यातील सैन्याचे दोन प्रमुख विभाग होते घोडदळ व पायदळ. पायदळासाठी एक स्वतंत्र सेनापती होता पण त्यास अष्टप्रधान मंडळात स्थान न्हवते. सैन्यावर देखरेक ठेवणे, मोहिमांचे नियोजन करणे. परकीय शत्रू पासून स्वराज्याचे रक्षण करणे. मोहिमेचा व लष्कराच्या खर्चाचा हिशोब ठेवणे. सेनापतीला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , पटका , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच ,मोत्याची कंठी ,मोत्याचा तूरा व जेगा, मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार , कट्यार

वस्तु :- जरीपटका , सोन्याच्या दांडीची चवरी व कलमदान , शिक्केकट्यार ,चौघडा

प्राणी :- हत्ती , घोडा

पंत सुमंत (डबीर) :

स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री. युद्ध व शांततेच्या काळात परकीय सत्तांशी पत्रव्यवहार करणे व राजकीय संबंध प्रस्थपित करणे .परराज्यातून आलेल्या वकीलांचा सत्कार करणे त्यांची व्यवस्था करणे व त्यांच्याशी बोलणी करणे . परकीय देशांशी तह व राजकीय संधि करणे. प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा

न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) :

स्वराज्याचे सरन्यायाधीश . दिवाणी व फौजदारी वादातील खटले चालवून न्यायप्रवीष्ठ बाबींचा वीचारविनीमय करून पीडित व्यक्तीस किंवा रयतेस योग्य न्यायदान करणे. न्यायाच्या निकलपत्रांवर समंतीची सही करणे. न्यायाधीशना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा

पंडितराव (दानाध्यक्ष) :

धर्मखात्याचे प्रमुख . धार्मिक कार्यांची व्यवस्था पाहणे, धर्मशास्त्रानुसार निवाडे करणे, विद्वानाचा सत्कार करणे ,दानधर्म करणे , ग्रहशांति व अनुष्ठाने करणे .ब्रम्हणांना भोजन व दानधर्म करणे , धार्मिक सणाचे व उत्सवाचे नियोजन करणे . धर्मशास्त्रानुसार प्रायश्चित देणे व त्या संबंधित संमतपत्रांवर शिक्का उठवणे. पंडितरावना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , किनखाप थान व महमुदी थान

अलंकार :- शिरपेच , मोत्याची कंठी , मोत्याचा तूरा , मोत्यांचा चौकडा

वस्तु :- सोन्याच्या चवरी व चांदीचे दांडी असलेले कलमदान व शिक्केकट्यार

प्राणी :- हत्ती , घोडा

प्रतिनिधी :-

प्रतिनिधी म्हणजे एका व्यक्तीच्या वतीने दुसरी व्यक्ति म्हणजे त्याची प्रतिमाच .राज्याराम महाराज्यांनी जिंजीला जाण्याआधी या पदाचे निर्माण केले. राज्यकारभारातील अडीअडचणीच्या वेळप्रसंगी अंतरामुळे छत्रपतींशी विचारविनीमय किंवा सल्लामसलत करणे शक्य न्हवते . अशावेळी अधिकार्‍यानी छत्रपतींच्या ठिकाणी त्यांना समजून त्यांच्या हुकमाप्रमाणे राहून त्यांचे निर्णयानुसार वागावे.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , जामेवार , दुपेटा , किनखाप थान

अलंकार :- शिरपेच ,मोत्याची कंठी ,मोत्याचा तूरा व जेगा , मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार , कट्यार

वस्तु :- जरीपटका , सोन्याच्या दांडीची चवरी व कलमदान , शिक्केकट्यार ,चौघडा , पालखी व अब्दागिरी

प्राणी :- हत्ती , घोडा

हुकुमतपनाह :-

हा राजाराम महाराज्यांनी दिलेला किताब आहे. हुकुमत म्हणजे अधिकार किंवा सत्ता आणि पनाह म्हणजे आश्रय देणे किंवा समर्थन देणे. दोन फारसी शब्द एकत्र जोडून दिलेला हा किताब . हे पद अष्टप्रधानमंडlळात येत नाही. राज्याराम महाराज्यांनी जिंजीला जाण्याआधी या पदाचे निर्माण केले. यांची आज्ञा म्हणजे राज्याज्ञा.

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,चादर , जामेवार , दुपेटा , किनखाप थान

अलंकार :- शिरपेच ,मोत्याची कंठी ,मोत्याचा तूरा ,मोत्यांचा चौकडा

शस्त्रे :- ढाल , तलवार

वस्तु :- रुप्याच्या दांडीची चवरी व कलमदान , शिक्काकट्यार ,चौघडा

प्राणी :- हत्ती , घोडा

चिटनीस :-

हे पद अष्टप्रधानमंडlळात येत नाही परंतु छत्रपतींचे खाजगी सचिव असलेले हे पद. चिठ्ठी या मराठी शब्दास नवीस हा फारसी शब्द जोडून तयार होणार्‍या चिटनविस या शब्दाचे अपभ्रंशीत रूप .

मानाची वस्त्रे व वस्तु :-

वस्त्रे :- मंदिल ,झगा , विजार , दुपेटा , दुमजल

अलंकार :- शिरपेच ,मोत्याची कंठी ,मोत्यांचा चौकडा

वस्तु :- रुप्याच्या दांडीची चवरी व कलमदान , रुप्याची पेटी

प्राणी :- घोडा

स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ, अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे या विषयीच्या अधिक महितीसाठी लिंकवरील माहिती अभ्यासावी.

संदर्भ :- स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान :- अविनाश सोवनी.
शककर्ते शिवराय खंड 2 :- विजयराव देशमुख.
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा :- सदाशिव शिवदे.

श्री नागेश सावंत.

अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे,अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे,अष्टप्रधानमंडळाचा कार्यभार व मानाची वस्त्रे.

Leave a Comment