स्त्री-पाशात औरंगजेब –
मोघली रियासतीचा, रियासतीत उपजलेल्या बादशहांचा तसेच औरंगजेबाच्या चारित्र्यची पहाणी करता लक्षात येते की, औरंगजेब हा इतर होऊन गेलेल्या मोघली बादशहांच्या तुलनेत अतिशय जिद्दी, वैयक्तिक धैर्य, अविश्रांत मेहनती तर होताच मात्र त्याच बरोबर कट्टर धार्मिक वेड औरंगजेबाला होते. जहांगीर, शहाजहान हे जसे विलासी होते तसा औरंगजेब विलासी असल्याचा आढळुन येत नाही. मात्र राजदरबारातील स्रियांविषयी शारीरिक वासना हा औरंगजेबाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानायला हरकत नाही. मात्र हे गुण औरंगजेबाच्या अंगी अनुवंशीकतेने आले होते का ?(स्त्री-पाशात औरंगजेब)
खुर्रम् ऊर्फ शहाजहान म्हणजे औरंगजेबाचा पिता हा १५ वर्षाचा असताना त्याचा विवाह अर्जुमंदबानू (मुम्ताज) हिच्याशी ठरवला. तेव्हा ती शहाजहान पेक्षा १४ महिन्यांनी लहान होती. मुम्ताज नवऱ्याच्या सहवासात तब्बल १९ वर्षे होती. या १९ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात मुम्ताजला शहाजहान पासुन १४ वेळा संतती प्राप्ती झाली. सन ७ जून १६३१ रोजी १४ व्या मुलीला जन्म देताना मुम्ताजचा मृत्यू झाला. शहाजहानने मुम्ताजची आठवण म्हणून १६४३ रोजी ताजमहाल बांधुन घेतला. ताजमहलचे काम तब्बल १४ वर्षे चालु होते. (वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झालेली मुम्ताज पुढील वैवाहिक जिवनातील १९ वर्षे जगली त्या दारम्यान तीला १४ वेळा पुत्र प्राप्ती झाली व त्यातच तीचा मृत्यू झाला आणि म्हणुनच ताजमहाल प्रेमाची निशाणी ठरला. मुमताज महल च्या नावाने ताजमहल बांधला.)- मुसलमानी रियासत, खंड-२, प्रकरण -२५ . शहाजहानची मोठी मुलगी जहान-आरा ऊर्फ बेगम साहेब ही आपला भाऊ दाराच्या बाजुने होती. शहाजहानची ह्या मुलीवर वाईट दृष्टी होती. (मुसलमानी रियासत, खंड-२, पान.२१८)
“खाण तशीच माती” ह्या म्हणी प्रमाणे, आपल्या पित्याचे शहाजहानचे स्रियांविषयीचे व्यवहार पहाता औरंगजेब बापा पेक्षा सवाई उपजला.
औरंगजेबाच्या जिवनकार्यात चार पत्नी इतिहासास ठाऊक आहेत. जसे दिलरास बानू, नवाबबाई, औरंगाबादी महल, आणि उदेपुरी बेगम. मात्र त्या व्यतिरिक्त एक दोन न्हवे तर तब्बल नऊ रखेल म्हणून स्रिया औरंगजेबाने स्वतःच्या सेवे करीता जनानखान्यात ठेवल्या होत्या. निकोलाओ मनुची हा समकालीन इटालियन प्रवासी त्या स्रियांची नावे Storia Do Morgor या ग्रंथात देतो. बदामचश्म, नाजुकचश्म, मतलूब, सुखदेन, कुतूहल, शिंगार, प्यार, महान, रानादील या नऊ स्रियांचा संबंध औरंगजेबाच्या अंतःपुराशी होता असे मनुची म्हणतो. या विधानाला अनुमति दर्शविताना औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकात श्री. जादुनाथ सरकार म्हणतात की, औरंगजेबास बरिच मुले होती. वरील उल्लेखाप्रमाणे उदेपुरी बेगम ही औरंगजेबाच्या चार पत्नींपैकी एक होती. (काहींच्या मते ती दाराची पत्नी असून दाराच्या मृत्यूनंतर औरंगजेबाची रखेली म्हणून राहिली.) ती मूळची जॉर्जिया येथील होती. ती दारा शुकोह (औरंगजेबाचा मोठा भाऊ) च्या जनानखान्यात होती. असे विधान श्री. सेतु माधरावपगडी करतात. दाराशुकोहच्या हात्ये नंतर औरंगजेबाने तिला आपल्या जनानखान्यात आणून ठेवली. मात्र याच वेळी दाराची आणखी एक प्रेयसी होती. तिचे नाव बदासी रानदिल होते.
औरंगजेब बादशहा बदासी रानदिलच्या सौंदर्याची अभिलाषा ठेऊन तीला आपलेसे करण्याचे प्रयत्न करु लागला. तिच्या लावण्याचा सोबतच तीचे गुलाबी गाल व लांबसडक केस यांच्या औरंगजेब मोहात पडला . त्याने तीला देखील सांगितले असावे. मात्र या गोष्टींच्या निषेधार्थ व औरंगजेबापासुन सुटका मिळविण्यासाठी तिने अनोखा मार्ग निवडला. औरंगजेब व आपल्यातील दुवा असणाऱ्या गोष्टी (लांब सडक केस व गुलाबी गाल) मोडीत काढल्या. आपले लांब सडक केस व गुलाबी गाल आवडतात म्हणून तीने आपले केस कापले व चेहऱ्यावर चाकुने वार केले. चेहऱ्याला झालेल्या जखमांतुन येणाऱ्या रक्ताची पात्रे व कापलेले केस गोळा करुन औरंगजेबास पाठवून दिली. या घटनेने औरंगजेब चांगलाच थाऱ्यावर आला. त्याघटने पलिकडे औरंगजेब परत कधीच तीच्या वाट्याला गेला नाही. ह्या घटनेची नोंद मनुची च्या आत्मचरित्रात पहायला मिळते.
मध्य आशियातील बुखारा राज्याचे शिष्टमंडळ औरंगजेबास भेटण्यास आले होते. औरंगजेबास आणलेल्या भेट वस्तुंमद्धे तुर्कस्थानची जिक्सी नावाची दासी देखील औरंगजेबास तोहफा म्हणून पेश केली. या भेट वस्तुने औरंगजेब खुष होऊन त्याने तीला आपल्या हरम (जनानखान्यात) मद्ये ठेऊन घेतली. कालांतराने जिक्सी नावाच्या दासीला औरंगजेबापासुन पुत्र प्राप्ती झाली. ज्याचे नाव यलंगतोषखान म्हणून ठेवण्यात आले. याच यलंगतोषखानाचे नाव औरंगजेबाच्या कारकीर्दीत ठिक ठिकाणी वाचण्यास मिळते.
मोघली राजवटीत, दक्षिणेचा सुभेदार म्हणून निवड झाल्यावर औरंगजेबाने कुतुबशाही व आदिलशाही पुर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. जानेवारी १६५३ मद्ये औरंगजेब बुऱ्हानपूर येथे आला. तेथील सरदार खानजमान व त्याची बेगम (औरंगजेबाची मावशी- मुमताजची बहिण) यांच्या कडे मेजवानी करीता आला असता, औरंगजेबाची नजर तेथे हजर असलेल्या दासी हिराबाईवर पडली व स्वतःचा बादशाही रुबाब तो हरवुन बसला. हा उल्लेख मासिर- अल-उमरा या पुस्तकात आढळतो.(हिराबाईचे नामकरण औरंगजेबाने जैनाबादी महल म्हणून केले.) मासिरु-अल-उमरा ह्या ग्रंथात लेखक जैनाबादीबाईचे वर्णन करताना म्हणतो, ” जैनाबादी ही गायनात अद्वितीय व लावण्यात अप्रतिम होती. औरंगजेबाचे लक्ष आपल्याकडे आहे याचे तीला भान राहिले नाही. तिने अवखळपणे समोरच्या आंब्याच्या झाडावरचे फळ हात उंच करुन तोडले. तिला पहाताच औरंगजेब तीच्या प्रेमात पडला. (जैनाबादीच्या सौंदर्याची तारीफ औरंगजेबाच्या काही समकालीन कागद पत्रात आढळते.)
धर्माचरणाच्या बाबतीत औरंगजेब अत्यंत कट्टर व बांधील होता. मुस्लिम धर्म शास्त्रात सांगितल्या प्रमाणे दिवसात नमाज पडणे. मद्यपान न करणे हे नियम तो काटेकोरपणे आचरत होता. मात्र हिराबाईच्या नादात धर्माचरण तो पुर्णपणे विसरून गेला. कधीही मद्यपान न करणारा औरंगजेब स्रि-नादात मद्यपान करण्यास तयार झाला मात्र हिराबाईनेच हातातील प्याला काढुन घेतला. औरंगजेबाचे धर्माचरण भ्रष्ट होता होता टळले. हिराबाईचा मृत्यू लवकरच झाला.
मोघली रियासतीची ओळख, स्वराज्याचा शत्रू असा दिल्लीपती अलमगीर औरंगजेब अत्यंत साहसी, बुद्धिमान, स्वाभिमानी व कट्टर धर्मनिष्ट असुनही स्रि-वेडात गुरफाटून होता. आशिया खंडातील मणभर साम्राज्य हाती असुनही कणभर असलेल्या मात्र धर्मासोबत कर्मनिष्ट असणाऱ्या छत्रपती शिवरायांना रोखण्यास असमर्थ राहिला.
आपलाच,
अनिकेत अशोक पाटील.
मुरुड जंजिरा, रायगड
बा रायगड परिवार