महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,587

औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा

Views: 2125
2 Min Read

औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा –

औरंगजेब स्वराज्यात आला त्यावेळी त्याचा मूळ उद्देश छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारणे हाच होता. त्यासंबंधित एक नोंद आपणास ४ डिसेंबर १६८४ रोजीच्या औरंगजेबाच्या दरबाराच्या नोंदीत आढळून येते.(औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची इच्छा)

मराठ्यांच्या आश्रयास आलेला अकबराने आपले वकील मर्यम मुघलानी व मुहमद्द मुह्सीन यांना औरंगजेबाकडे पाठविले. औरंगजेबाने अकबराविषयी चौकशी केली. वकील मर्यम मुघलानी व मुहमद्द मुह्सीन यांनी मोगलांकडेच राहावे व त्यांचा खर्च शेख अब्दुल्ला याने करावा अशी आज्ञा झाली . संभाजी महाराजांच्या वकिलांनी औरंगजेबाशी तह करण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारी अर्ज केला. परतू औरंगजेबाने तो अर्ज बघितला नाही. औरंगजेबाने हुकुम जारी केला कि “ या काफरबच्चाशी ( संभाजी महाराज ) तह फक्त तलवारीनेच केला जाईल. “ वकिलांना परत जाण्याचे परवाने देण्याची आज्ञा दिली. मलिक शहा याने वकिलांना गाझीउद्दीनकडे घेऊन जावे. वाटेत त्यांना कोणीही अडथळा करू नये. वकिलांनी तेथून संभाजीकडे जावे.

आदिलशाही व कुतुबशाहीचा पाडाव केल्यानंतर औरंगजेबाचा एकमात्र उद्देश संभाजी महाराजांचा विनाश करणे हा होता. औरंगजेबाचा अधिकृत इतिहास मआसिर – ए –आलमगिरीतील १६८८ च्या एका नोंदीत संभाजी महाराजांविषयी असलेली औरंगजेबाच्या मनातील चीड व घृणा आणि उद्देश दिसून येतो. नोंद पुढीलप्रमाणे “ बंडखोर व अस्वच्छ काफिर संभाला धडा शिकवणे ( शिक्षा करणे ) .”

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :- औरंगजेबाच्या दरबाराचे अखबार :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ , पत्र क्र. ५२३

मआसिर – ए –आलमगिरी :- अनुवाद रोहित सहस्त्रबुद्धे

Leave a Comment