अवचट वाडा, केडगाव ता. दौंड
केडगावमध्ये(पुणे) जवळपास २५० ते ३०० वर्षापूर्वी चा वाडा कै नारायण विठ्ठल अवचट यांनी बांधलेला आहे.या वाड्यामधील सुरुवातीच्या दरवाजा बंद करण्याची जुनी पद्धतीची आगळ आजूनही पहावयास मिळते. यानंतरच्या दरवाज्याच्या बाहेरील बाजूला छोटी खिडकी असून यामध्ये बळद असून यामध्ये दोन गंज वैरण बसेल एवढी जागा आहे. वाड्यात गेल्यानंतर चौरस आकाराची मोकळी जागा वर छत नसल्याने ऊन, वारा, पाऊस याचा वाड्यामध्ये अनुभव घेता येतो त्यामुळे जुन्या पद्धतीचा दगडी बांधकामातील पाया तसेच सभोवताली लाकडी दरवाजे यावरील कोरलेली गणेशमूर्ती, वाड्यातील खिडक्या, देवघर जुन्या पद्धतीचे कोरीव काम पाहून नयनरम्य कला पहावयास मिळते.
अंतर्गत भिंतीवर बाहेरुन पहाताना खिडकी वाटते पण प्रत्यक्षात आतमध्ये वर माडीवर जाण्याचा दगडी बांधकामातील पायर्या पाहून अचंबित झालो या ठिकाणाहून वरच्या मजल्यावर जाता येते हे नवीन व्यक्तीला समजणारच नाही. जुन्या पद्धतीचे देवघर अप्रतिम असून त्यावरील कोरीव काम तसेच जुनी साधारण २५० वर्षापूर्वीची अष्टभूजा देवीचे चिञ पहावयास मिळाले. आतील स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला दोन कप्पे असणारी खिडकी आहे पण त्यामध्ये बळद असून पायर्या उतरुण आत गेल्यानंतर एवढे थंड वातावरण व मोठे दोन भुयार्यासारखी मोठी जागा पहावयास मिळते. पुर्वी या ठिकाणी धान्य कोठार, इतर महत्वाच्या वस्तू ठेवल्या जात असे. आ
जून एक बळद वाड्यामध्ये असून त्यामध्ये पुर्वी पैसा, सोन, धनसंपत्ती ठेवण्याची जागा आहे. वाडा बांधतानाच अंतर्गत गटार व्यवस्था यातून जाणारे पाणी हे शोषखड्ड्यामध्ये जाते यामुळे नक्की पाणी वाड्याबाहेर कुठे मुरते हेच कळत नाही. वाड्याच्या पाठीमागे जुनी विहिर आजूनही विहिरीला कायम पाणी आहे दुष्काळ परिस्थिती गावामध्ये असेल तरी या विहिराला कायम पाणी असते. अश्या प्रकारचे वाडे दुर्मिळ होत आहेत पण हा वाडा आजूनही चांगल्या स्थितीत संगोपन केलेले दिसून येते.
माहिती साभार – Sunil Gaikwad फेसबुक