महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,236

बा रायगड परिवार महाराष्ट्र

Views: 3443
8 Min Read

बा रायगड परिवार..

दुर्गसंवर्धन काळाची गरज

आपले किल्ले म्हणजे साक्षात या महाराष्ट्राचे आणि सह्याद्रीचे वैभव, मराठ्यांच्या अजरामर अशा इतिहासाची साक्ष म्हणजे आपले हे गडकोट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेले हे गडकोट आणि शौर्याचा इतिहास याच महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात दडलेला आहे.(बा रायगड परिवार)

निस्वार्थी सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या या गड किल्ल्यांचे संगोपन करणे हि आपली जबाबदारी आहे. किल्ल्याचे पडलॆले दरवाजे, ढासळलेले बुरुज तटबंदि हे आजही तेवढेच बोलके आहेत जेवढे ते सुरुवातीला होते..

पण दुर्भाग्य यावं ते आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनाच, भारतात बहुतेक किल्ले आहेत आणि ते देखील अगदी व्यवस्थित. परंतु ज्या लढाया आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनी अनुभवल्या आहेत त्या इतर कोणत्याच राष्ट्रातील किल्ल्यांनी अनुभवल्या नसतील.. त्यामुळेच तर शौर्याची गाथा अजरामर ठेवत आज मोडक्या स्थितीत आपले गडकोट आपल्याशी बोलत आहेत आणि आपले वास्तव्य टिकवित या जगात इतिहासाची साक्ष देत खंबीर उभे आहेत.

किल्ल्यांचे अजून दुर्दैव म्हणजे त्याचे पर्यटनस्थळ मध्ये झालेले रुपांतर.. बहुतेक पर्यटकांमुळे किल्ल्याचे पावित्र्य हे कुठेतरी विलुप्त होत चालले आहेत.. तो एक काळ होता ज्यावेळी किल्ल्याना महाराष्ट्राचे खरे वैभव मानत, महाराष्ट्राला लाभलेला सह्याद्री देखील याच वैभवाचे प्रतिक आहे. स्वराज्य मिळवण्यात प्रत्येक किल्ल्याची महत्वाची भूमिका होती हे तर आपणास ठाऊक असेलच…

कित्त्येक किल्ल्यांवर आपल्या महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचा इतिहास सुवर्ण शब्दात लिहिला गेला आहे आणि किल्ल्यांची आताची परिस्थिती पाहून कोणी म्हणेल का, कि येथे माझा शिवबा राहत होता??? .. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळे, सेनापती यांचे सुवर्णस्पर्श ह्या किल्ल्यांना लाभले आहेत..

त्यामुळेच आम्ही (बा रायगड परिवार, महाराष्ट्र) किल्ल्यांचे पावित्र्य आणि त्यांचे संवर्धन करण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत… त्याचे ढासळलेले बुरुज आणि भावी पिढीसाठी विलुप्त होणारा इतिहास जपण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.. आम्हाला माहित आहे या कामासाठी अधिक वेळ, मेहनत आणि पैसा अशा अनेक अडचणी समोर येत असतात.. परंतु अशा अडचणींना सामोरे जाऊन आम्ही सदैव नव्या जिद्दीने आणि मेहनतीने हे कार्य करीत असतो.

दुर्गसंवर्धनासाठी पुरातत्व विभागा त्याच्या मार्फत काम करतच आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात कित्येक दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गप्रेमी लोक संवर्नाधसाठी आपले योगदान देत आहेत त्याचें कौतुक.

बा रायगड परिवार आपणास निवेदन करीत आहोत कि तुम्ही देखील तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हास सहकार्य करावे आणि आमच्या समवेत गडकोट संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे .. कारण गडकोट हि आपली संपत्ती आहे आणि आपल्या संपत्तीचे संवर्धन करणे हि सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.

३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांबाबतच्या या कल्पना खरोखरच अद्वितीय म्हणाव्या लागतील त्यांनी आपल्या सर्वांचे भविष्य जाणलेच होते निदान आपण त्यांचा इतिहास तरी संगोपन करू. महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जतन केलेला हा ऐतिहासिक वारसा आता सांभाळण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे.

बा रायगड परिवारातर्फे खालील काही गडावर दुर्गसंवर्धन मोहीम राबवल्या जात आहेत.

●किल्ले सुधागड – रायगड●

नियोजित कामे –

१. सुधागड किल्ल्यावरील पडिक अवस्थेत असलेले शिव मंदिर नव्याने बांधणे.

२. सुधागड वरील महादरवाजाला भव्य लाकडी कवाड (द्वार) बसवणे.

३. पडलेले गजलक्ष्मी मंदिर ऊभे करणे.

४. तसेच तेथे श्रमदान मोहीम आयोजित करुन तटबंदि बुरजावरील, वास्तुवरील वाढलेली छोटी झुडप आणि गवत साफ करणे आणि त्याचें संगोपण करणे.

५. पाण्याची टाकि साफ करणे, दिशादर्शक, स्थलदर्शक फलक लावणे ईत्यादि.

●किल्ले सुमारगड – रत्नागिरी●

सुमारगड स्थानिकाच्या मदतिने काम चालू आहे.

तिथे देखील आपल्याला श्रमदान मोहीम करुन किल्ल्याचे संगोपन करणे आहे.

टाक्यांतील गाळ साफ करणे, गडावरील सर्व दुर्गावशेष जपणे.

●किल्ले असावा – पालघर●

किल्ले असावा येथे नुकतेच पार पडलेले श्रमदान, यात प्रामुख्याने मोठ्या टाकीत असणारे खराब पाणी काढून टाकण्यात आले, मुळातच ती टाकी विस्ताराने खूप मोठी असल्याने यातील गाळ आणि मोठे मोठे दगड काढण्यात आले.

किल्ल्याचा मुळ दरवाजा हा झाडा झुडपांमध्ये लपलेला असल्याने कित्येक वर्ष हा दरवाजा बंद होता आणि आता याच दरवाजाला मोकळा श्वास मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न आमच्या टीम ने केला आहे..
अजून देखील खूप श्रमदान आणि कार्य करणे गरजेचे आहे.

●किल्ले लिंगाणा – रायगड●

आता पर्यंत आपण फक्त लिंगाणा सर केला असेल, लिंगाण्याची ओळख फक्त आरोहणाचा सुळका ईतकिच राहिली आहे पण लिंगाणा हा एक किल्ला आहे आणि त्याचे दुर्गावशेष रायगड कडील बाजुस मध्यावर आहेत हेच कित्येक लोकानां माहित नाहि.

पण आता आम्ही लिंगाणा किल्ल्यावर असलेले सर्व दुर्गअवशेष जपुन ते सर्वानसमोर आनायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

●किल्ले कोळदुर्ग – सागंली●

सागंली जिल्ह्यात कोळदुर्ग नावाचा किल्ला आहे हे तेथील आसपासच्या लोकानाहि माहित नाहि. आम्हि जेव्हा दुर्ग अभ्यासक भगवान चिले सराच्या लेखाच्या माध्यमातुन या किल्ल्याची माहिती मिळवली आणि संवर्धनाचे काम चालू केले तेव्हा लोकानीं आम्हालाच वेड्यात काढले कि आरे हा कुठे किल्ला आहे ईथे काही नाहि हा तर फक्त माळरान आहे ई.

पण याच माळराणावर कोळदुर्ग किल्ला होता आहे आणि राहिल.

तिथे अजुनहि बरेच दुर्गअवशेष सापडतात. विरगळ शिल्पे शिलालेख असे बरेच अवशेष आहे.

ते परिवाराने एकत्र करुन जपण्याचा प्रयत्न केला आणि कोळदुर्ग किल्ल्याला त्याचे अस्तित्व जपण्यास मदत केली.
अजुन बरेच काम बाकि आहे.

याचबरोबर आता –

कावळ्यागड – वरधां

महिपतगड – रत्नागिरी

मुडागड – कोल्हापुर

अनघाई

ई. गडावर नव्याने काम चालु करत अहोत. बा रायगड परिवार हा अशाच जनमानसाच्या विस्मृतित जात असलेल्या गडावर काम करत आहे आणि त्या गडाना नवसंजिवनी देत आहे.

या सर्व कार्यासाठी वेळ, राबणारे हात आणि पैसा खुप महत्वाचा आहे.

श्रमदान मोहीम अंतर्गत सर्व सभासदांना देण्यात येणारा मोफत अल्पोहार आणि श्रमदानासाठी लागणार इतर खर्च परिवाराकडुन करण्यात येतो.

यासाठी आम्ही काही दुर्गभ्रमंती, साहसी मोहीम हाती घेऊन राहिलेले पैसे दुर्गसंवर्धन कार्यात वापरत आहोत.

आम्ही सांगू इच्छितो कि बा रायगड परिवार दुर्ग संवर्धन मोहिमे सोबत समाजकार्य सुद्धा राबवत असतो..

गड किल्ल्यांच्या नजदिक असलेल्या छोट्या छोट्या खेड्यात बरेच उपक्रम राबवले जातात जसे शैक्षणिक साहित्याचे वाटप, तेथील मुलांना शिक्षणात सहकार्य करणे इत्यादी…

1) पाच्छापुर – सुधागड शाळेला सायकल, शैक्षणिक साहित्य वाटप.

2) ठाणे येथील शाळेला आर्थिक मदत करुन चार मुलाचां वार्षिक खर्च दिला आहे.

3) प्रत्येक मोहिमेत रहाळ परिसरात शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते.

अजून खूप साऱ्या किल्ल्यांवर संवर्धनाचे काम हाती घ्याचे आहे.. त्यासाठी हवी आहे आपली साथ…!

बा रायगड परिवाराकडुन सुरु असलेल्या दुर्गसंवर्धन शिवकार्य समाजकार्य राष्ट्रकार्याच्या उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी आम्हाला संपर्क करा –

A/c Name – Ba Raigad Parivar

Bank: Bank of Maharashtra

AC NO: 60290202020

IFSC CODE: MAHB0000707

BRANCH : Bibvevadi, Pune

Paytm/Google Pay – 9004020304

(सर्व दानशुर व्यक्तीचे स्वागत आणि आभार, सर्वाना रितसर परिवाराची पावती दिली जाईल.)

धन्यवाद

आपलाच

बा रायगड परिवार

बा रायगडा तुझ्या चरणातील मी एक धुलीकण…
अलंकारण्याला परि पाय तुझे धुळीचेच आहे मज भुषण…!!

संपर्क क्रमाकं –
9022556690, 8308864678, 9892867110, 8390588845, 9922973101, 7738549220

सोशल मिडिया अधिकृत माहिती –

फेसबुक पेज –
https://www.facebook.com/baraigad/

फेसबुक ग्रुप –

https://www.facebook.com/groups/214927542351040/

फेसबुक अकाऊन्ट –
https://www.facebook.com/profile.php?id=100017613676247

वेबसाईट –
www.baraigad.com

ईन्टाग्राम – https://instagram.com/download/?r=3247410103

यु ट्यूब चॅनल –
https://www.youtube.com/channel/UC1hLloSR3G8Bt0UjXpEFVHw

2 Comments