बाजींद भाग १५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…
बाजींद भाग १५ – वर्षानुवर्षे पावसाच्या केवळ एका थेंबाची तहान घेऊन आसुसलेल्या जमिनीवर एकाकी धुव्वाधार पावसाने सुरवात करावी, जमीनीच्या धुंद सुवासाने आसमंत दरवळून जावा आणि सारी सृष्टी तृप्त व्हावी…अगदी असेच काहीसे नुराजहाँ आणि बाजी च्या अंतर्मनात घडत होते.
एक आनंदाची अनामिक लकेर त्यांच्या सर्वांगात उठली होती.
एकमेकांच्या मिठीत स्वर्गीय सुखे अपुरी पडावीत अशी अवस्था….!
असेच काही क्षण गेले अन बाजी भानावर आला, त्याने नुराजहाँ चे बहुपाश मोठ्या मुश्किलीने सोडवले आणि एक स्मित हास्य करत बोलू लागला…!
राजकुमारीजी.. क्या जमीन और आस्मान कभी एक हो सकता है…?
माझी आणि तुमची भेट या जन्मात तरी शक्य आहे ?
यावर नुराजहाँ बोलली…!
क्यो नही राजाजी….नक्कीच…आजवर आयुष्यात जणू काही तुमचीच वाट पाहत मी जगत होते की काय असे वाटत आहे…!
दिघेही स्मितहास्य करत महाराज व हुसेनखान जिथे चर्चेत बसले होते तिथे पोहचले..!
एव्हाना सार्या गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.
सर्व गावकरी मोठ्या आनंदाने हुसेनखानांच्या फौजेच्या पाहूनचारात व्यस्त होते.!
आजची रात्र सारे इथेच मुक्काम करणार होते, व उद्या दिवस उगवण्याआधी गाव सोडून जाणार होते ते कायमचेच….परत कधीही चंद्रगडवर कोणताही बादशाही अंमलदार येणार नव्हता..!
चंद्रगड चे स्वातंत्र्य अबाधित राहणार होते…!
सर्व गावकरी आनंदात होते.
राजे चंद्रभान यांच्या महालात हुसेनखान सह बाजी व नुराजहाँ यांची चर्चा रंगली होती.
हुसेनखान बाजीला बोलला…!
राजाजी..आप जितने बहादूर है, आपके पिताजी भी आपसे ज्यादा बहाद्दर है…!
राजनीती के बारे मे इनके जैसा ज्ञान मैंने आजतक किसीसे नही सुना…!
हमे फक्र है, इस दख्खन की मूहीम मे हमे आप जैसे दोस्त मिले..!
जब हम आग्रा जायेंगे आपके लिये बादशाह से जरुर दरख्वास्त करेंगे…!
यावर राजे हसत उत्तरले….!
जरुर खानसाहेब…आजवर मोगलांच्या अन्याय, अत्याचाराच्या कथा ऐकत आम्ही मोठे झालो.
आपल्यासारखा नेकदील सिपेसालार भी मोगल फौज मे हो सकता है…सचमुच हम सारे हैराण है…आपकी दोस्ती का कर्ज हम चंद्रगड के लोग कभी नही भुलेंगे…!
सर्व हसत उठले…!
बाजी राजे..क्यो न आप हमारी बेटी को आपका चंद्रगड नही दिखा लाते…!
आपकी जानवरोन की भाषा का रहस्य जरुर बताईये..!
हम और राजसाब अभी खूब बाते करेंगे..!
नक्की खानसाहब…हम राजकुमारीजी को चंद्रगड घुमाकर लाते है…शाम होणे तक हम लौट आयेंगे..!
असे म्हणून बाजी व नूरजहा निघून गेली..!
आपल्या “पक्षा” घोड्यावर मांड ठोकली आणि नुराजहाँ ने तिच्या घोड्यावर मांड ठोकून ते दोघेही दौडत चंद्रगड च्या जंगलात निघाले….!
बाजी च्या जंगलात येताच सर्व पशु पक्षी जनावर कीटकांनी एकच कल्लोळ माजवला…!
जे ते त्याच्या जवळ येऊ लागले…!
त्या जनावरांना पाहून बाजी स्मित हास्य करत नुराजहाँ ला बोलला…..!
राजकुमारीजी हे सर्व माझे सवंगडी पहा…यांच्याशिवाय मी काहीच नाही.
माझा दिवस-दीवस या सर्वांच्यासोबत जातो.
क्रमशः – बाजींद भाग १५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव