महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,576

बाजींद भाग १९ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5776 4 Min Read

बाजींद भाग १९ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १९सुर्यकांत ने जाणले की बाजींद जिवंत आहे.
त्याने धावत जाऊन पाणी आणले आणि बाजींद ला पाजले….बाजींद ने डोळे किंचित उघडले…एक क्षण त्याने सुर्यकांत कडे पाहिले…बाजूला गतप्राण होऊन पडलेल्या नुराजहाँ कडे पाहिले…त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या…..त्यांने क्षणात गळ्यात बांधलेला ताईत काढला व तो सुर्यकांत च्या हातात ठेवला….एका विलक्षण अपेक्षित नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता आणि डोळे उघडे ठेऊनच तो गतप्राण झाला…!

आपल्या हाती काय देऊन बाजींद गतप्राण झाला आहे, याचे आश्चर्य सुर्यकांत ला वाटले, त्याने खूप लक्षपूर्वक तो ताईत हाती घेतला.
त्या ताईत च्या आत नक्कीच काहीतरी गूढ होते, त्याने त्या ताइतच्या आत असणारा एक कागद बाहेर काढला…!

त्यावर काही गूढ सांकेतिक चित्रलिपी मध्ये संदेश लिहला होता…!
त्याला काहीच समजत नव्हते, त्याने तो कागद तसाच जपून ठेवला व बाजींद आणि नुराजहाँ च्या पार्थिवाला अग्नी दिला..!
इतर हजारो मृतदेह तो एकटा ४-५ दिवस पुरत होता.

जंगलातील कंदमुळे खाऊन तो जगू लागला.
रोज रात्री झोपताना तो त्या कागदाचा अर्थ लावत होता पण समजत नव्हते…!

एक हत्ती….दोन वाघ….एक नागमोडी वळण घेतलेला साप….पाण्याचा धबधबा……आणि मुंग्यांचे वारूळ..!
बरोबर मध्ये एक सोनेरी रंगात वहीचे चित्र होते..!

ज्याअर्थी मरत असताना बाजींद ने ते त्याला दिले होते त्याअर्थी नक्कीच काहीतरी ते विलक्षण असणार म्हणून तो रोज ते पाहत असे….!

एके दिवशी तो जंगलात फळे, कंद गोळा करत होता आणि पाठीमागून वाघाची डरकाळी त्याच्या कानावर पडली….भीतीने सर्वांग थरारले…चुकून आपण वाघाच्या परिसरात पाऊल ठेवले असावे, त्याने त्वरित तिथून जाण्यासाठी मागे वळणार इतक्यात वाघाचे ते प्रचंड धूड समोरच उभे होते…!

त्याला पाहताच सुर्यकांत जिवाच्या आकांताने धावू लागला आणि धावता धावता तो एका ओढ्यावर बांधलेल्या लाकडी सेतुवर चढला आणि कडाड कड आवाज करत तो सेतु तुटला…तो ओढ्यात पडला आणि पोहत ओढ्याच्या किनारी लागला.

दम खात तो बसला होता, तेव्हा त्याच्या हाताला एक लालभडक मुंगी चावली…१,२,३,४…..१० हजारो मुंग्या तिथे होत्या….जणू ते जंगल मुंग्यांचे होते…त्या मुंग्यातून जायला एकच वाट होती…ती नागमोडी वाट पाहिल्यावर त्याला काहितरी आठवले…मुंग्या, नागमोडी वाट….क्षणात त्याला गळ्यात बाजींद ने दिलेला ताईत आठवला….त्याने तो काढला…तर बरोबर तसेच चित्र त्या कागदावर होते जसे समोर दिसत आहे….!

त्याने तो कागद समोर धरुन चालू लागला तर समोर एक गुहा दिसली ज्या गुहेवरून पाण्याचा धबधबा पडत होता……!

त्यांने त्या गुहेत प्रवेश मिळवला…अंधारी गुहेत तो धाडसाने चालू लागला…..खूप वेळ चालला आणि त्याला अंधारात दोन हिरे चमकल्याचा भास झाला….त्याने लक्ष देऊन पाहिले आणि अंगावर सर्दिशी काटा आला….ते दोन जिवंत वाघ होते….!

सुर्यकांत ची चाहूल लागताच ती वाघांची प्रचंड धुडे शरीर झिंझाडत उठू लागली, जणू खूप दिवस ती तिथेच बसून असावीत.
सुर्यकांत ला पाहून त्यांनी मान वर करत प्रचंड डरकाळ्या फोडल्या…गुहेतील अणुरेणु शहारले…!

सुर्यकांत च्या पायाखालची जणू जमीन सरकू लागली असे ते दृश्य होते.
पण, आता माघारी फिरुन धावणे अशक्य होते..एका झेपत त्याचा घास झाला असता.
तो तसाच तटस्थ उभा राहिला.
ते दोनही वाघ बाजूला सरकू लागले..जणू ते काहीतरी खून सांगत असावेत.
सुर्यकांत ला समजेना काय घडत आहे, तितक्यात गुहेच्या प्रवेशद्वारातून भलामोठा हत्ती चित्कार करु लागला.

सुर्यकांत ची विचारशक्ती क्षीण होऊ लागली…पुढे मागे दोन्हीकडून जणू यमादेवाशी गाठ पडली होती.

तो तसाच पुढे धावु लागला…धावता धावता पायाखाली असलेल्या दगडाला ठेचकाळून तो पडला….जमिनीवर वाळलेल्या गवताची गंजी असल्याने त्याला फारसे लागले नाही.
तो उठणार इतक्यात समोर एका चौकोनी दगडावर त्याला काहीतरी वस्तू असल्याचा भास झाला…!

तो धाडस करुन समोर जाऊ लागला आणि बाजू उभा असलेल्या वाघांचे अन बाहेर उभ्या हत्तीचे किंचाळने जास्तच सुरु होते….त्याने त्या दगडावर पाहिलं…!

एका हरणाच्या कातडीमध्ये चौकोनी वस्तू बांधून ठेवल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
त्याने ते हरणाचे आवलण सोडवले ,आत त्याला एक मजबूत वही दिसून आली…!

कोणत्यातरी प्राण्याच्या कातडीचे पाने असणाऱ्या त्या वहीवार नैसर्गिक रंगाने चित्रविचित्र आकृत्या कोरलेल्या होत्या..!

क्रमशः बाजींद भाग १९ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment