महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,29,018

बाजींद भाग ३१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6448 9 Min Read

बाजींद भाग ३१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३१ – ज्या टकमक टोकाचे नुसते नावच ऐकुन अख्या धनगरवाडीस रात्रीची झोप लागत नव्हती, त्या टकमक टोकाच्या जवळच आपण उभे आहोत ही कल्पनाच सखाराम, नारायण, सर्जा आणि मल्हारीच्या हृदयाला
घरकाप उडवणारी होती.

वेळ मारन नेत ते चौघेही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. मंजुळ घंटानिनाद आणि रुद्राचा घुमणारा आवाज कानी पडताच सखाराम ने जाणले कि श्रीजगदीश्वर मंदिर जवळ आले आहे.

मंदिराच्या सभोवताली ताशीव दगडांची पक्की तटबंदी बांधली होती.

कमरेला तलवारी, पाठीला ढाल आणि हातात उंचापुरा माला घेतलेले कित्येक धारकरी तिथे पहारा देत होते.

जगदीश्वराची नक्षीदार दगडी कमान पार करून ते चौघेही आत प्रवेशले.

सकाळच्या गारव्यात आणि रिमझिम पावसात मंदिरातील सुगंधी फुलांचा सुगंध है खरोखर एक रम्य चित्र होते.

सरकारी कार्यालयातील अनेक अधिकारी सकाळी सकाळीच दर्शन घेऊन दरबारी जायला गडबड करत होते.

सखाराम व चौघे पण जगदीश्वराच्या गाभाऱ्यात गेले.

समोर जगदीश्वराचे शिवलिंग शीतल जलधारेत न्हाऊन निघताना दिसत होते. सभोवताली नाना तऱ्हेच्या शोभीवंत फुलांनी यथासांग पूजा केली होती.

समोर पुजारी मुखाने पवित्र मंत्र म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना तीर्थ देत होते.

सखाराम ने गुढगे टेकले आणि मन भरुन महादेवाचे दर्शन घेतले.

समुद्रमंधनातून निघालेले अतिजहाल विष प्राशन करून देवांचे प्राण वाचवणारा महादेव त्याचा दाह शांत करण्यासाठी जणू सहयाद्रीच्या त्या उंचच उंच गडकोट किल्ल्यात विसावला असावा अशी भावना
सखाराम च्या हदयात उचंबळून आली होती…त्याचे डोळे पाणावले होते.

त्या महादेवाने देवांसाठी विष प्प्राशन केले मात्र आमच्या महादेवाने सारे आयुष्य मृत्युच्या जिभेवर काढले होते.

धर्म, देव, नावालाही शिल्लक नव्हता, स्वत्व, अस्मिता, स्वाभिमान तर ऐकणार्याला नवल वाटत होते.

माणुसकी नावाचा शब्द तर दुरापास्त झाला होता.

स्वार्थासाठी स्वकीयांचे गळे चिरणारा तो महाराष्ट्र जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते आजही नरकात बुडून गेला असता.

आज माझ्यासारखा साधारण मेंढपाळ कष्टाची भाकरी समाधानाने खातोय ते केवळ महाराजांच्या मुळे याची जाणीव सखाराम च्या मुखावर होती.

नाहीतर आजवर कित्येक आदिलशाही, मोगलांच्या टोळधाडी आळीपाळीने महाराष्ट्रावर पडत होत्या.

आज आमच्या घरातील आया बाया.मुल.गुर ढोर सुखात आहोत यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या महादेवाने प्रत्यक्ष महादेवापेक्षाही जहाल विष प्राशन केले आणि पचवले होते.

वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन अखंड घोडा आणि तलवार हीच कुलदैवते मानून सतत हिंदवी स्वराज्याचा ध्यास उरात बाळगून हिंदुस्थानातील पाच पातशाहीना
रणांगणात चारी मुंड्या चीत करून मराठेशाहीचे सुवर्ण सिंहासन स्थापन करून हिंदुस्थानातील कित्येक भंगलेल्या सिहासनाचा जणू बदला घेतला होता…’

आणि हे सारे कोणाला घेऊन तर साधी लंगोट वाली पोर बरोबर हेऊन…..अहो आज या पोरांचा धाक दिल्लीपर्यंत आहे याचे कारण केवळ शिवाजीराजे..!

सखाराम डोळ्यात आले पाणी पुसत बाहेर पडला.

सकाळच्या गार वाऱ्याने आणि बारीक तुषारासारख्या पावसाने त्याच्या डोळ्यात आलेल्या अश्रूला आणखीच थंड करत होते….!

ते चौघेही परत सरकारी अतिथीगृहात आले.

काही क्षण गेला खुर वस्ताद काका सोबत ३-४ धारकरी घेऊन आले.

येताच बोलले …चला गड्यान….महाराजांनी तुम्हाला भेटायची परवानगी दिली आहे. दरबारी रीतरिवाज माहित नाही तुम्हाला म्हणून सांगतो दरबारात जास्त आवाज न करता बोलायचे आणि विचारेल तेवढीच उत्तरे द्यायची…!

चला….आवरा लौकर…

असे म्हणत सखाराम व चौधे वस्ताद काकांच्या सोबत दरबाराकडे चालू लागले..

नगारखान्यातून नगार्याचा आवाज येत होता.

सारे दरबारी वकील, भेटीसाठी परराज्यातून आलेले सरदार, सरकारी अधिकारी आणि केवळ महत्वाच्या व्यक्तींनाच नगारखान्याच्या आत असलेले शिलेदार माहिती विचारून, नावे व परवलीचे शब्द, ओळखीचे
कागद तपासून ते लिहून घेऊन मगच आत सोडत असे.

नगारखाण्यातून आत प्रवेश करताच समोर असलेल्या भव्य दरबारात जाण्यासाठी असलेल्या कमानीतून आत प्रवेश दिला जात असे.

तिथे उभा असलेले हशम प्रतवारी कस्न कोण कुठे उभे राहायची सूचना करत होते.

आत माशालांच्या उजेडानी सारा दरबार उजळून निघाला होता.

समोर पाहताच चोपदार,भालदार हातात सुवर्णदंड घेऊन महाराज येण्याची वाट पाहत होते. राजसदरेच्या बाजूलाच काही वकील, कारकून मंडळी समोर भूर्जपत्रे, टाक दवत घेऊन बसली होती.

आत साधारण पाच पन्नास लोक असतील पण कोणीही अजिबात मोठ्याने बोलत नव्हता.

कुजबूज मात्र सुरु असायची…
राजसदरेच्या मधोमध महाराजांचे ३२ मण सोन्याचे आणि कित्येक हिरे,माणिक,मोती यांनी जडवलेले
सुवर्णसिंहासन झळाळत होते…

हेच ते सिंहासन ज्याचा धाक सारी पातशाही घेत होती.

सखाराम व त्याचे साथीदार वस्ताद काकांच्या बरोबर अगदी समोर उजव्या बाजूला जाऊन उभी होती.
त्यांच्या कामाचा त ओळखीचा कागद वस्ताद काकानी सदरेवर बसलेल्या वकिलांच्याकडे दिला व काहीतरी कानात सांगितले.

ते ऐकताच त्या वकिलाने तो कागद उघडून पहिला आणि सखाराम व त्याच्या साथीदारांच्याकडे पाहू लागले आणि समोर या अशी खून केली.
वकील बोल…….सधारण किती दिवस झाले तुमच्या गावाला हा त्रास होत आहे ?
वकिलांच्या बोलण्याने सखाराम ने उत्तर दिले….जी….बरेच दिवस झाले ….पण या मागच्या धा-पंधरा
दिसात जीवाप आणि माणसांच्यावर पण वाघांनी हल्ला केला.

टकमकाच्या बाजूला जनावरे घेऊन हिंडवायाला जायला पण लोक घाबरत आहेत आता….!

मोठा श्वास घेऊन वकील बोलले..ठीक आहे ……. वस्ताद काकांच्याकडे पाहत वकील बोलले की उत्तरेतून काही हेर महत्वाचा निरोप आला आहे.

त्या हेराना घेऊन महाराज काही वेळ खलबतखान्यात घालवत आहेत.

काही वेळात महाराज येतील…..पहिला प्रश्न या चौघांचाच मांड्या…तुम्ही थांबा काही वेळ…

सखाराम दरबारात चौफेर नजर फिरवू लागला.

अजूनही पटत नव्हते कधी स्वप्नातसुधा खुद्द शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहता येईल ते…पण खंडोजी भेटला आणि सारे शक्य झाले आणि आम्ही मात्र त्याच्यावर नाही नाही त्या शंका घेतल्या….बिचारा परत भेटला की पाय धुवून पाणी पीइन त्याचे…पण कुठे असेल देव जाणे……

इतक्यात एक जोरदार आरोळी झाली………

होशियार……होशियार …होशियार…….

प्रौढप्रतापकुलावातंस क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजश्री शिवाजीराजे येत आहेत
हो……. होशियार……होशियार …होशियार……
महाराज…… प्रौढप्रतापकुलावातंस क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती कि ….. आणि सारा दरबार व सखाराम व त्याचे सहकारी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला……जय…जय
..जय …….

महाराज सिंहासनाच्या पाठीमागून आले.

सोबत अनेक अंगरक्षक, शिलेदार, वकील होते…….!

पांढरा शुभ अंगरखा, कमरेला दरबारी जगदंबा तलवार, डोक्यावर मंदील शिरपेचात रोवलेला मोत्याच्या तुरा आणि गळयात भोसले कुळाची आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ.
कपाळावर शंभू महादेवाचे त्रिदळ व त्यातून शिवगंधाचा नाम.
कपाळातून निघालेले सरळ सळसळीत नाक,काळेभोर बोलके डोळे आणि ओठावर काहीसे स्मितहास्य मात्र चेहऱ्यावर कमालीची गांभीर्यता..
हेच ते शिवाजीराजे भोसले ज्यांनी वयाच्या १४ च्या वर्षी महाराष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्ती देण्यासाठी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ वाहिली….ज्या वयात आमची पोर पोराटकी खेळात मग्न असत्यात.
त्यावेळी तोरणा किल्ला जिंकला….जावळीच्या मोऱ्यांची मिजास उतरवली..अफझलखानासारखा राक्षस समोरासमोर फाडला…पन्हाळगडाच्या वेढ्यातुन सिद्दीच्या हातावर तुरी देऊन निसटले….शाहिस्तेखानाला लाल महालात जाऊन बोटे तोडून शास्ता केली…..सुरतेसारखी मोगलांची आर्थिक राजधानी लुटून जाळून
फस्त केली…आग्यात औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाइच्या पेटार्यात बसून पळून आले….असे एक ना
अनेक किस्से ऐकून सारा महाराष्ट्र गेली ३-४ दशके जगत होता.

महाराष्ट्राच्या दन्याखोर्यातून पहाटेच्या जात्याच्या ओव्यापासून ते लग्नाच्या मंगल अष्टकात शिवाजी
घेतल्याशिवाय दिवस जात नसायचा की शुभकार्य होत असायचे..।

आया बायांची अबू, त्यांचे कुंकू निर्धास्त केलेला हा युगपुरुष वर्षावर्षानी नव्हे तर युगायुगांनी जन्म घेतो……..काय बोलावे आणि किती बोलावे……शब्द संपतात…..।

महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि समोर उभ्या असलेल्या सभेकडे पाहताच …सर्वानी तीन मुजरे महाराजांना वाहिले……

महाराजांनी आपला उजवा हात छातीशी नेत सर्वांचे मुजरे स्वीकारले आणि सिंहासनाकडे उजवा पाय पुढे टाकत आसनस्थ झाले…..!

समोर वकील हातात काही कागदे घेऊन आला व महाराजाना काहीतरी सांगू लागला….

समोर उभ्या असलेल्या हारकार्याने हाळी दिली……..टकमक धनगरवाडीचे गावकारभारी सखाराम व त्याचे साथीदार समोर हाजीर हो……

त्याची आरोळी ऐकताच वस्ताद काकांनी सखाराम व चौघाना पुढे येण्यासाठी खुणावले..

सखाराम डोळे पुसत समोर गेला व सर्वानीही वाकून मुजरा केला…..

सखाराम व वस्ताद काकांच्याकडे पाहत महाराज बोलले……

वस्ताद काका …….काय समस्या आहे गावकऱ्यांची …?

महाराजांच्या शब्दाने वस्ताद काका समोर झाले आणि खालच्या रवात बोलू लागले….

क्रमशः बाजींद भाग ३१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग ३१

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment