बाजींद भाग ३८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…
बाजींद भाग ३८ – हजारो हात खाली तो देह गेला आणि एका मोठ्या खडकावर आपटला आणि खाली खोल निबिड अरण्यात रक्ताने माखलेला खंडोजी गतप्राण झाला….
सूर्य उगवला. हजारो सूर्यकिरणांनी रायगड उजळून निघाला, पण गडावरील कोणाचेच लक्ष कामात नव्हते..सर्वांच्या मुखात एकच नाव होते खंडोजी….
आज एक नवीन अध्याय लिहला गेला.
स्वराज्यात फितुरांना क्षमा नाही..इये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.
खंडोजी चा अध्याय संपला.
यशवंतमाची वर भगवा ध्वज अभिमानाने डोलू लागला.
राजे येसाजीराव आणि जिच्यामुळे खंडोजीला प्राण गमवावे लागले ती सावित्री चोरवाटेने विजापूर कडे रवाना झाली होती.
भीमा जाधव शिाच्य हातून ठार झाला होता…!
यशवंतमाची च्या मोहिमेने खंडोजी सारख्या निष्ठ्वान हेराचा बळी मात्र नक्कीच घेतला होता…..एका स्त्रीच्या मोहपाशात कर्तव्य विसरलेला हेर….खंडोजी…!
वस्ताद काकांना हुंदके आवरत नव्हते …सखाराम आणि त्यांच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली होती…….खंडोजी मस्न गेला आहे. तर आम्हाला इथवर आणले तरी कोणी…..भीतीने त्यांचे सर्वाग थरथरत होते….!
वस्ताद काकांच्या बोलण्यावरून सखाराम व त्याच्या सवंगड्याना अक्षरश घाम फुटला होता.
नरभक्षक वाघांच्या तडाख्यातून ज्या खंडोजी ने वाचवले, ज्या खंडोजी ने रायगड पर्यंत येण्याचा मार्ग सुकर करून दिला, तो खंडोजी जिवंतच नाही ही कल्पनाच
त्याना पटेना, पण वस्ताद काकांच्या काळजातून आलेले शब्द आणि डोळ्यातील अथू खोटे असावेत असे त्याना वाटेना…!
सखाराम ला तर फार मोठा धक्का बसला होता, कसे सांगावे की याच खंडोजी बरोबर दिवसभर चालून बाजिंद ची रहस्यमय कथा जाणून घेतली.
त्याच्याबरोबर राहून शिवराय समजून घेतले, बहिर्जी नाईक समजून घेतले. सर्वच जटील होते..
काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि निर्धाराने वस्ताद काका बोलले.
चला…माझ्या खंडोजी ने मरुन सुध्दा कर्तव्य बजावले हे मात्र खरे.
लहान मोठ्या सर्वानाच मदत करणारा होता तो, शिवाजी महाराज रक्तात होते त्याच्या..पण,पण कर्तव्य विसरलेला हेर हा शिक्का कायमचा पडला होता. त्याच्यावर तो किमान माझ्या पुरता तरी पुसला गेला आहे..!
चला, आपण हेर खात्याच्या केंद्रात जाऊ..तिये जाऊन बहिर्जीना याची वर्दी देऊ..तिथून पुढे तुमच्या वाडीवर जाऊन महाराजांच्या हकमानुसार अंमलबजावणी करु..
चला…
सारे उठले आणि ती जंगलातील चोरवाट चालू लागले..
मजल दरमजल करत एका डोंगरावर चढून ज्या मार्गे येताना ते आले होते त्याच मार्गातील गुहेत शिरले….
गुहेत पूर्वीचाच हेर साधूचे रूप घेऊन ध्यानस्त बसला होता.
त्याला पाहताच काका बोलले…जय रोहिडेश्वर…..
त्यावर डोळे उघडत तो हेर बोलला..जय भवानी…..
क्रमशः बाजींद भाग ३८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव