महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,692

बाजींद भाग ४५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

Views: 6255
4 Min Read

बाजींद भाग ४५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४५ – बहिर्जी नाईकांच्या समाधीला दिवा लावून, त्यावर माथा टेकवून किसन धनगर आणि बाजीराव दिव्याच्या प्रकाशात बसले.

गडावर पावसाने थंड वातावरण झाले होते, मात्र बाजींद च्या उत्कंठावर्धक कथेने ‘बाजीराव’ च्या उरात मात्र आग लागली होती.

किसन धनगराने समाधीवर लावलेल्या दिव्याकडे पाहत भूतकाळातील स्मृती शब्दरूपी मांडायला सुरवात केली…..!

सखाराम ने वस्ताद काकांना ज्या जंगलात आणले होते, ते बाजींदचेच जंगल होते.

काकांची व सखाराम ची सोबत त्यांच्या सवंगड्यांची चाहूल लागताच जंगलातील किडा, कीटक, मुंगी, पशु, पक्षी एकदम कोलाहल माजवू लागताच काकाना समजले कि आपण बाजींद च्या जंगलात आहोत आणि काही क्षणातच बाजींद आपल्या झेपा टाकत जंगलातील अनेक हिंस्त्र पशु समोरच्या झाडावर बसले.

अनेक विषारी सर्पानी झाडाच्या फांद्याला वेढे देऊन बसले तर अनेक पक्षी आकाशात झेपावू लागले…

समोर एक धिप्पाड व्यक्ती वाघ सिंहाच्या समवेत येताना दिसू लागला…. ती चाल, ती नजर वस्ताद काकाना ओळखीची वाटली…

वाटली नव्हे…ओळखीचीच आहे….

हा तर …हा तर…..

माझा खंडोजी..माझा खंडेराय…

काकांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले…..
सखाराम च्या नजरेने मात्र या अनोळखी चेहऱ्याला ओळखले नव्हते…!

तो विचार करू लागला….हा खंडोजी ?

तर मग बाजींद कुठे आहे ?

आमच्यासोबत चार दिवस फिरला तो खंडोजी कोण होता मग ..?

त्या व्यक्तीने अद्भुत आवाज केला आणि सोबत आलेले सारे प्राणी माघारी जंगलात जाऊ लागले…..!

खंडोजी पुढे आला आणि भावनाविवश होऊन वस्ताद काकांच्या पाया
पडला..आणि मिठी मारून रडू लागला…!

खंडोजी च्या त्या रडण्याने काकानाही भावना अनावर झाल्या….!

काही क्षण भूतकाळात गेले….खंडोजी भानावर आला.

काका…खूप वाट पाहीली तुमची, या कर्तव्याच्या फेऱ्यात तुमच्यासारख्या गुरुजनांचा विरह सहन करणे ही मृत्युपेक्षाही भयानक गोष्ट होती.

खंडोजी बोलला….!
यावर काका उत्तरले…खंडेराया अरे हा सारा काय प्रकार आहे ?

तुला तर या हातानी कडेलोट केला होता आम्ही. तुझ्या जाण्यानंतर हा
हाडामासाचा देह कसा तारला आहे माझ्या जीवाला माहित. आता केवळ उपकारापुरता जिवंत आहे रे…. पण, तू जिवंत कसा काय ?

हे धनगरवाडी चे लोक यांना तूच रायगड पर्यंत पोचावलेस ना ?

एक दीर्घ श्वास घेत खंडोजी उत्तरला…..!

नाही काका….यांना रायगड पर्यंत पोहचवले ते खुद्द बहिर्जी नाईकांनी.
बहिर्जी नाईक हा शब्द उच्चारताच वस्ताद काकांच्या अंगावर काटा आला.

काय ?

सांगतो काका…..चला आपण या जंगलातील गुप्त गुहेत जावूया….!

वस्ताद काका, सोबत आणलेले दोन धारकरी आणि सखाराम सह त्याचे सवंगडी खंडोजी सोबत त्या जंगलातील गुप्त गुहेत जाऊ लागले.

डोंगर-दर्यीत वसलेल्या त्या घनदाट जंगलातील एका तळ्याजवळ एक धबधबा वाहत होता. त्या धबधब्या खालून आत गेले कि एक अंधारी चोरवाट होती.

त्या चोरवाटेने हे सारे लोक त्या गुप्त गुहेत पोचले. गुहेत अनेक लोक आपापल्या कामात व्यस्त होते.

मशात्रीच्या उजेडात ती गुहा उजळून निघात्री होती. खंडोजी ला पाहून सारे लोक उठून मुजरे करू लागले, त्या मुजरयाचा स्वीकार करत खंडोजीने वस्ताद काकासह सर्व लोकांना एका गुप्त कक्षात नेले.

काकांच्या सोबत आलेले दोन धारकरी तिथेच बाहेर थांबले व आतून गुहेचे दार बंद करण्यात आले.

आतल्या कक्षात समईच्या उजेडात सर्व गुहा उजळली होती. समोरच आई तुळजाभवानी चे तैलचित्र लावले होते.

भिंतीवर ढाल तलवारी लावल्या होत्या.

समोरच्या मंचकावर खंडोजीने सर्वाना बसण्याची खून केली ..सर्व बसले.

औपचारिक बोलण्याला सुरवात झाली आणि वस्ताद काकांनी खंडोजीला मुख्य प्रश्न केला.

खंडेराया….आता वेळ न घालवता सांग हा काय प्रकार आहे ते ?

बाजींद च्या जंगलात तू कसा..ही जनावरे तुझे ऐकतात..म्हणजे तुलाही बाजींदचे गूढ ज्ञान येत आहे ?

सर्वात महत्वाचे तू जिवंत कसा…?

क्रमशः बाजींद भाग ४५ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment