बाजींद भाग ४८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…
बाजींद भाग ४८ – साऊ…ज्यांच्यामुळे हा खंडोजी घडला, हे माझे वस्ताद काका…!
सावित्री पुढे आली आणि तिने वस्ताद काकांचा आशीर्वाद घेतला…!
राजे येसाजीराव बोलले……वस्ताद काका…आता आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावू लढणार स्वराज्यासाठी…!
सखाराम हे सारे भरल्या डोळ्यांनी पाहत होता…काय ही वेडी माणसे आहेत.
वयाचा उत्तरार्ध सुरु आहे, मरण केव्हाही यांना गाठेल असे वय जगत आहेत, मात्र भाषा करत आहेत स्वराज्यासाठी लढायची…..
खरोखर ही हिंदवी स्वराज्याची मांदियाळी आमच्या नशिबी का नाही…
किती दिवस आम्ही संसाराच्या गाडग्या मडकक््यासाठी जगायचे…सखाराम चे अश्रू अनावर होत होते…!
दरम्यान जंगलातील पूर्वे बाजूकडून शिंगे तुतारी कर्णे गर्जू लागली…!
सर्वांनी ताडले……शिवरायांचे पथक आले.
सारे गडबडीने तिकडे जायला निघाले.
जंगलातील त्या पठारी भागात, एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मानाने डोलत होता.
मागोमाग पाचशे-सहाशे हत्यारबंद धारकरी दोडत येत होते. आणि एका काळ्या घोड्यावर खुद्द राजश्री छत्रपती शिवाजीराजे बसले होते.
डोक्यावरील मंदीलाला मोत्याचे घोस लावून रोवलेला तुरा हिन्काळत राजांची ती प्रसन्न मंगलमूर्ती नजरेस पडू लागली.
पांढरा शुभ्र अंगरखा, त्यावर घातलेली आभूषणे..गळ्यात भोसले कुळाची कवड्यांची माळ.
शिवगंधाने भव्य कपाळ रेखाटले होते. काळी रेखीव दाढी आणि चेहर्यावर नेहमीचे स्मित हास्य…..! कमरेला भवानी तलवार लटकत होती. कमरेला कट्यार दिसत होते.
घोड्याचा लगाम खेचला आणि राजे रिकिबीत पाय ठेवून पायउतार झाले…त्यांचा साऱ्या जंगलात कमालीची शांतता पसरली.
महाराजांना पाहताच सर्वांच्या कमरा मुजर्यासाठी खाली झुकल्या.
राजे हसतच खंडोजी जवळ येऊ लागले.
खंडोजी भांबावून गेला व सावरला.
राजांच्या मागे एक पैलवान गडी, कमरेला तलवार, पाठीवर ढाल अडकवून लगबगीने समोर आला. राजे बोलले….यशवंता…..तुझा खंडोजी हल्ली चांगलाच तयारीचा दिसत आहे.
त्या युवकाने हसत दुजोरा दिला….होय राजे, आता काय, तुम्ही लग्नाला परवानगी दिलीत, राजे शिर्क्यांची लेक म्हणजे लक्ष्मीच पदरात पडत आहे म्हटल्यावर अंगावर बाळसे तर दिसणारच ना..!
असे म्हणताच खंडोजी व सावित्री पुरती लाजून गेली ..इतर लोक मात्र हसू लागले.
सखाराम चे डोळे मात्र विस्फारून गेले होते.
राजांच्या सोबत जो यशवंता होता…तो..तोच तर खंडोजी म्हणून आमच्यासोबत ४ दिस या जंगलात फिरत व्हता……सखाराम ची पाचावर धारण बसली होती.
राजे येसाजी शिर्के समोर आले व त्यांनी राजांना मुजरा केला.
ते बोलू लागले…राजे…आता रायगड परिसरात केवळ भगव्या झेंड्याचे राज्य आहे…आता इथल्रा दगड आणि दगड तुमच्या सोबत आहे.
राजे हसले आणि बोलरले…..राजे शिर्के…हे तर श्रींचे काम आहे, माझे एकट्याचे नाही.
तुम्ही मनावर घेतले म्हणून इतक्या कमी वेळेत हे साधले.
क्रमशः बाजींद भाग ४८ | बहिर्जी नाईक यांची कहाणी
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव