महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,225

बारव, वडेश्वर, आंदर मावळ

By Discover Maharashtra Views: 1326 2 Min Read

बारव, वडेश्वर, आंदर मावळ –

बारव, ज्या विहरीत लोकांच्या सोईसाठी थेट पाण्याच्या तळा पर्यंत पाय-या बांधल्या जातात त्यास साधारण बारव म्हंटले जाते. पूर्वी देव पुजेसाठी लागणारी फूल ही मंदिराच्या आवरात फुलझाड लावून त्या वरील फूल वापरली जायची. या झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याची सोय असणे गरजेची होती.तसेच भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्यासाठी किवा शुध्द होण्यासाठी पाणी लागे.तसेच वाटसरूंना मंदिरात विश्रांती सोबत तहान भागवण्यासाठी पण पाणी लागत असे.(बारव वडेश्वर)

मंदिरातील देवांना अभिषेक करण्यासाठी किंवा मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी लागत असे. अशा विविध कारणांसाठी मंदिरा जवळ पाणी उपलब्ध व्हावे या साठी मंदिराच्या आवरात बारव बांधल्या गेल्या.

महाराष्ट्रात बा-याच ठिकाणी मंदिर परिसरात अशा आनेक बारव पहायला मिळतात. या बारवांचा आकार साधारण शिवपिंडीच्या आकाराचा जास्त प्रमाणात  पहायला मिळतो. या शिवपिंडीच्या आकारामुळे या बारवेला थोडीफार श्रध्दा पण प्राप्त होते. अशा  नंदा प्रकारच्या बारव मंदिराच्या प्रांगणात  बांधलेल्या दिसतात.

सदर बारव ही आंदर मावळातील वडेश्वर गावातील असून ही बारव  वडेश्वर मंदिराजवळ ही पाहायला मिळते. शिवपिंडी च्या आकाराची ह्या बारवेत पाय-यांनी थेट तळाशी पोहचता येते. पाय-या उतरतांना दोन्ही बाजूला दोन देवकोष्टक असून एका मध्ये बाप्पा विराजमान आहेत. दोन्ही देवकोष्टकाच्या वर दोन शिलालेख असून शके १६९१असा उल्लेख दिसतोय.

बारवेच्या बाजूलाच वाडेश्वराच मंदिर आहे. आंदर मावळातील नंदा प्रकारची ही बारव फारसी परिचीत नाही. आंदर मावळातील ही बारव स्थापत्यशिल्पाचा ऐतिहासिक ठेवा असून ही बारव जतन व संर्वधन होत आहे. वेळोवेळी साफसफाई करुन बारवेच सौंर्दय वाढवल पाहिजे.

संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे

Leave a Comment