महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,931

बारगळांची गढी

By Discover Maharashtra Views: 2631 4 Min Read

जहागीरदार बारगळांची गढी, तळोदा –

तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक बारगळ गढी चे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले.

उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व। त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले. पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली. राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी स्नेहभाव निर्माण झाला.

बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते.

मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला.

सन १८६७ चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.

सुधाकर मराठे.

Leave a Comment