महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,304

बडोदा संस्थान, गुजरात | बखर संस्थानांची

Views: 2505
3 Min Read

बडोदा संस्थान, गुजरात | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र –

राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२) अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९ ) सध्याच्या गुजरात प्रांतात असलेले बडोदा शहर बडोदा संस्थानचे मुख्यालय होते.विशाल राज्यक्षेत्र असलेल्या या बडोदा संस्थान ला २१ तोफांच्या सलामीचा मान होता.

दुस-या शतका पासून या भागावर गुप्त ,चालुक्य ,सोळंकी ,मुस्लीम यांचा अंमल राहीला होता. गुजराथ चा काही भाग मराठ्यांनी घेतल्यानंतर सेनाधिकारी म्हणून दमाजीराव गायकवाड यांना या प्रदेशावर नमले. पुढच्या वारसांनी बडोद‍ा राजधानी ठेऊन राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मुळ पुरूष नंदाजी. यांचा चौथा मुलगा दमाजी हा बाजीराव पेशव्यांच्या कडे लष्करात होते. मोघल बादशाहाचा सुभेदार याचा पराभव करण्यात दमाजींनी मोठा पराक्रम केला होता. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना समशेर बहाद्दर हा किताब दिला.

दमाजीराव नंतर पिलाजी यास सरदारकी मिळाली. १७२१ साली पिलाजीने मोघलांचे सोनगढ घेतले. मोका मिळताच पिलाजीरावांनी पट्टणच्या नवाबाच्या बेगम चे साम्राज्य उधळून टाकले. या पराक्रमामुळे शाहू महाराजांनी  पिलाजीरावांना पुण्यातील दावडी हे गाव इनाम दिले.

पुढे गुजरात मधील डभई झालेल्या लढाईत बाजीराव पेशव्यास दमाजीरावांनी मदत केली. त्या बदल्यात  त्याना सेनापतीपद मिळाले. १७३२ साली त्यांच निधन झाल. त्यानंतर दमाजीराव द्वितीय याला सरदारकी मिळाली.( १७३२ – १७६८ ) . १७३४ साली दमाजीराव द्वितीय याने बडोदा घेतल्या पासून  बडोदा राज्य मराठा साम्राज्याचा महत्व‍चा  भाग बनला.

प‍ानीपतच्या लढाई नंतर निजामाशी झालेल्या लढाईत  दमाजीराव यांने माधवराव पेशवे सोबत पराक्रम करुन निजामाचा पराभव केला. त्यांना त्या बद्दल सेनाखासखेल हा किताब मिळाला. पुढे १७६८ साली त्यांच निधन झाल.त्यानंतर सयाजीराव गायकवाड , फतेसिंह मानाजीराव गोविंदराव यांचा शासनकाल झाली. या काळात मराठा साम्राज्य खिळखिळे झाले. १८०० साली वारसाहक्का साठी वाद झाल्या नंतर  आनंदराव गायकवाड गादीवर आले.त्यांना  कंपनी सरकारने  मदत केली . त्यांनी १८०२ साली ब्रिटिशांशी  तह करुन संरक्षण करार केला .तैनाती फौज रक्षणासाठी ठेवली आणि बडोदा  संस्थान ब्रिटीश अंकीत झाली.

स्वातंत्र्या नंतर १ मे १९४९ ला बडोदा संस्थान  भारतात विलीन झाले.

संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे.

पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) – १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) – इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे

( बडोदा संस्थानचे स्टँप पेपर व कोर्ट फी.)

संतोष मु चंदने. चिंचवड ,पुणे

Leave a Comment