महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,68,447

बसलेला दत्त, पुणे

By Discover Maharashtra Views: 1388 1 Min Read

बसलेला दत्त, सोमवार पेठ, पुणे –

सोमवार पेठेत नरपतगिरी चौकात एक आगळी वेगळी आणि फारच क्वचित आढळणारी पुण्यातली एकमेव बसलेल्या दत्तगुरूंची मूर्ती आहे. नरपतगिरी चौकातून श्री नागेश्वर मंदिराकडे जाताना चौकातच उजव्या बाजूला रॉयल मोटर्स हे दुकान आहे. त्या दुकानाच्या शेजारीच एक छान सुंदर छोटेसे मंदिर आहे. तेच हे बसलेल्या दत्तगुरूंचे मंदिर.(बसलेला दत्त, पुणे)

या मंदिरातल्या गाभाऱ्यात मध्यभागी त्रिमुखी दत्त, त्याच्या उजवीकडे माता अनसूया आणि डावीकडे अत्री ऋषी ह्यांच्या अर्धपद्मासनात बसलेल्या काळ्या पाषाणातील तीन सुंदर मूर्ती आहेत. या तीनही मूर्तीना अंगचीच पण साधीशी प्रभावळ आहे. या मूर्तींमधील अनसूयेच्या दोन्ही हातांत वीणा आहे, तर अत्री ऋषींच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात पोथी आहे. डाव्या मांडीजवळ एक भांडे आणि उजव्या मांडीजवळ कुत्रा कोरलेला आहे.

श्री दत्तगुरूंच्या शांत मुद्रांमधील तीनही मस्तकांवर एकत्रित असा टोकदार मुकुट आहे. मधल्या मस्तकावरील मुकुटाच्या भागात चंद्रकोर दिसते. दत्त गुरूंच्या खालच्या उजव्या हातात अक्षमाला, मधल्या उजव्या हातात चक्र, वरच्या उजव्या हातात त्रिशूळाला बांधलेला डमरू, वरच्या डाव्या हातात हरीण, मधल्या डाव्या हातात शंख, खालच्या डाव्या हातात पोथी आहे. यातील शंख-चक्र ही विष्णूची आयुधे, त्रिशूळ- डमरू हरीण ही शिवाची आयुधे आणि अक्षमाला व पोथी ही ब्रह्मदेवाची आयुधे आहेत.

संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर

पत्ता :
GVF8+3RH, Mangalwar Peth, Kasba Peth, Pune, Maharashtra 411011

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment