बावधन लेणी –
शिवकालीन सरदार पिसाळ यांचे सुभेदारी असलेले गांव, तसेच महार समाजातील व्यक्तीस छ. शिवाजी महाराज, यांनी पाटीलकी दिल्याची एकमेव नोंद असलेले गांव. अशा या ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गावचा भूतकाळ फक्त शिवाशाहीतीलच नाही, त्यापूर्वीचाही वारसा लाभलेले व अनेक ऐतिहासिक प्रसंग घडून गेलेले असे गांव. बावधन गाव अखंड पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्द आहे ते काशिनाथाच्याे बगाडासाठी.बावधन परिसर लेणी.
कसे पोहचाल – वाई-बावधन नाक्याधवरुन बावधन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने काही अंतर पुढे आल्यावर नजरेच्या टप्यात बावधन हे गाव दिसते, याच रस्त्याच्या उजव्या हाताला ऊन-वारा-पाऊस यांना सहन करीत सौंजाईचा डोंगर आपले स्वागतास वर्षानु-वर्ष, दिमाखात यशस्वीपणे इतिहासाचा साक्षी जपत ऊभा आहे. वाटसरुच काय पण रोज ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची नजर आपो-आप पडते ती डोंगरात काही उंचीवर असलेल्या कालभैरव मंदीरावर, मंदीरापर्यंत जाण्यासाठी दोन्ही प्रकारचे मार्ग आहेत. पायऱ्या आणि रस्त्याचा.
मंदीर अलीकडच्या काळात बांधलेले आहे. परंतु मंदीराचे निरिक्षण करताच आपल्या लक्षात येते की, बांधकामाच्या मागील बाजूस गुफा आहे. तिचे अवशेष स्पघष्ट जाणवतात. या गुफेवर स्थानिक ग्रामस्थांनी मंदीर बांधलेले आहे. परंतु आतील घडीव गुफा मात्र् लपून रहात नाहीत. त्यांच अस्तित्व टिकून आहे.
पूर्वी या गुफेच्या दर्शनी भागाच्या ढाच्याला आधार देण्यासाठी खांबाची व्यवस्था केलेली असावी असे वाटते कारण त्यातील एका खांबाचा आवशेष अद्याप उजव्या बाजूला आहे. काल ओघाणे येथील गुफेच्या सर्वच भागांची बदलत्या वातावरणाने (ऊन, वारा, पाऊस ) खूपच झीज झाली आहे व हे आधार स्तंभ नष्ट झाले आहेत. श्रध्दाळू भाविकांनी नव्याने खांब व भिंत बांधून आत गाभारा व ओसरी बांधली आहे आणि गाभाऱ्यात चलस्वरुप असलेली कालभैरवाच्या मूर्तीची स्थापन नंतरच्या काळाते केली आहे. डाव्या बाजूस एक खोली देखील बांधली आहे.
मुख्य मंदीराच्या डाव्या बाजूने प्रवेश करताच लगेच नजरेस दिसते ती बसण्यासाठी कलेली बैठकव्यवस्था, त्यामुळे ही बाहेरील ओसरी असावी, असा अणुमान करण्यास हरकत नाही. गुफेच्या मूळ ढाच्याची खूपच दूरावस्था झालेली आहे. उजव्या बाजूला आणखी एक बैठक व्यवस्था आहे परंतु तिच्यात नंतरच्या काळात बदल झालेला स्पष्ट जाणवतो. थोडाफार बदल करुन तिथे सर्वात प्रथम व्दारपाल व इतर तीन मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. सर्वच्या सर्व मूर्त्या हया चल पध्दतीच्या आहेत. ( कारण नंतर लिंपन करुन बसवलेचे स्पष्ट दृष्टीस दिसते.). छायाचित्रात दिसत आहे की, मूर्त्यांच्या समोर एैसपैस रिकामी जागा आहे.
उजव्या बाजूलाच थोडे पुढे गेले की, तेथे पिण्याच्या पाण्याची व्य वस्था करण्यात आली आहे. भिंतीमध्येच एक खाच पाडून पिण्यच्या पाण्याचा चौरसाकृती कुंड बांधण्यात आला आहे. त्याच्या घडीवपणा पहाता हे पाण्याचे टाके पूर्वीच खोदले आहे असे आपणास निसंशय अंदाज बांधायला भाग पडते. याचे कारण असे की, पाषाणाची झीज गुहेतील इतर दगडांशी मिळती जुळती दिसते. त्यामुळे निसंशय हे पाण्याचे टाके गुहेच्या निर्मिती काळातीलच आहे. या पाण्याच्या टाक्याच्या आणखी पूर्वेस एक छोटीशी पाय वाट आपल्याला दोन भिकू लेण्यांकडे घेऊन जाताता.
दोन्ही लेण्यांकडे जाण्याचा मार्ग कठीण आहे. सहजा-सहजी प्रवेश करता येत नाही कारण भूसकलनामुळे / किंवा एखादया नैसर्गिक आपत्तीने या दोन्ही शयनगृहाच्या ओसरीचे म्हणजेच बैठकीच्या खोलीचा बरचसा भाग डागरला आहे. त्यामुळे या लेण्यांकडे जाण्यासाठीचा प्रवेश मार्ग व दर्शनी भाग पूर्णपणे पडल्याने आतमध्ये प्रवेश करणे आवघड झाले आहे. परंतु या गुफा लेण्यांची बांधणी बोध्द लेण्यांच्या सारखीच दिसते यात संशय नाही.
या लेण्यांचा कालावधी तज्ञांच्या मते इ.स. पूर्व पहिले ते इ. स. चे 2 रे शतक असावा. कारण वाई एम.आय.डी.सी. (M.I.D.C.) च्या जवळच लोहार गांव आहे तेथे काही वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने संशोधन केले होते. तसेच पुणे येथील नामांकीत संशोधन संस्थांच्याही विद्यार्थ्यांनी भेट दिली होती. त्यांनी या लेण्यांचा बौध्द संप्रदायातील (धर्मातील) हिन- हाय पंथीय लेण्या असल्याचा निकर्ष काढला आहे. त्यामुळे या बावधन गाव हद्दीतील लेण्या देखील त्याच कालावधीतील असाव्या असा अनुमान करावासा वाटतो.
Post By – विजय अरविंद वाईकर