महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,30,145

बेगमपूर गढी

By Discover Maharashtra Views: 2618 2 Min Read

बेगमपूर गढी –

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूर गावात एक मोगलकालीन गढी आहे. बेगमपूर हे गाव सोलापूरपासून साधारण ४५ कि.मी अंतरावर आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेले पूर्वीचे घोडेश्वर म्हणजेच बेगमपूर होय. गढीचे बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार आजही व्यवस्थित आहे.पहारेकर्यांसाठी उभारलेल्या देवड्या आहेत. गढीमध्ये आत मस्जिद आहे. कारंजे आहे. गढीच्या मध्यभागी  मोठी कबर आहे. तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटबंदीला लागून दोन कबरी आहेत.

औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते इ.स.१७०१ सोलापूरमधील घोडेश्वरमधील भीमा नदीपलीकडील माचणूर भागात होता.सरदार संताजी घोरपडे आणि सरदार धनाजी जाधव यांच्या सततच्या हल्ल्यांपासून बचावासाठी आणि संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. औरंगजेब याने किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी उभारली होती.

किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद, अन्नधान्य लुटून नेत असत. अंधारात मराठे नदी ओलांडुन  छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. ही गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने माचनूर किल्ल्याला  सरंक्षण व बळकटी मिळावी म्हणून भीमा नदीच्या समोरील तीरावर लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपूर किल्ला किंवा गढी. ह्याच बेगमपूर किल्ल्याला स्थानिक घोडेश्वर म्हणून ओळखतात.ही गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने माचनूर किल्ल्याला  सरंक्षण व बळकटी मिळावी म्हणून भीमा नदीच्या समोरील तीरावर लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपूर किल्ला किंवा गढी. ह्याच बेगमपूर किल्ल्याला स्थानिक घोडेश्वर म्हणून ओळखतात.

टीम – पुढची मोहीम

Leave a Comment