महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,752

छत्रपती शिवराय स्थापित प्रतापगडची भवानी आई

By Discover Maharashtra Views: 1305 2 Min Read

छत्रपती शिवराय स्थापित प्रतापगडची भवानी आई –

शिवप्रतापाचा जिवंत साक्षीदार असणारा प्रतापगड महादरवाजा भक्कम टेहळणी बुरूज, चिलखती बांधणीची बुरूज रचना, भवानी मंदिर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार, जिजाऊंचा वाडा, दिंडी दरवाजा, रेडका बुरूज, केदारेवर महादेव मंदिर, सदर यशवंत बुरूज, घोरपड शिल्प, वेताळ मंदिर, कडेलोट स्थान इत्यादी अनेक गौरवशाली ऐतिहासिक अवशेष जपून आहे.

गडावरील भवानीमातेची अष्टभूजा महिषासुरमíदनीची सिंहारूढ मूर्ती लक्षवेधक आहे. शिवाजीराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून ही मूर्ती घडवून घेतली व जुलै १६६१मध्ये तिची गडावर स्थापना केली. देवीचा गाभारा लहानसा असून येथील शिल्पकाम लाकडीच आहे. देवीच्या खर्चासाठी म्हणून पंधरा गावांचे उपन्न लावून दिल्याची नोंद आहे. याच देवीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवारीचा प्रसाद दिला अशी कथा जनमानसात रूढ आहे.

परमानंद कवीच्या संस्कृत शिवभारतात ‘भवानी तलवार’ हे नाव का पडले याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. प्रतापगड येथील मूर्तीसंबंधी चिटणीस बखरीत पुढील उल्लेख मिळतो ‘पर्वताचा राज लीलासेन याचे राज्यापावेतो जाऊन त्रिशूळगंडकी व श्वेतगंडकी आणि सरस्वती संगमी शिळेचा शोध करून उत्तम शिळा प्राप्त झाली. सिलपी प्रांतीचे हुनरवंद आणून मूर्ती सिद्ध केली आणि मोरोपंत प्रधान यास मागमे पाठवून प्रतिष्ठा केली.

सभासद बखरीत भवानीने राजांना मार्गदर्शन केल्याची व अभय दिल्याची अनेक वर्णने आहेत. प्रतापगडाच्या ऐतिहासिक साधनांचे संकलन मांडताना व संशोधित करताना येथील भौगोलिक स्थानाच्या महत्त्वाचे व बदलत्या बदलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

शिवकाळात नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उकृष्ट शिळा मिळवून गडावरील सध्या असणारी भवानी घडवली गेली, असाही संदर्भ मिळतो.

Leave a Comment