महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,929

खानदेशातील भिल्ल

By Discover Maharashtra Views: 3564 9 Min Read

खानदेशातील भिल्ल –

खानदेशातील मुळ रहिवासी जमात ही कोळी व भिल्ल हीच होते. बाकीचे नंतर येऊन वसती केली हे मागच्या लेखात बघितले. या भिल्ल समाजाची ओळख आणि त्यांचा इतिहास हा खानदेशी इतिहासाचा महत्त्वाचा घटक आहे नव्हे अविभाज्य घटक आहे. टॉलेमीच्या लिखाणात भिल्ल व गोंड यांचा संदर्भ येतो. आजही भिल्ल मोठ्या प्रमाणात आहेत तर गोंड फक्त चाळीसगाव तालुक्यातील काही ठिकाणी आहे. यादवकालीन राजांच्या नावांच्या यादीत भिल्लम हे नाव पाचदा आले आहे.(खानदेशातील भिल्ल) खानदेशातील वंजारी समाज हा निमाड प्रांत आणि माळवा येथून गायी, बैल यांची उत्कृष्ट जमात आणून व्यापार करतात. हा परंपरागत व्यवसाय आहे.

अकराव्या शतकात गुजरात मधील काही गुर्जर आणि इतर लोक कुणबी खानदेशात स्थलांतरीत झाले. त्यानंतर चौदाव्या शतकात अरबी राजे हे खानदेशात आले जी मोठी परदेशी बाब होती. भिल्ल व कोळी जमात सोडून इतर लोक पांगले. सोळाव्या शतकात अकबराने बऱ्याच भिल्लांना ,गोंड आणि कुणब्यांना अधिकारी जागा दिल्या. १८०३ मधील दुष्काळ पडला तेव्हा भिल्ल व कोळी समाजाला मोठा फटका बसला. तोपर्यत बरीच सळमिसळ झाली होती.

वंजारी हे बंद बैलगाडी वापरत असत, सतत प्रवासही करत बैलगाडी ही सजववेली व विशेष होती. वंजारी आणि अहिर हे मुख्य जमाती आणि खानदेश विशेष आहे.

अक्राणी तालुक्यातील  जंगलाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर सैदवा पास हा महत्वाचा पास आहे, जो पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. तोरणमाळच्या डोंगराच्या रांगांमध्ये दोन भाग पडतात एक उत्तर आणि दक्षिणेकडे पसरलेली आहे ती अनियमित पठार साठ किलोमीटर लांब आणि रूंदीला पंधरा ते तीस किलोमीटर अंतर असेल, जो अक्राणी परगणा म्हटला जायचा आता अक्राणी तालुका आहे, जो उत्तरेकडे नर्मदा आणि पुर्वेकडे बारवानी स्टेट आणि तोरणमाळ आणि दक्षिणेकडे सुलतानपूर आणि कुकुरमुंडा  शिवाय मेहवास आणि भुदावल आणि नाल  आणि पश्र्चिमेला काठी जुनी संस्थाने होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खेडे हे महु आणि जंगली आंबा यांच्या दाट झाटीत लपलेले होती. यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे तोरणमाळ. पुर्वेकडून अक्राणीची रांग दिसते तर उत्तर पश्चिम भागात कोमल आणि उदाड आहे दोन्ही दुर्गम आणि खडतर आहे. चढणे शक्य नाही. दक्षिण पश्चिम भागात पसरट टेकड्या ह्या अस्तंभा शिखरे आहेत. काकर्डाजवळची टेकडी ओल्वाल तर भुलाल आणि भोदलाल ही शिखरे तोरणमाळ जवळची वैशिष्ट्यपूर्ण शिखरे आहेत. या डोंगराच्या कुशीत चांदी तांबे आणि लोखंड लपलेले आहेत असे म्हटले जाते.

अक्राणी परिसरात राहणारे लोक हे कष्टाळू, आहेत. वारली, आणि पावरी यापैकी पावरी हे राजपूत वंशातील आहे जे इतर वारली आणि भिल्लांपासून वेगळी आहे. पशुपालक आहे. आदिवासी जमाती आणि त्यांची जंगलं यांचा फार जवळचा संबंध असतो आणि ते सोडून जायला तयार नसतात. पावरी लोक उंचसखल डोंगराळ भागात चांगली शेती करतात.गहू, आणि डाळी तसेच बाजरी,ज्वारी,नागली, तांदूळ लावतात. हिवाळ्यात तूरही मोठ्या प्रमाणात लावलेली दिसते.

पाच महत्वाचे प्राचीन मार्ग या डोंगररांगांमध्ये जातात. सर्वात जास्त वापरला जाणारा नवेगाव पास बैलगाडी आणि घोडागाडी साठी होता आता नीट रस्ता बनवला आहे. शहादावरून जातो. दोधाबुवा हा दुसरा पास जो धडगाव ते सुरत आहे. पूर्वी फक्त पायवाट होती आणि आता रस्ता आहे.चांदसेली पास कुकुरमुडा आणि तळोदा सर्वात बिकट होता फक्त घोडे जात असत.सुरपण पास जो काठी संस्थान येथे जात असे. अवघड आणि बिकट असल्याने हे मार्ग जरी स्थानिक पध्दतीने जोडले असले तरी प्रत्येकी मुख्य मार्ग होते. म्हणून आदिवासी वस्त्या जरी डोंगराच्या कपारीत असल्यातरी एक प्रकारे  दैनंदिन गरजा बाजारहाट आणि व्यापर तसेच  जत्रेसारख्या सांस्कृतिक बाबतीत जोडलेले राहिले आहे. इतक्या दळणवळणाच्या मार्ग असल्याने सांस्कृतिक आणि राजकीय प्रभाव पडला होता.

आदिवासी संस्थाने

मौखिक परंपरेने या प्रदेशाचे नाव “डाब” दाब असे आहे. तत्कालीन हिडिंबा जंगल म्हणजे तळोदा परिसरातील अक्कलकुवा तालुक्यातील मेवासी संस्थाने होती. हल्दीघाटीच्या युध्दानंतर राणा प्रताप यांची बहिण इकडे निवासाला आली म्हणून अक्राणी महल म्हटले जाते. मोतिया भिल्ल यांचे राज्य असल्याचे मौखिक परंपरा सांगते. मथा भिल्ल या नावाने ओळखला जातो. तसच त्यांचा कपटाने आनंददेव भिल्ल याने वध केला आणि त्याचे धड जिथे पुरले तो भाग धडगाव परिसर म्हणून ओळखला जातो.इ.स.१८१८ पर्यंत हा परगणा धडगाव परगणा मतवारचा राणा भाऊसिंग याने पेंशन घेऊन ब्रिटीश सरकारने खालसा केले. अक्राणी आणि धडगाव ही अशी संस्थाने होती. इतर संस्थानात काठी, गंठा, सागबारा, रायसिंगपूर, सिंगनूर नाला, भांगरपाणी, आमोदा, हरिपूर, सजणाण ही होती तर मेवासी, लारिया, सागबारा हे तळोदा परिसरातील होते.

सातपुड्याच्या कुशीतील भिल्लांची संस्थाने नावावरून म्हणजे कुळ नावावरून अशी होती. पाडवी – बुधावल(काढी), नाला, सिंगनूर सजठाण, भगदरी, वसावे- गंढा, सागबारा, वळवी- रायसिंगपूर, नाईक- भागरापाणी, आमदा, मोर अंबा ही होय. तेथील संस्थानिक स्वतला चिप्टन राजे म्हणत असत. स्वातंत्र संग्रामात आदिवासी यांनी बरेच उठाव केले यांना स्वातंत्र्य संग्रामात जोडायचे की नाही हा वेगळा विषय आहे पण १८०० ते १८८५ या काळातील उठावाची वर्णने केली तर काजल राणी आणि हिऱ्या नाईक १८२२ मध्ये, शिवराम लोहार १८२५ मध्ये, डांगचे राजे प्रतापसिंग १८४०, तंट्या भिल्ल १८२८-१८८९, कुंवरसिंग वसावा १८४१, उमाजी नाईक काजीसिंग १८५७, देवाजी राऊत १८५७ इत्यादिंनी बलीदान दिले आहे. खाज्या नाईक आणि भीम नाईक यांच्या कहाण्या वेगळ्याच आहे.

प्रत्येक धर्मप्रसार करणाऱ्या राजसत्ता तिथपर्यंत पोचलेल्या आहे. पण मुळच्या दैनंदिन कष्टांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. आजही एकीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. इमारती हाटेले उभी रहात आहेत पण आदिवासी मार्च महिन्यात सहा सात किलोमीटर अंतरावरून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

भिल्ल

खानदेशातील सर्वात जास्त संख्या असलेला आदिवासी वर्ग म्हणजे भिल्ल होय. खानदेश गॅझेटियर १८८० मधील आकडेवारी आणि त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे. भिल्ल १,२६७९१, वंजारी ३६५७२, पारधी ४५०५, कोकणी ८२०१, आणि कानडा ८१८ ही होते तर १९७२ मध्ये १,२००२६ एवढी होती. मेवाड, माळवा, खानदेश आणि गुजरात या भागात विखुरलेले होते अशी नोंद आहे. मध्य भारत सोडून राजपुताना, गुजरात, आणि खानदेशी, भिल्ल हे अजमेर, जैसलमेर भागात आहे तर उत्तर पश्चिम भागात बरेली भांडा भागात आहे. खानदेश भिल्ल असल्यामुळे ते आशिरगड सोडून बुलढाणा भागातील गोंड प्रदेशाकडे जात नाहीत. नगर जिल्ह्यातील काही भागात आहे तसेच कुडकी नदीच्या खोऱ्यात जुन्नर भागात आहे. कोकण भागात आणि तापीच्या काठावर वसलेले कोळी भिल्ल आहेत.तापीच्या उत्तरेकडील बाजू गुजरात आणि डोंगराळ भागात कोळी भिल्ल आहे.जे परिस्थिती मुळे माळवा भागात स्थलांतर करून राहिले. पुढील काठेवाड आणि कच्छ भागात पसरले.थरच्या आणि पारकर भागात तर कमी प्रमाणात सिंध मध्ये आहे. ही चर्चा खानदेश गझेटीयर मध्ये आहे. खानदेश येथील आधीच्या नोंदी नुसार सातपुड्यात असलेले भिल्ल मेवाड आणि मेवाडच्या दक्षिणेकडे स्थलांतर करण्यासाठी राजपूत व मुस्लिम राज्यकर्त्यांनी भाग पाडले.ज्यांनी गुजरात आणि माळवा जिंकला होता. म्हणून मग खानदेश भर ते तुरळकच पण सगळीकडे पसरले. जे काही गावात वसले आणि मजूरी करून जगू लागले त्यांत आणि मूळ निवासी फरक पडला. काही राजपूत राज्यकर्त्यांबरोबर तर काही नंतरच्या मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर वसले त्यामुळे मूळची जिवनपध्दती संपून गेली.  सोळाव्या शतकात मोगल बादशहाच्या मते ते कष्टाळू व प्रामाणिक होते म्हणून सैन्यात तर काही जमिनी दिल्या गेल्या आणि वापर झाला. अठराव्या शतकात मराठ्यांकडे सत्ता गेली आणि परत फरफट गोंधळ झाला आणि त्यांनी स्वतला स्वतंत्र मानायला सुरवात केली. कुणबी आणि भिल्ल यांच्यात  स्थानिक वसलेले शेतकरी आणि भिल्ल चोर लुटारू अशी विभागणी झाली.

हा गोंधळ चालु राहिला. त्यामुळे सपाटीवर राहून शेतमजूर, जंगलनिवासी पण लाकुडफाटा चोरी आणि लूटमार करणारे जे मिश्र तर संपूर्ण जंगल निवासी अशी विभागणी झाली. जंगलात रहाणारे बारडा, धानका, ढोरेपीस, गावित, खोतीस, माथ्वादिस, मावची, नहाल, वारली सह्याद्री आणि डांगची हे होय तर मिश्र मध्ये भिलाला, अर्धेभिल्ल, अर्धेराजपुत, आणि कुणबी, तर अर्धेमुस्लिम अर्धेभिल्ल तडवी उत्तर भागात सापडतात. आणि निर्धी हे पुर्वेकडील बाजूस आहे. तर खेड्यात भिलाटी म्हणून जवळपास प्रत्येक गावात वसलेले पवार, माळी, बरडा, सोनवणे, म़ोरी, गायकवाड शिंदे जाधव, ठाकुर, अहिर असे बरीच खोलवर जातीउपजाती आहे.खानदेशातील भिल्ल.

माहिती संकलन  –

Leave a Comment