खानदेशातील भिल्ल भाग ९ | आदिवासींचे १८०० ते १८८५ मधील आंदोलन-
इंग्रजी राजवट सुरू झाल्यावर त्याला विरोध करणाऱ्या लोकांची नावे राणी काजल, हिऱ्या नाईक १८२२, शिवराम लोहार १८२५, डांगचे राजे प्रतापसिंह १८४०, तंट्या भिल्ल १८२८-१८८९, कुवरसिंग वसावा १८४१, उमाजी नाईक,भागोजी नाईक १८५५-५९, भिमा नाईक, काजिसिंग नाईक १८५७ ,देवाजी राऊत १८५७ या आदिवासी वीरांनी उठावकाळात महाराष्ट्रातील तसेण खानदेशातील क्रांतीकारकांनी आपल्या हक्कासाठी ब्रिटीश सत्तेला आव्हान देऊन बलिदान दिले.(खानदेशातील भिल्ल भाग ९)
नंदुरबार जिल्ह्यातील वसावा, वळवी, पाडवी, गावीत, मावची कोकणी यांचे मुळ स्थान कुठले आहे याची भिलोरी भाषेतील लोकगीतावरून स्पष्ट होते.
जंगलूमेने भिलोरी राजा आमू, जंगलमेने लोक
डोग्या उती आला आमू ,राजा मेवासी
खाड्यां उती आला आमू जंगलमेने लोक
दौडी चाला आला आमू राजा मेवासी
हल्दिघाटाच्या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव पत्करावा लागला तेव्हा भिल्ल आदिवासी लोकांनी स्थलांतर केले. स्थलांतर करतांना नद्या नाले व डोंगरात उतरून महाराष्ट्रातील सातपुड्याच्या कुशीत ते स्थिरावले.
भिल्लांचा इतिहास आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध भिल्लांचे लढे
वैदिक वाडमयात निषाद, किरात, शबर हे नाव असलेल्या लोकांचा वारंवार उल्लेख येतो. हे लोक मध्यभारतात रहातात. नंतरच्या काळात रामायण महाभारतातील कावळ्यापेक्षा काळे, धरतीचे पापी प्राणी, खुजे, लुटारू, नरभक्षक वगैरे उपहासात्मक व हीन लेखणाऱ्या शब्दांनी वर्णन येते. गुरू द्रोणाचार्य यांनी धनुर्धर विद्या न देण्यास नकार दिला. तो एकलव्य, शबरी भिल्लिण एकुणच यांच्या बद्दलची घृणा या वाड्मयीन साहित्यात दिसते. दस्यूंचे वर्णन यांच्या सारखेच आहे तर आदिवासी टोळ्या गण म्हणून ओळखल्या जात असाव्यात कारण त्या गणाच्या प्रमुखाला गणनायक किंवा गणपति म्हणत असे दिसते. सर्वात आधी त्यांना मान द्यायची पध्दत होती.
आजही कुणाला पहिला मान द्यायचा झाला तर त्यास गण अथवा नाईक म्हणतो. ही गणराज्य आपल्या अधीन रहावी म्हणून प्रत्येक काळातील सम्राटांनी प्रयत्न केले. काही ना ठार केले. या आदिवासी टोळ्यांना पराभूत करून मांडलिक करणे अवघड होते. एक गणनायक मेला तर दुसरा तयार होत असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्र मध्ये याबाबत फार वेगळा सल्ला दिला आहे, ” गणनायकांची आपसात भांडणे लावून,त्यांना दारूचे व्यसन लाऊन सुंदर स्त्रियांना पाठवून त्यांची शक्ती कमी करावी. त्याशिवाय त्यांच्यावर विजय मिळवता येणार नाही”.
कलिंग देशाचा पराक्रमी योध्दा वीर कलिंग हा भिल्ल होता. भिल्लांचा पहिला ऐतिहासिक उल्लेख हा इ.स. ६०० मध्ये मिळतो. माळव्याचे राज्य हे भिल्ल प्रमुखाचे होते. कथासरितसागर या ग्रंथात माळव्याच्या भिल्ल राजाने या प्रदेशातून पुढे जाण्यास बंदी घातली होती असे उल्लेख आहेत. माळवा हा प्रांत उत्तरपथ आणि दक्षिणपथ यांच्यात जोडणारा प्राचीन सार्थवाह पथ असल्याने मौर्य काळापासून ते मुगलांना आपल्या ताब्यात हवा होता. प्राचीन खानदेश या लिखाणात ते येईलच.
आधीपासून भिल्ला़ची लहान लहान राज्ये होती. टालेमीने केलेल्या वर्णनावरून म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी विंध्य पर्वत,अरवली,सातपुडा पर्वतावरील प्रदेशात महानदी, नर्मदा, तापी नद्यांच्या काठी भिलटे आणि गोंडली लोक रहातात असे उल्लेख आहेत.
उत्तरेकडून येणाऱ्या प्रत्येक सत्तेशी नंतरच्या काळात अगदी सम्राट अशोकाच्या शिलालेखात निषाद, अटवी राज्यांचे उल्लेख आहे तर राजपुतांच्या टोळ्यांशी लढावे लागले. नंतरच्या आलेल्या मुस्लीम आक्रमणाकर्त्यांशी सुध्दा संघर्ष झाला. त्या लढायात पराभव पत्करावा लागला आणि पिछेहाट झाली आणि त्यांना अरवली, विंध्य व सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा मध्ये आश्रय घ्यावा लागला.
भिल्ल जमातीचा जवळून अभ्यास करणारा कर्नल टोड हा अधिकारी होता. त्यांची पुस्तके उपलब्ध आहेत.
स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक भिल्लांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजांनी काही भिल्लांचे शौर्य बघून त्यांना जहागिरी दिली जी संस्थाने म्हणून ओळखला जातो. स्वबळावर संस्थाने निर्माण करणाऱ्यांत कुमाऱ्या वसावा आणि उमड्या वसावे हा सागबारा संस्थानाचा संस्थापक होता तर रायसिंग वळवेच्या नावावरून रायसिंगपूर हे ओळखले जाते. या संस्थानाचे खरे नाव गव्हाळी संस्थान हे होते. काठी, सिंगनूर, नाला, सोजदाण म्हणजे नवलपूर ही पाडवी वंशजाची संस्थाने होती.
खरे तर इंग्रज्यांनी जहागिरी दिली हे जरी खरे असले तरी ती त्यांनी खालसा केली हेच म्हणणे योग्य ठरेल. खाज्या नाईक, उमाजी नाईक व भागोजी नाईक यांनी प्रखर लढा दिला. सातपुड्याच्या पायथ्याशी कालुसिंग भिल्ल यानेही जबरदस्त संघर्ष केला याशिवाय रुमाल्याबांड वडगाव, तात्या मामा मध्यप्रदेशातील बिजासन घाटाची सरहद्दीवर, भुऱ्या तिरसिंग भिल्ल, हा शहादा तालुक्यातील हे शेठ सावकारांकडून खंडणी वसूल करून गरीबांना दानधर्म करीत असत.(खानदेशातील भिल्ल भाग ९)
माहिती संकलन –