महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,84,904

भोर संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 3863 3 Min Read

भोर संस्थान | बखर संस्थानांची –

भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एकसंस्थान होते. इ.स. १६९७ – इ.स. १९४८ जधानी भोर. भोरसंस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते. पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी –

पंतसचिव शंकराजी नारायण (कार्यकाल १६९७ – १७०७)
पंतसचिव नारो शंकर (कार्यकाल १७०७ – १७५७) – शंकरजी नारायण ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी] (कार्यकाल १७३७ – १७५७) – नारो शंकर ह्यांचा पुतण्या
पंतसचिव सदाशिवराव (कार्यकाल १७५७ – १७८७) – चिमणाजी ह्यांचे जेष्ठ पुत्र
पंतसचिव रघुनाथराव (कार्यकाल १७८७ – १७९१) – चिमणाजी ह्यांचे कनिष्ठ पुत्र
पंतसचिव शंकरराव (कार्यकाल १७९१ – १७९८) – रघुनाथराव ह्यांचे चिरंजीव
पंतसचिव चिमणाजी दुसरे (१७९८ – १८२७) – शंकरराव ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव रघुनाथ चिमणाजी (१८२७ – १८३७)- चिमणाजी दुसरे ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (१८३९ – १८७१) – रघुनाथराव चिमणाजी ह्यांचे दत्तक पुत्र
पंतसचिव शंकर चिमणाजी (१८७१ – १९२२) – चिमणाजी रघुनाथ ह्यांची चिरंजीव
पंतसचिव रघुनाथ शंकर भाऊसाहेब पंडित (१९२२ – १९५१) – शेवटचे पंतसचिव

८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.

भोर संस्थान –

संस्थानचा प्रदेश पुणे, सातारा व कुलाबा या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत यात संस्थानांत रोहिडाराजगड, तोरणा, तुंगतिकोना आणि सुधागडसरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत.  भोरच्या अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. .

संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून  पुण्याच्या मांगदरी गांवीं येऊन राहिला. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली.

छत्रपती राजाराम महाराज जिंजीस गेले, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते.  अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडत. त्यामुळें छत्रपती राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) छत्रपती राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजाराम महाराजांनी त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें.

संस्थानने इ. स. १८१८ पासून सातारची व १८४८ पासून इंग्रजांची मांडलिकी पतकरली. राजेसाहेबांना पूर्ण मुलकी – फौजदारी अधिकार होते.त्या मुळे स्टँप पेपर छापायची परवानगी होती. सन १९०३ मध्यें त्यांनां ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. व पुढें १९११ सालीं आणखी दोन तोफांच्या सलामीचा मान मिळाला.

( भोर संस्थानातील वेगवेगळे चार स्टँप पेपर व court fee त्यातील एक दुर्मिळ संग्रहात. )

संतोष मु चंदने, चिंचवड पुणे.

Leave a comment