महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,083

भुताटकी व भूत मागे लावणे

By Discover Maharashtra Views: 1519 8 Min Read

भुताटकी व भूत मागे लावणे –

चांदजी कोंढाळकर याने गुणाजी कोंढाळकर याचे मागे भूत लाविले. भुताटकी केल्याने गुणाजी कोंढाळकर मरण पावला. त्याच्या घराचा , मुलांचा , गुरांचा नाश झाला. याबाबतचीची तक्रार गुणाजी याचा मुलगा बाळोजी याने गावातील मान्यवर पंचांकडे केली असता चांदजी कोंढाळकर याने स्वतःच्या ताब्यातील भूत बाळोजी कोंढाळकर याच्या मागे लावली हा गुन्हा सर्वांसमोर सिद्ध झाला. सदर पत्रातील याबाबतची हकीगत व पंचांचा निर्णय वाचनीय आहे.(भुताटकी)

दसऱ्याच्या दिवशी देवदेवस्की करणाऱ्या भगताने देवास वाहिलेला मुखवटा व रुमाल गुणाजी कोंढाळकर घेऊन जात असताना भगत चांदजी कोंढाळकर याने तो रुमाल स्वतःच्या दरवाज्यास बांधण्यासाठी मागितला. यावरून दोघात शाब्दिक वाद होऊन देवाचा रुमाल देवाकडे राहू दे , तू हि घेऊ नको मी हि घेत नाही असे गुणाजी कोंढाळकर याने सुचविले. गुणाजी कोंढाळकर घरी तडक घरी गेला असता त्यास ताप येऊन डोके दुखु लागले. गुणाजी याचा मुलगा बाळोजी देवाचा अंगारा घेण्यासाठी आला असता त्याने देवास कौल लाविला. चांदजी कोंढाळकर याने भूत मागे लावले असा कौल दिला गेला . बाळोजी कोंढाळकर याने वडिलांना बरे वाटावे यासाठी चांदजी कोंढाळकर याजकडे अंगारा मागितला परंतु चांदजी कोंढाळकर याने अंगारा देण्यास नकार दिला. चार दिवसांनी गुणाजी कोंढाळकर मरण पावला.

बाळोजी कोंढाळकर याने चांदजी कोंढाळकर याला गावासमोर याबाबत दोष दिला. कि तू रक्ताचा टीळा लावलास. चांदजी कोंढाळकर याने सर्व गावासमोर मान्य केले कि त्यानेच रक्ताचा टिळा लावला. व अजून काय घडले असे विचारले. काही दिवसांनी गुरे ,वासरे ,बैल मरण पावले. थोरला मुलगा भुतांनी मारिला, धाकट्या मुलाची दृष्टीगेली व तो आंधळा झाला. म्हैस चारापाणी खाईनाशी झाली. बाळोजी कोंढाळकर याने म्हैस वाचविण्यासाठी चांदजी कोंढाळकरकडे अंगारा मागितला असता त्याने अंगारा देण्यास नकार दिला.

बाळोजी कोंढाळकर याने देवदेवस्की करणारा भगत राणो चापाजी याच्याकडे मदत मागितली. गावातील पाच प्रतिष्ठित लोकांना घेऊन देवास कौल लाविला असता चांदजी कोंढाळकर याने भूत मागे लावून बाळाजीच्या घराचा नाश केला असा कौल दिला. चांदजी कोंढाळकर याने ती भुते आपण मागे लावल्याचे नाकारले. भगत राणोजी याने मार्ग सुचविला कि चांदजी कोंढाळकर हा स्वतः भगत आहे तेव्हा त्याने स्वतःच्या हाताने देवास कौल लावावा व देवास विचारावे कि “ मी भुते लावून बाळोजी कोंढाळकर याचे घर बुडविले हे खरे आहे काय ?”. त्यावेळी देवाने कौल दिला कि चांदजी कोंढाळकर यानेच भूत मागे लावून बाळोजी कोंढाळकर याचे घर बुडविले.

भगत राणो चापाजी याने एक मार्ग सुचविला कि चांदजी कोंढाळकर याने पाय पसरून मरत असलेल्या म्हैसीस अंगारा लावावा. जर म्हैस वाचली तर चांदजी कोंढाळकर याने भुते मागे लावली हे खरे. म्हैस वाचली नाही तर देवाने दिलेला कौल खोटा असे ठरले. त्याप्रमाणे चांदजी कोंढाळकर याने म्हशीस अंगारा लावला असता म्हैस बरी होऊन उभी राहिली व इतर गुरांसोबत जावून चरू लागली. सदर घटनेमुळे पंचानी निर्णय दिला कि चांदजी कोंढाळकर याने भुते बाळोजी कोंढाळकर याच्या मागे लावली हे सिद्ध झाले. गोतसभेत मसलत करून पंचानी निर्णय दिला कि चांदजी कोंढाळकर याची तक्रार करून मेलेली माणसे व झालेले नुकसान भरून येणार नाही. झाले ते झाले. यापुढे बाळोजी कोंढाळकर यास काही नुकसान झाले तर चांदजी कोंढाळकर यास गुन्हेगार मानायचे आणि याच्यावर पाच लोकांच्या साक्षीने खालीलप्रमाणे कलमे लावावी.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ४३.

श्रीरोहिडमल.

श्री.

”करीना बाबाजी कोंढालकर यास चांदजी कोंढालकर यानें भुतें लाऊन घर बुडविलें. गुणाजी कोंढालकर दसरियाचा घट उठविला, ते दिवसी मुखवटा व रुमाल भगताने श्री यांस वाईला होता. तो गुणाजी घेऊन जाऊ लागला. त्यावर चांदजी बोलिला की, गुणाजी पा। हा रुमाल माझे तरवास बांधावयास देणे. गुणाजी बोलिला कीं, चांदजी हा देवाचा रुमाल देवास असों दे, तुलाहि देत नाहीं, मीहि घेत नाहीं, आल्या दसरियास देवाचा देवास पांघरून. ह्मणून गुणाजी बोलिला. त्यावर गुणाजीची व चांदजीची बोली जाली, ह्मणऊन कटकटले. तेच दिवसी गुणाजी घरास गेला. घरीं गेल्यावर त्याला हींव येऊन डोई दुखूं लागली, ह्मणून बाळोजी देवास अंगारियास आला. देवास प्रसाद लाविले. देवानें प्रसाद दिले कीं, चांदजीनें देव व भुतें पेंसली. ह्मणून बाळोजी चांदजीस ह्मणूं लागला कीं, तूं माझ्या बाला अंगारा दे. तो अंगारा देईना. मग च्यार दिवसांनीं गुणाजी मेला. त्यावर मूळमाती घ्यावयास श्रीजननीजवळ नेला.

तेथें बाळोजी चांदजीस बोलिला कीं, तूं रगताचा टिळा लाविलास. चांदजी सारे गांवकरियादेखत बोलिला कीं, मी टिळा लाविला. अझून काय झाले ? त्यावर गुरें वासरें कितीक मेले. बैल मेले, मी कोठें गेलों नाहीं. त्या देवास पुढें तो ह्मणें कीं, माझी लाग मीच मारितों. त्यास माझे लेक दो. थोरला लेक भुतांनीं मारिला. धाकला लेक याचे डोळे गेले. आंधळा जाला. याउपर सन खमस खमसैनात एकच ह्मस दोन महिने चारापाणी खाईना. देवास पुसे. तो ह्मणे माझी लाग. त्यावर चापजीस ह्मणे की तू माझी ह्मस वाचव. तो काही आंगारा नेदी. मग मी श्रीराजजाईस गेलो. तेथे मनास आणील. तिनें सांगितले की, चापजीने तुजवर देव भुतें घालून, तुझे घर व तुझा बाप लेक मारिला हे खरे; तू त्याच्या गला पड. ह्मणऊन गावास आलो. श्रीराणजाईचा भगत राणोजी गोलाहि आणीला. देवळी पाच जण भले लोक मेलऊन राणोजी गोली याने श्री रोहिडमलास प्रसाद लाविले. त्याणेहि प्रसाद दिले की, चापजीने भुते लाऊन याचे घर मारिले हे खरे.

तो हुबर घालू लागला की, माझी भुते नव्हत. त्यावर राणो चापजीस बोलिला की, तूहि भगत आहेस. तूच आपले हते प्रसाद लाव. आणि देवास पूस, हे खरे की काय ? मग चापजीने आपल्या हाते प्रसाद लाविले. मी भुते लाऊन बालोजीचे घर बुडविले हे खरे की काय ? देवाने प्रसाद दिला की, चापजी तूच भुते लाऊन बालोजीचे घर बुडविले हे खरे. ऐसे पउतालियानेंसी सांगितले. मग चापाजी बोलिले की बरे, तुझे अंगी कलंक लागिले, आतां ते ह्मस पाय पसरून मरते. तिला निकालसपण अंगारा लाव. ते उठली ह्मणजे हे खरे. नाही तर देव भगत सांगतात हे अगदी लटके. त्यास चापाजीने त्याचे ह्मसीस अंगारा लाविला. दोन महिने ह्मस पडली होती ते उठोन गुरांत जाऊन चरू लागली.

मग पाचांना साक्ष आली की चापजीने भुते लाविली हे खरे. मग पाच जण बोलिले की बालोजी चापजीची भुते खरी परंतु तू आमचे ऐक. याची डगडग करू नको. यास दिवाणांत नेलीयाने तुझा बाप लेक उठेनात. मागे जाले ते जाले. आता पुढं तुझे माणूस अगर गुरूं काबड याच्या भुताने मारिले ह्मणजे गोताचा खोआ दिवाणाचा गुन्हेगार ह्मणून बोलोन, याचे अंगी पाचाचे साक्षी न सिकले येणे प्रमाणे लाविली.”

मूल मारिला कलम १ गुणाजी कोंढालकर भूते लाऊन
गुर व बैल मारिले कलम १ मारिला कलम १
ऐसी देव व खेलोजी व कालकाई व चेडे २ ऐसी भुते लाऊन माझे घर बुडविले. यासी साक्षी ऐणेप्रमाणे

सूर्याजी खोपडे व साबाजी तुलाजी काटे चा।
खोपडे देशमुख विचित्रगड
ता। उत्रोली तान्हाजी कंक चाकर किले
एसजी प॥ कुसले मौजे करजी विचित्रगड
तुकोजी जाधव किले
येसजी लोकरा विचित्रगड
माहार मौजे पानवाहल सटवाजी माडरा च॥
१ खंडा बिन धाकनाक विचित्रगड १
१ सिवनाक बिन धाका —— २

श्री. नागेश सावंत

Leave a Comment