महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,794

बिचवा

By Discover Maharashtra Views: 1778 2 Min Read

बिचवा –

बिचवा अत्यंत घातक व विश्वासू  लहान शस्त्र. बिचवाचा अपभ्रंश बिछवा ( विंचू ) विंचवाच शस्त्र म्हणजे त्याची नांगी आणि या नांगीने त्याने दंश केलातर नांगीतल्या विषाने माणूस तडफडतो किवा मरण पावतो. या बिछव्या ( विंचू ) च्या नांगीवरुन या शस्त्राला नाव पडले बिचवा.

बिचवा हे शस्त्राच पात विंचवाच्या नांगी पेक्षा भयानक असून याचा वार कधी खाली नाही गेला. याच्या वाराने होणारी जखम ही फार वेदनादायक असते. विंचवाच्या नांग्या प्रमाणे या शस्त्राच्या पात्याला विष पाजले असते. या विषाच पात्याने जखम झाली की रक्तात विष भिनल जात.

एक वेळ विंचवाच विष उतरवल जाईल पण या बिचव्याच्या हल्याने शस्त्रू तडफडून मरणार आहे. हे शस्त्र पंजात किवा मुठीत पकडले जाते. बोटांच्या सुरक्षितते साठी यावर परज असते. उजव्या किवा डाव्या हाताचे बिचवे असतात.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधा साठी वाघनखा सोबत बिचवाही वापरला होता असे इतिहासात काही ठिकाणी उल्लेख मिळतात.

वाघनख व बिचवा हे दोन वेगळे शस्त्र आहेत पण नंतर १८ व्या शतकात वाघनख व बिचवा मिळून एकच शस्त्र बनलेले दिसतात.

sometimes a bichwa blade was attached to one end of the baghnakh so that it could be put to duel use. the bichwa literally means a scorpion. this dagger is originly a #maratha weapon ,  and has a short , two edged, double curved blade The hilt which is padded towards its knuckles, is formed as a loop in which the hand is placed.

या बिचव्यावर असण-या परज ह्या सुंदर सुशोभित केल्या असतात. परजेला कधी कधी गादी बसवलेली असते. हे शस्त्र शेल्यात किवा कमरेला लावलेल असत. हे लहान असल्याने दस्तानीत सहज लपवता येते. शस्त्र ही लहान असली तरी काम मोठ करतात. वेळोवेळी ह्या शस्त्रांनी आपआपले काम चोख केले आहे.

दोन मोठमोठे सरदार प्रथम भेटीत जे शस्त्र भेट द्यायचे त्यात बिचवा पण असयाचा. त्याचा मान एक वेगळाच असतो.

संतोष चंदने, चिंचवड, पुणे

Leave a Comment