महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,700

स्वराज्य स्थापनेची बांधनी

By Discover Maharashtra Views: 3939 2 Min Read

स्वराज्य स्थापने ची बांधनी

शहाजीराजे यांनी शिवरायांना पुण्यातील शहाजीराजे यांच्या जहागिरीची व्यवस्था लावण्यासाठी इ.स.१६४२ च्या सुमारास दादोजी कोंडदेवांसह, आऊसाहेब जिजाऊ यांची व्यवस्था केली. हे जर पाहता खुप काही गोष्टींचा उलगडा होतो. दादोजी कोंडदेव हे अदिलशाही च्या मुलखातील अधिकारी होते. ते कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार होते. कर्नाटक वरुन आल्यावर व त्या आधी पाहीले असता स्वराज्य स्थापने ची बांधनी अप्रत्यक्ष पणे दिसते. त्याच बरोबर “सभासद बखर, शिवभारत, जेधे करीना” या मधे या गोष्टी सविस्तर पणे दिलेल्या आहेत. शहाजीराजे यांनी सोबत अनुभवी मंडळी दिली होती, जनु काय अनुभवी प्रधान मंडळ सोबत दिले होते. “शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्णपंथ मजुमदार, सोनोपंथ डबीर, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सरनौबत मानकोजी दहातोंडे, बाळाजी हरी मजालशी,” या सर्व व्यक्तींच्या बरोबरच, काही हत्ती, घोडे, पायदळ, पीढीजात, व विश्वासु अमात्य, विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य व अद्वीतीय कर्म करनारे दुसरे परीजन दिले असा सभासद बखर मधे उल्लेख आहे. शिवाजी महाराज ज्या जसागीरीची व्यवस्था पाहणार होते त्याची उत्तम सोय शहाजीराजे यांनी लावुन दिलेली होती. शिवाजी महाराजांना कोनती ही तह्रेने उनीव भासु नये, अडचन येवु नये व ती आल्यास तीचा परिहार करण्याची उत्तम सोय असावी असा दुहेरी हेतु या तयारीच्या पाठीमागे दिसुन येतो. शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव पुण्यास परत आल्यावर त्यांनी बारा मावळ चा बंदोबस्त केला असे सभासदांनी म्हटले आहे. बारा मावळ म्हणजे पुण्याच्या पश्चिमेला असलेली १२ खोरी. खरे तर या प्रदेशात स्वतंञ पद्धतीचे देशमुख राहत होते. या देशमुखांचे आपसात झगडे तंटे फार उठत होते. याला दादोजी कोंडदेवांनी साम दाम दंड भेद या मार्गाने वटनीवर आनुण शिवाजी महाराजांसोबत आपले इमान राखन्याचे कार्य बंगरुळ हून आल्यावर दोन तीन वर्षात केलेले दिसते. हे पाहता दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांच्या पुढिल कार्याचा पाया रचून दिला असे म्हणावयास हरकत नाही. रयतेस न्याय, अंम्मल बसवला ओसाड पुणे हरीत केला तेथे लोकवस्ती वाढवली. शेतकरी यांना शेत जमिनी कसाय दिल्या.

संदर्भग्रंथ:-
सभासद बखर, शिवभारत,
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
पृष्ठ क्र:- १२३-१२४
शककर्ते शिवराय
पृष्ठ क्र:- १६८-१६९

लेखन-माहीती संकलण
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:-हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:-हिंदवी स्वराज्य गडकोट समिती.

Leave a Comment