बिर्ला गणपती, सोमाटणे फाटा –
पुण्यातून श्री घोरवडेश्वराला जाताना सोमाटणे फाट्यावर असलेल्या टोल नाक्यावर डाव्या बाजूला एका लहान टेकडीवर दूरवरून दिसणारी गणपतीची भव्य मूर्ती आहे. बिर्ला गणपती या नावाने ती ओळखली जाते.
तिथे डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने गेल्यावर एक वाहनतळ लागतो. पायथ्यापासून या मूर्तीकडे जाण्याकरिता १७९ पायऱ्या आहेत. हि मूर्ती ७२ फूट उंच असून १८ फूट उंच आणि ५४ फूट लांब चौथऱ्यावर बसवलेली आहे. हि मूर्ती सिमेंट, लोखंड, कोंक्रीट आणि तांबे यांचा वापर करून २ वर्षात बनवली गेली. हि मूर्ती अंदाजे १००० टन वजनाची आहे. १७ जानेवारी २००९ रोजी चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयनंदजी यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पत्ता :
https://goo.gl/maps/3ToXvTAdSgTPUJjR9
आठवणी इतिहासाच्या
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल