महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,783

ब्रह्ममूर्ती, सावंतवाडी राजवाडा आणि पुराणातील ब्रह्मकथा

By Discover Maharashtra Views: 1329 2 Min Read

ब्रह्ममूर्ती, सावंतवाडी राजवाडा आणि पुराणातील ब्रह्मकथा –

सावंतवाडी राजवाड्यातील ही ब्रह्ममूर्ती नालासोपारा येथील ब्रह्ममूर्तीसोबत साधर्म्य साधताना दिसून येते. फक्त आयुधांचे क्रम बदलले आहेत. या मूर्तीत प्रदक्षिणा मार्गे पुष्प/जपमाळ, वेद, यज्ञपात्र व कमंडलू अशी आयुधे आहेत.

कूर्मपुराण: एकार्णवस्थितीत विष्णू झोपलेला असता त्याच्या नाभीतून विशाल कमल उत्पन्न झाले  त्यावेळी ब्रह्मदेवही तेथे आला व विष्णू आणि ब्रह्मा यांनी एकमेकांस तू कोण? असा प्रश्न केला. बोलणे वाढत गेले आणि विष्णूने ब्रह्मदेवाचे पोटात प्रवेश केला. तेथे त्याला ‘सदेवासुरमानुषम्’ असे त्रैलोक्य पाहून आश्चर्य वाटले व तो ब्रह्मदेवाच्या तोंडातून बाहेर पडला. त्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णूचे उदरात प्रवेश केला. त्यालाही तेथे अनेक लोक दिसले व आदि अन्ताचा पत्ता लागला नाही. त्या बरोबरच बाहेर निघावयाचे सारे मार्गही अवरुद्ध झालेले आढळले. शेवटी तो विष्णूच्या नाभिद्वारांतून बाहेर पडला व तेथून उगवलेल्या कमळातून प्रगट झाला.

दुसऱ्या एका कथेप्रमाणे तो जल आणि आकाश तत्वापासून वराहरूपाने प्रगट झाला. पुढे त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतीनी सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्मदेव साहजिकच जगाचा आजा झाला. बंगाल आणि उत्तर भारतात ब्रह्मदेवाच्या मूर्ती आजोबा म्हणून अंकित करतात.

तिसरी कथा असे सांगते की यज्ञाचे वेळी ब्रह्मदेवाने आपल्या पत्नीस पाचारण केले, पण काही कारणामुळे ती लवकर येऊ शकली नाही तेव्हा त्याने रागावून दुसरी बायको गायत्री तेथे आणून बसविली व कार्य चालू केले. साहजिकच सावित्रीस राग आला व तिने ब्रह्मदेवाला ‘अपूज्य होशील’ म्हणून शाप दिला.

लिंगपुराणातील लिंगोद्भव मूर्तीच्या कथेमध्ये ब्रह्म शिवापेक्षा खाली गेलेला दाखविला आहे शिवाय या कथेत तो खोटेही बोलताना दिसतो, शिवाचे वरचे टोक मी पाहिले, असे खोटे ब्रह्म बोलतो.

अजून एका कथेप्रमाणे ब्रह्मदेवाला पाच डोकी होती व शिवाशी त्यांचा विरोध झाल्यामुळे शंकराने त्याचे पाचवे डोके तोडले. ती कथा अशी: मेरुवर बसलेल्या ब्रह्मदेवाला एकदा मी लोककर्ता म्हणून गर्व झाला. वेदांनी शंकराचा महिमा सांगितला पण ब्रह्मदेवाला ते पटेना. तेव्हा तेथे एका महाज्योतीचा प्रादुर्भाव झाला व तिच्या ज्योतिमंडळात एक नीललोहित पुरुष प्रगट झाला.

– आकाश नलावडे

Leave a Comment