!! महाराष्ट्रात मोगघाचा वाईट अवस्था !!
असद व झुल्फीने कामबक्ष ला पकडून नजरकैदेत ठेवले व वेढ्यातून माघार घेण्यास सुरवात केली. त्यांना संताजी मोठ्या फौजेनिशी मोगल फोजीवर चालून येत आहे थोड्याच काळात संताजीने जान बीखारखान या कांजीवरम् च्या ठाणेदाराचा पूर्ण पराभव केला त्याचे सर्व लुटुन घेतले, त्याला कैद केले. व मोठी खांडणी घेऊनच त्याला सोडले. झुल्फीची परिस्थिती बिकट झाली, आणलेली संपली. भीमसेन सक्सेना लिहिते की”,मोगल सैनिक जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांकडे जात आणि पैसा देऊन धान्य घेत, पण त्यांना तेथेच अन्न शिजवून खावे लागे . छावणीत धान्य नेण्याची परवानगी मराठे देत नसत…
दक्षिणेत मोगंलाना तडाखे बसत होते व बेजार झाले होते स्वराज्यातही( महाराष्ट्र) तीच परिस्थिती होती मोगल सेनापती पैकी दिलेरखान १६८३मध्ये मध्ये मेला.. हसन अलीखान जो कोकणात १६८१मध्ये उतरला होते, तो विजापूर जिंकल्यावर मरण पावले.. रणमस्तखान ज़्याना कल्याण सिंह जिंकली तो १६१६८२ मध्ये जिंजी वेढ्यात मेला.बक्ष बहुल्लाखान जुलै १६९२मध्ये मेला, बहादुरखान खानजहान याला पंजाबच्या सुभेदारपदावरून काढून छावणीत नुसताच बसविला होता. १६९२मराठ्यांनी पन्हाळा जिंकला. हा मोगलांना चांगलाच दणका होता.
औरंगजेबाने पन्हाळा पुन्हा हस्तगत करण्यासाठी नातू मोईद्दीन ह्याला सैन्यासह पन्हाळा पाठविले. लुत्फुल्लाखान जो खटाव व अकलुजचा ठाणेदार होता. त्याला मोईद्दीनच्या मदतीला पाठविले व त्याला पालक म्हणून राहण्यासाठी सागितले. एक दीड वर्ष मोगल वेढा घालून बसले. पण किल्लावर काही परिणाम झाला नाही, रसद किल्यात खुशाली जात होती. आँक्टोबर १६९३मध्ये धनाजी जाधव जिंजीहुन परतल्यावर रामचंद्रपंत मोठया सैन्यानिशी पन्हाळा च्या वेढयावर चालून गेले ,२० आँक्टोबर पासून मराठ्यांच्या रोज चकमकी झडत होत्या. त्यांनी मराठ्यांनी पन्हाळा वर बरीच रसद व दारूगोळा पोहोचविली. त्यांनी मोगलांच्या वेढयातील मोर्चावर हल्ले केले.
तोफखान्याचा प्रमुख सबशिकतखान ह्याचा तोफखान्यातील तोफा पळविल्या. खंदक उध्वस्त केले.. मोगलांचे खूप नुकसान झाले. औरंगजेबाने सझीउद्दीन, फिरोज जंग, खान सादखान ह्यांना मदतीला पाठविले. तेव्हा मराठे निघून गेले. चिनकुलीखान व रूस्तुमखान ह्यांनी मराठे टोळयांवर हल्ले केले त्यात उलट या दोघांचे नुकसान आहे हे समजल्यावर राजपुत्र मोईद्दीनला वेढा चलिविण्यात काही अर्थ व स्वारस्य वाटेना त्याने औरंगजेबाची परवानगी न घेता आपल्या सैन्यासह वेढा सोडून निघून गेला. नातू असल्याने औरंगला काही करता आले नाही.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल