चला महाराष्ट्राचे सोनेरी वैभव परत आणुयात !
(Let’s bring back the golden glory of Maharashtra)
गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवाचे,शौर्याचे,पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार आहेत.त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास अपूर्णच.शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे मूक साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची आज आपण काय अवस्था करून ठेवली आहे ?
गड किल्ल्यांचा अभेद्यापणा ,शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान,शत्रूला जेरीस आणण्याची व संकटाच्या वेळी निसटून जाण्याची चोरवाट शत्रूला बराच काळ झुंजत ठेवण्याचे सामर्थ्य हे सर्व गुण शिवरायांनी ओळखले होते.परंतु शिवरायांच्या याच गड किल्ल्यांची दुर्दशा डोळ्यांनी पाहवत नाहीय.शिवरायांच्या शौर्याचे कर्तुत्वाचे प्रतिक असलेले किल्ले आज आपण जतन केले नाही तर त्यांचे शौर्य व्यर्थ जाईल.कालांतराने फक्त फोटोंपुरते गड किल्ल्यांचे अस्तित्व राहील.गड किल्ल्यांचे खरे वारसदार आपण आहोत त्यांची जपणूकही आपणच केली पाहिजे.गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून आपण इतिहासाला उजाळा देऊया त्याचे जतन करूयात आणि छत्रपतींच्या कार्याला मुजरा करूयात.
मागील काही वर्षात गड किल्ल्याविषयी बरीच जनजागृती झालेली आहे.प्रत्येक दुर्गप्रेमी,संस्था,प्रतिष्ठान आपापल्या परीने दुर्ग संवर्धनासाठी आपापले योगदान देत आहेत.या सर्वानाच नक्कीच अभिमान आहे.भलेही नावे वेग वेगळी असली तरी त्यांचे कार्य आणि निष्ठा एकच आहे te म्हणजे गड किल्ल्यांचा विकास आणि संवर्धन .आजही खूप सारे मावळे संघटन आणि संस्था न मिळाल्यामुळे शिवकार्यात सहभागी होऊ शकत नाहीत.त्या सर्व मावळ्यांना एक मध्यम मिळावे यासाठी सर्व गड किल्ले संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था यांना एकत्रित करण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी तसेच त्यांच्या येणाऱ्या सर्व उपक्रमाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम.