महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,41,068

भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी

By Discover Maharashtra Views: 1562 2 Min Read

भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी –

मुळशी तालुक्यातील प्रवेशद्वार अशी भूगाव व भुकुम या गावांची ओळख आहे.  भुगाव पिरंगुट यांच्या मध्ये असलेल्या  भुकुम गावाच्या शेवटी हनुमानाचे मंदिर आहे.  खालून गावा शेजारून, एक सुंदर ओढा वाहतो. याच ओढ्याच्या शेजारी शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी आपल्याला दिसते. साधारण .१८फूट रुंद तर ३२फूट लांब असलेली ही पुष्करणी मुळशी तालुक्यातील एकमेव भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी आहे.

पुष्करणी म्हणजे काय हे पाहिलं समजून घेऊ. विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.राजस्थानमधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नांव पडले आहे भुकुम गावातील पुष्करणी  मध्ये  जायला 11 पायऱ्या असून आता मध्ये एका देवळी आहे या मध्ये माऊलाई देवीचा तांदळा आहे.

पुष्करणीच्या  मध्ये एक गोमुख सुद्धा असून, या पुष्करणी कडे पाहून ती साधारण २५० ते३००वर्ष  जुनी असेल असा आंदाज येतो मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहील्यादेवी होळकर यांनी अनेक मंदीरे व पुष्करणी बांधल्या ही देखील त्यांच्याच काळातील पुष्करणी आहे . याबद्दल अजुन काही ऐतिहासिक माहिती मिळाली नाही आपणास ठाऊक असल्यास नक्की कळवावे .पुष्करणीच्या  मध्ये एक गोमुख सुद्धा असून, या पुष्करणी कडे पाहून ती साधारण २५० ते३००वर्ष  जुनी असेल असा आंदाज येतो मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहील्यादेवी होळकर यांनी अनेक मंदीरे व पुष्करणी बांधल्या ही देखील त्यांच्याच काळातील पुष्करणी आहे .

माहिती लेखन संकलन – आकाश मारणे, टीम मुळशी

Leave a Comment