श्री चक्रेश्वर महादेव मंदिर चाकण –
चक्रेश्वर महादेव मंदिर खूपच पुरातन आहे. या मंदिराचे बांधकाम हे मराठा कालीन असावे असे वाटते किंवा मराठा राजवटीत या मंदिराचे पुनर्निर्माण / जिर्णोद्धार झाला असावा. असे वाटण्याचे कारण म्हणजे मंदिरातिल शिव पिंड खूपच पुरातन आणि झीज झालेली आहे. शिवपिंडी वरील शिवलिंग हे पुणरस्थापीत असावे. मंदिर परिसरात शांडिल्य ॠषिची खूप पुरातन समाधी आहे. या मंदिराच्या बाजूला अजून एक समाधी मंदिर असून विठ्ठल रखुमाई मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर पण आहे. याच मंदिर परिसरात कांहीं चालुक्य काळातील मंदिर अवशेष व विष्णू देवतेच्या वराह व कुर्म अवतारातील खूपच सुंदर मुर्ती आहेत.(चक्रेश्वर महादेव मंदिर, चाकण)
जानकारांचे मते चाकण किल्ला परिसरात आठव्या शतकातील चालुक्य काळातील विष्णूचे दशावतार मंदिर होते. ते मंदिर पाडून मंदिराचे दगड किल्ला तटबंदी बांधकामात वापरलेली आहेत. मंदिर अवशेष वापरलेल्या खूना आजही तटबंदीत दिसून येतात. त्या दशावतार मंदिरातील राहिलेल्या दामोदर , कुर्म आणि वराह मुर्ती आहेत. दामोदर मुर्तीचे संग्रामदुर्ग किल्ल्यात मंदिर असून वराह आणि कुर्म मुर्ती चक्रेश्वर मंदिर परिसरात ठेवलेल्या आहेत.
चक्रेश्वर मंदिरासमोर एक खूपच सुंदर असी पुष्करणी आहे. पुष्करणी मधे बरेच कासव आहेत. मंदिर समिती कासवांची उत्तम देखरेख आणि जपनुक करतात असे दिसते. मंदिर खूपच सुंदर आहे पण ऑईल पेंट च्या अति वापरामुळे मंदिराचे पुरातन आणि नैसर्गिक सौंदर्य झाकाळुन गेले आहे.
Jeevan Kawade