क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग 2
क्षत्रियकुलावतंस प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग १
आज आपन महाराजांच्या न्यायदान व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थे बद्दल चर्चा करू.
महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजहितैषी कामे केली. आपल्या कारकिर्दित तत्कालीन अज्ञानी, अंधश्रद्धालु आणि रूढिग्रस्त समाजाला कार्यप्रणव करण्याची शिकस्त केली. त्यांच्या पुरोगामीत्वाने केवळ सातारा संस्थानच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक मान्यवरांस एक नवी विधायक दृष्टि दिली.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी संस्थान ची व्यवस्था अगदी उत्तम लावली होती. त्यांचे पोलिस दल एवढे उत्कृष्ट होते की बोटावर मोजन्या इतपत च गुन्हे घडले. त्यांच्या पोलिस दला बाबत ब्रिटिश अधिकारी जॉन ब्रिग्ज म्हणतो की ” महाराजांचे पोलिस दल कोणत्याही बाबतीत आमच्या पेक्षा कमी नाही”. महाराजांनी कैदयां च्या व्यवस्थेसाठी गुरुवार पेठेत ‘थोरला परज’ आणि सचिवांच्या वाड्या जवळ ‘धाकटा परज’ असे दोन तुरुंग बांधले. फौजदारी व दिवाणी न्यायालयांची स्थापना केली. अनेकदा स्वतः महाराज न्यायदानास बसत त्यास हुजूर अदालत म्हणत. हे न्यायालय अदालत वाड्या मध्ये होते.
बालपन पेशव्यांच्या कैदेत गेल्या मुळे त्यांला शिक्षण मिळू शकले नव्हते. त्यांच्या मातोश्री राजमाता आनंदीबाईसाहेब यांनी त्यांला शिक्षण दिले. आपन छत्रपती असूनही आपल्याला शिक्षण मिळाले नाही मग बहुजन समाजातील सर्व सामान्यांचे या बाबत काय हाल होत असतील या विचाराने महाराज फार अस्वस्थ झाले होते. बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी ओळखले होते. महत्वाचे म्हणजे स्त्री शिक्षणाचे महत्व त्यांस फार वाटे म्हणून त्यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि आपल्या रंगमहाल राजवाड्या मधेच शाळा सुरु केली. त्यामधे मराठी , संस्कृत, इंग्रजी, पर्शियन या भाषा शिकवल्या जात. वेदशास्त्र संपन्न आबाशास्त्री पारसनिस अध्यापनाचे काम करीत. काही सनातनी मंडलींनी शिकवन्यास नकार दिला त्यावेळी महाराजांनी आपले मित्र डॉ. मिल्ने यांच्या मार्फत तीन मिशनरी शिक्षक शिकवन्यास आणले. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्या. फक्त पुस्तकी शिक्षण नको लष्करी शिक्षण ही असावे हा महाराजांचा हट्ट असे म्हणून मुलींला लष्करी शिक्षण उपलब्ध करून दिले. असे शिक्षण घेणाऱ्यांमधे खुद्द महाराजांची कन्या राजकुमारी गोजराबाईसाहेब ही होत्या. या कार्या बद्दल तत्कालीन दर्पण (8 जून 1832) मधे म्हंटले आहे ‘ साताराच्या राजा ने आपले देशाच्या लोकांस उत्तम उदाहरण दाखवले आहे आणि त्याने आपले मुलीस लिहने वाचने शिकवले आहे. असे ऐकून मोठा संतोष झाला’.महात्मा फूलेंला ही महाराजांच्या या कार्याने प्रेरित केले असले पाहिजे.
शिक्षणा साठी महाराजांनी विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध करून दिलेली होती इतकेच काय तर ग्रंथ छापुन घेण्यासाठी महाराजांनी छापखाना सुरु केला होता. छपाईखाना सुरु करणारे बहुदा श्रीप्रतापसिंह महाराज छत्रपती पहिले राजे असावे. या छापखान्या मधे छापलेले काही ग्रंथ पुढील प्रमाणे
१. सभारंजनी- माधवराव मुन्शी
२. सभानीति
३. आय व्यय प्रकरण
४. सेवक बोधिनी
५. सिद्धांत विजय – पंडित आबा पारसनिस
यासह कित्येक मोठे आणि महत्वाचे ग्रंथ इथे छापले गेले.
खुद्द महाराजांलाही वाचनाची प्रचंड आवड़ होती म्हणून त्यांनी स्वतः के ग्रंथालय सुरु केले होते. पुढे त्यांचे ग्रंथालय त्यांचे धाकटे बंधु (जे त्यांच्या नंतर छत्रपती झाले ) छत्रपती शहाजीमहाराज (अप्पासाहेब महाराज) यांनी सांभाळले. १८४८ साली छत्रपती शहाजीमहाराज यांचे निधन झाले त्यावेळी या ग्रंथालयामधे देशोदेशी चे वर्तमान पत्रे येत. याचा फायदा मात्र ठराविक लोकांला मिळत होता. त्याचा फायदा सामान्य लोकांला मिळावा या भावनेतून आप्पासाहेब महाराजांच्या पत्नी सगुणाबाई राणीसाहेब यांनी मूळ जागेच्या इमारती सह ( जिथे राजवाड्या समोर नगारखाना होता) सामान्य रयतेसाठी खुले केले. 1853 साली या ग्रंथालयाचा जन्म झाला। हेच सध्याचे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगर वाचनालय
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या राजास माझा मानाचा मुजरा.
क्रमशः
जय शिवराय