महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,44,151

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) भाग ३

By Discover Maharashtra Views: 2606 3 Min Read

महाराजांची विकासक आणि शेतकरी तथा रयते प्रती असलेली दृष्टी

छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी सातारा राजधानी वसवल्या नंतर राजधानी शहर असल्या मुळे देशो देशीचे लोक, व्यापारी सातारा मधे राहु लागले होते. मधल्या काळात पेशव्यांनी सत्ता बळकवल्या नंतर सातारा शहरा चा विकास पूर्णपने ठप्प झाला होता. कित्येक लोक, व्यापारी सातारा सोडून गेले होते. १७५० ते १८१८ या काळात विकास पूर्णपने ठप्प झाला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी प्रथमतः शहराचा विकास हाती घेतला. सातारा सोडून गेलेले अनेक लोक व्यापारी पुन्हा सातारा कडे वळु लागले. त्यामुळे प्रतापसिंह महाराजांनी नविन राजवाडा बांधल्या नंतर तिथे संपूर्ण राजपरिवार रहावयास आले त्याच्या समोर राजपथ बांधला (३५ फुट रुंद आणि अर्धामैल लांब) आणि त्याच्या दुतर्फा तब्बल 34 एकर जागे मधे भवानी पेठ वसवली. राजपथ च्या दुतर्फा त्यांनी दुकानदारांला दुकाने थाटन्याचे आवाहन केले. पेठेच्या पाणी व्यवस्थेसाठी १९ विहिरी नव्याने खोदन्यात आल्या, २ हौद बांधले. सोबतच मल्हार पेठ, प्रतापगंज पेठ, दुर्गा पेठ, सदाशिव पेठ या पेठा वसवल्या.

शहरास पाण्याचा तूटवडा जाणवू लागला. हा तूटवडा दूर करण्यासाठी महाराजांनी यवतेश्वर येथे तलाव बांधला आणि तेथून खापरी नळाने शहरा मधे पाणी आणले. महादरे येथेही तलाव बांधला याचेही पाणी खापरी नळाने इ स १८२९ शहरात आणले. त्यासाठी जागो जागी हौद बांधले. महाबळेश्वर या पर्यटन स्थळाची स्थापना ही महाराजांनीच केली त्यावेळी त्यास माल्कम पेठ असे नाव दिले होते ( पुढे या बद्दल सविस्तर बोलुच)
आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्थित व्हावी यासाठी अनेक रस्ते बांधले त्यामधे प्रामुख्याने सातारा-मेढा- महाबळेश्वर, सातारा-पुणे यासह कित्येक रस्ते बांधून वाहतुकी मधे सुसूत्रता आणली.

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग ३

महाराजांनी अनेक वाडे ही बांधले. त्यात आपले विश्वासु सेवक नरसू काकड़े , चिटणीस, दिवान महाजने तसेच दफ्तरखाना (जिथे सध्या सिटीपोस्ट ऑफिस आहे), फरासखाना, हत्तीखाना इत्यादि इमारतीं बरोबर अठरा कारखान्यांसाठी इमारती बांधल्या. जिथे सध्या चारभिंती आहेत तिथे नजर बंगला बांधला. विविध देवस्थानांच्या मंदिरांची दुरुस्ती केली त्यामधे सज्जनगड, मंगळाई देवी मंदिर(किल्ले अजिंक्यतारा) श्रीभवानी मंदिर (किल्ले प्रतापगड) यांची नावे घेता येतील.
१८२६ साली अत्यंत देखना सुबक नविन वाडा बांधला ( जिथे सध्या श्री. छत्रपती प्रतापसिंहमहाराज विद्यालय आहे). जलमंदिर राजवाडा बांधला.

महाराज उत्तम प्रशासक, न्यायप्रिय होतेच पण त्यासोबत प्रजाहितदक्ष होते. त्यांनी आपल्या राज्यातील शेतजमिनींची पहानि केली. जमीनीची प्रतवार निश्चित केली. जमिनीच्या चतुःसीमा, जमिनी चे मालक, जमिनीचे वहिवाटदार कुळे यासर्वांच्या नोंदी केल्या. शेतसारा किती द्यावा हे जमिनी च्या प्रतिनुसार ठरवण्यात आले. शेतकऱ्यांला दिलासा मिळाला.
जाता जाता एक प्रसंग सांगावा वाटतो. १८२२ साली मोठा दुष्काळ पडला. शेतीतील पीके नाहीशी झाली. शेतकऱ्यांला मोठ्या प्रमाणात मदत करणे गरजेचे होते. खत, बियाणे पाणी या सोबतच आर्थिक मदत करने देखील गरजेचे होते. अशाकठीन समयी महाराजांनी स्वतःच्या खाजगी खर्चात कपात केली. तत्काळ एक लाख रूपये उपलब्ध केले. ज्यासेवकांचे पगार जास्त आहेत त्यांच्या पगारात ततपूर्ति कपात केली. तत्काळ वेठबिगारी ही माणूसकिला काळीमा फासनारी पद्धति बंद केली. आणि गोहत्या बंदी कायदा लागू केला.

अशा या शेतकरी कैवारी राजास माझा मानाचा मुजरा.

©️पुस्तक:- छत्रपतींच्या पाऊलखुणा
(लवकरच आपल्या भेटीला)
लेखक:- निलेश झोरे

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती भाग ४

Leave a Comment