महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,44,198

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती भाग ४

By Discover Maharashtra Views: 2636 4 Min Read

वेदोक्त पुराणोक्त प्रकरण

आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत याचा महाराजांना प्रचंड अभिमान होता. २० फेब्रुवारी १८१८ रोजी आष्ट्याच्या लढाई पेशवा हारल्या नंतर सर्वत्र पळापळ सुरु झाली अशातच ब्रिटिशांच्या एका पलटणीने महाराजांस वेढा टाकला. तेव्हा बळवंतराव चिटणीस घोड्या वरुन पायउतार झाले आणि ओरडून सांगू लागले की ‘हे श्रीमंत छत्रपती महाराज आहेत’ त्यावेळी महाराज म्हणाले होते ‘ मी लढता लढता मरेन, शस्त्र त्याग करुन जगण्यापेक्षा शिवरायांच्या वंशजाने लढुन मेलेले चांगले.’ तलवार उपसुन ते लढाईस तयार झाले. तेव्हा कर्नल प्रिंग्ले टेलय याने महाराजांला ओळखले आणि आपल्या पलटणीस लढाई थांबवण्यास सांगितले. इतर सरदार पळून जात असताना एकटे महाराज तलवार उपसुन लढाईस उभे ठाकलेले पाहुन कर्नल ही अचंबित झाला. ‘शूरा मी वंदिले’ ही भूमिका घेऊन त्याने महाराजांचा सन्मान राखला.Chatrapati Pratapsingh Part 4

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग ४

देव देश आणि धर्माची प्रतिष्ठा जपणारे महाराज बहुजन वर्गात खुप लोकप्रिय होते. समाजावर आपली कर्मकांडे लादनारे, गुलामगिरी ची व्यवस्था कायम राहावी म्हणून इच्छा करणारे काही वर्णवर्चस्ववादी महाराजांचे क्षत्रियत्व, मोठेपण मान्य करत नव्हते. ही मंडळी महाराजांला शुद्र समजत. महाराज मुंजविधी करत आहेत, अग्निहोत्र करीत आहेत. आपली कर्मे वैदिक पद्धतीने करतात, ते हिंदू धर्म बुडवित आहेत अशी तक्रार घेऊन ८ ते १० हजार वर्णवर्चस्ववादी कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडिस मुंबई चे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांला भेटायला गेले. त्याजमावाच्या नेते मंडळी ला माल्कम ने भेट दिली, त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि स्पष्ट शब्दात सांगितले ‘ छत्रपती प्रतापसिंह महाराज हिंदू धर्माचे प्रचंड अभिमानी आहेत. धार्मिक निर्णय घेण्याचे अधिकार आमचे नसून छत्रपतींचे आहेत. त्यांच्या कडेच आपण न्याय मागावा,. त्यामुळे त्या जमावाचा पुढारी नातू (ज्याला महाराजांचे दीवाण पद हवे होते पण महाराजांनी नाकारले होते) हा तोंडावर आपटला. पूर्वी पासूनच वेदोक्त- पुराणोक्त या वादाने राजघरण्याला त्रास दिला.

छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी क्षत्रियांचे धार्मिक निश्चित करुन. वेदोक्त- पुराणोक्त चा वाद संपुष्टात आणावा. छत्रपतींला ‘क्षत्रियकुलावतंस’ म्हणण्यास नकार देणाऱ्यांला धडा शिकवावा इत्यादि सारखे २४ मुद्दे निश्चित करुन त्यावर चर्चा करण्यास धर्मपरिषद महाराजांनी बोलवली. यासभेस पुण्यापासून ते बेळगाव पर्यंत चे हजारो पंडित शास्त्री जमा झाले. क्षत्रियांच्या वतीने विठ्ठल सखराम उर्फ़ आबा पारसनिस व पंडितांच्या वतीने वेदशास्त्रसंपन्न राघवाचार्य गजेंद्रगडकर यांनी आपापल्या बाजू मांडल्या. वाद विवाद झाले. आणि अखेर सभेचा निर्णयाचा दिवस उजाडला. सातारा संस्थानच नव्हे सबंध देशाचे लक्ष लागून राहिलेला दिवस उजाडला. त्यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराजांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वतः देखील सर्वांच्या संरक्षणासाठी हाती तलवार घेऊन उभे होते. पंडित सभेने क्षत्रियांचे अस्तित्व आणि त्यांचे अधिकार मान्य केले. क्षत्रियांला वेदोक्त पद्धतीने विधि करण्याचे अधिकार आहेत हे मान्य करण्यात आले. महाराजांला शुद्र म्हणणाऱ्यां ला आणि त्यांचे क्षत्रियत्व नाकारणाऱ्यांला चांगलीच चपराक बसली. महाराजांला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान होता. आपला पूर्वीचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने झाला नाही याचे त्यांला फार वाइट वाटत होते म्हणूनच त्यांनी या प्रकरणानंतर सप्टेंबर १८३८ मधे वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला.

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) (1793 ते 1847) भाग ४

महाराजांची धर्मसुधारनावादी भूमिका सर्वांला आवडली. सातारा राज्याची आणि महाराजांची किर्ती सर्वत्र वाढत होती. इंग्रज देखील महाराजांच्या कारभाराचे कौतुक करीत होते. मुंबई चा एक गव्हर्नर लॉर्ड अर्लक्लेअर होता त्याने महाराजांबद्दल लिहून ठेवले आहे ‘प्रतापसिंह महाराज तरुण, थोड़े लठ्ठ, गौर वर्णाचे आहेत. त्यांचे कपाळ रुंद असून डोळ्यात तीव्र तेज आहे. लोकांस विद्यादान देण्याची त्यांस मोठी हौस असून त्यासाठी त्यांनी सातारा येथे पाठशाळा सुरुकेली आहे. त्यात मराठी, संस्कृत, इंग्लिश, पर्शियन भाषा शिकवल्या जातात. राजा राममोहन रॉय या सुप्रसिद्ध सुधारकाची हा राजा मोठी वाखाणणी करतो.

छत्रपती शिवरायांच्या या कर्तव्यदक्ष वंशजास माझा मानाचा मुजरा

©️पुस्तक:- छत्रपतींच्या पाऊलखुणा
(लवकरच आपल्या भेटीला)
लेखक:- निलेश झोरे
@श्रीशिवसंस्कृती दुर्ग संवर्धन परिवार सातारा
फोटो:- सातारा शहराचे ऐतिहासि दुर्मीळ फोटो.

क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज प्रतापसिंह छत्रपती (थोरले) भाग ३

Leave a Comment