स्वराज्याचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान) –
अहमदनगरमध्ये दिल्लीगेटच्या पुढे आल्यावर अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यु आर्टस् कॉमर्स ऑड सायन्स कॉलेज समोर रस्त्याच्या पुर्व बाजुस “हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (कोल्हापुर गादी)” यांचे स्मारक आहे . स्मारक सुंदर आहे त्यामध्ये पुर्णाकृती स्वराज्याचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा पुतळा, समाधी स्थळ आणि वाचनालय आहे .
छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव राजेभोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले .चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला .महाराज उंच्चपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते .२३ऑक्टोंबर १८७१ रोजी विजयादशमीच्या (दसरा) शुभ मुहूर्ताला त्यांचा दत्तक विधी संपन्न झाला .राज्यभिषेक करुन चौथे शिवाजी महाराज कोल्हापुर राज्यांचे छत्रपती झाले .महाराजांना घोडेस्वारी ,शस्त्र-शास्त्र व राज्यकारभारत विशेष रुची होती .त्यांचे मराठी ,हिंदी,ईंग्रजी ,मोडी(लिपी) भाषेवर प्रभुत्व होते .ब्रिटीशाकडुन होणारे जुलुम छत्रपतींनी पाहीले होते .त्याबाबत महाराजांकडे माहीती येत होती .आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत व त्यांच्या पुण्याईने हे राज्य मिळाले आहे .रयतेच्या कल्याणाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे या भुमिकेतुन सतत कार्यरत राहीले .
इ.स.१८७६ साली भारतात फार मोठा दुष्काळ पडला होता .छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी कोल्हापुर संस्थानात दुष्काळ निवारन यंत्रणा राबवली ,दुष्काळावर मात केली .छत्रपतींची ही कामगीरी पाहुण जानेवारी १८७७ मध्ये ब्रिटिश साम्राज्याची महाराणी व्हिक्टोरीया हिने छत्रपतीना ‘नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडीया’ हा किताब दिला .पण पुढे काही दिवसांनी छत्रपतींनी हा संन्मान नाकारला .पुढे इ.स.१८७८ साली श्रीमंत वाघोजीराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह संपन्न झाला .छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापुर संस्थानात खुप मोलाचे कार्य केले .रंकाळा तलाव निर्मीती कार्यास सुरवात , पुल उभारणी,रस्ते,नवीन राजवाडा,शासकीय इमारती ,कचेर्या ,टाऊन हॉल आदी. वास्तुची उभारणी याच काळात झाली.तेच आता कोल्हापुर शहराचे वैभव आहे .
महाराजांनी ईग्रजाविरुध्द बंड पुकारले .जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी म्हणुन महादेव वा.बर्वे याची नेमनुक केली .बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी ध्रुत व्यक्ती होता त्याने स्वजातीचे शंभ्भरच्यावर लोक प्रशासनात घुसवले .त्याने ईग्रजांच्या मदतीने कटकारस्थानाला सुरवात केली .महाराजांना वेड लागले अशी आफवा बर्वे पसरवु लागला .महाराज एकटेच लढत होते त्यांनी हार मानली नव्हती .ईग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतत बंदीस्त केले नंतर १९ जुन १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणेमार्गानी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर हालवले किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात ठेवले .कोणीही ओळखीचा चेहरा दिसनार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली .महाराजावर मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता.आडदांड सोल्जर ग्रीन याची महाराजांचा आंगरक्षक म्हणुन नेमनुक केली
ग्रीन हा आंगरक्षक नसुन भक्षक होता .तो महाराजांना मानशीक छळ करु लागला .एके दिवशी महाराजांनी ग्रीन वर झडप टाकली आणि ग्रीनला उचलुन आपटले.नरपशु आडदांड ग्रीनने महाराज्याच्या पोटावर जबरदस्त प्रहार केला .महाराज जमीनीवर कोसळले .महाराजांचा सेवक मल्हारीने धाव घेतली.महाराजांचे डोके आपल्या मांडीवर घेतले .महाराजांनी मल्हारीच्या मांडीवरच “जगदंब जगदंब” म्हणत प्राण सोडले, तो दिवस होता २५ दिसेंबर १८८३ .महाराजांवर अंतसंस्कार दिल्लीगेटपुढील परिसरात करण्यात आले .कोल्हापुरचे कोणीही उपस्थीत नव्हते ,महाराजांना अग्नी परशुराम ऊमाजी भोसले यांनी दिली .त्याठिकाणी समाधी आहे, आता भव्या सुंदर स्मारक आहे .
पुढे राजर्षि शाहु महाराज करवीर संस्थानचे छत्रपती झाले .राजर्षी शाहु महाराजांनी अहमदनगरला येऊण समाधीचे दर्शन घेतले .आपल्या वडीलांची स्मृती चिरंतन राहावी म्हणुण त्यांच्या नावानी वस्तीगृह सुरु करण्याची त्यांची प्रबळ ईच्छा होती ,त्याची ईच्छा व प्रेरणेतुन पुढे १९१४ रोजी श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डींग हाऊस अहमदनगर या नावानी वस्तीगृह सुरु झाले .त्यातुनच पुढे जानेवारी १९१८ रोजी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षनिक संस्थेची स्थापना झाली .
“चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान) यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मराठी मुजरा”
-शिवराज भोसले