महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,683

छत्रपती राजाराम महाराज, भाग २ | समरभूमीचे सनद मालक

Views: 3859
4 Min Read

छत्रपती राजाराम महाराज, भाग २ – समरभूमीचे सनद मालक

बारा मावळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी
छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान याच भूमीच्या पायथ्याशी झाले ,
सरलष्कर शहाजीराजे यांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रयत्नाचा साक्षीदार असलेली भूमी ,
छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना स्वराज्य माता म्हणून येथील रयतेने आपले प्राण हिंदवी स्वराज्याच्या सेवेसाठी वेचलेली भूमी म्हणजे मावळ प्रदेश हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी याच बारामावळ मधील होय.

सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्यासाठी घराघरातुन वीर दौडले ती मावळ भूमी होय।।
हिदंवी स्वराज्य संकल्पना मांडली व ती प्रत्यक्षात सत्यता उतरवण्यासाठी बलिदान देणार्याया भूमीबदल कितीही लिहिले तर कमीच आहे याबद्दल पुन्हा कधी तरी नक्कीच लिहू , या मावळ भुमीशी छत्रपती घरण्याचा आणखी एक संबंध आहे याकडे दुर्लक्ष केले गेले तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांची जन्मभूमी म्हणजे मावळ प्रदेशतील किल्ला राजगड येथील होय
तसेच याचा मावळभूमीतील किल्ले सिंहगड वर छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधन झाले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा बिमोड केल्याशिवाय डोक्यावर कुमाँश ( तुर्की घराण्यातील राजमुकुट) घालणार नाही अशी शपथ घेणारा औरंगजेब याची शपथ. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान नंतर पूर्ण झाले.
आता मराठ्यांचे साम्राज्य लवकरच नाश करू असा विचार औरंगजेब बादशहा याच्या मनात होता पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या संयमी व शांत नेतृत्व खाली मराठे पून्हा एकदा औरंगजेबाला भारी पडले. छत्रपती राजाराम महाराजांनी राजधानी जिंजीच्या किल्लावर दक्षिणेत स्थापन करून मोगलांना पहिला धक्का दिला.

सरसेनापती संताजी घोरपडे यांचे आक्रमक नेतृत्वात मराठे साम्राज्या समोर अनेक मोगली सरदारांना पराभवाचा धक्का दिला तो छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली होय.

धनाजी जाधव व हक्मुपन्हा रामचंदपंत अमात्य यांनी स्वराज्य तील गडकोट पुन्हा काबीज केली स्वराज्य रक्षण केले तेही छत्रपती राजाराम महाराज यांच्या कुशल मार्गदर्शन खाली होय.

समकालीन उपलब्ध कागदपत्रे तून आढळून येत की एकटया जिंजी किल्ल्याचा वेढा ८ वर्षे चालला याचा एकूण खर्च प्रचंड झाला तसेच एखाद्या किल्ला वरील सर्वात जास्त काळ वेढा जर मोगली सैन्याचा पडला असेल तर छत्रपती राजाराम महाराज असलेल्या जिंजीच्या या किल्ल्यावर होय।।

छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्व मोगलांना किती भारी पडले याचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाना नंतर पण औरंगजेब यांनी आपल्या डोक्यावर कुमाँश घालणं अशक्य झाले यावरून स्पष्ट होते
छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात लढाई ही हिंदवी स्वराज्य विरोधी मोगल अशी न राहता ती स्वराज्यतील रयतेच्या विरोधी मोगल अशी लाढली गेली आहे असेच म्हणावे लागेल ?

छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात आले.
नंतर मराठ्यांचा फौजा छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र बालशाहू व महाराणी येसूबाई, माँसाहेब महाराणी सकवारबाई साहेब व छत्रपती घराण्यातील औरंगजेब याच्या कैदीतील शाही परिवार यांच्या सुटका करण्यासाठी सिहंगड येथे एकत्र आले पण ९वर्षे सतत धूमीधूमीत लढाई यामुळे किल्ला सिंहगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधन झाले
ते याच मावळभूतीतील किल्लावर होय.

शहाजीचा नातु व शिवाजीचा मुलगा रामजी उर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यू नंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखवले – मिर्झा मुहंमद.
राजनिती धुरंधर, मुत्सद्दी छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले ती तारीख होती 3 मार्च 1700.
चैत्र कृष्णा नवमी
विक्रम संवत् रोजी आपल्या हयातीत महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब या सिहंगड किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजयांच्या स्मृतिदिनानिमित्त नियमित येत असल्याचे नोंद ढमढेरे घराण्यातील कागदपत्रांवरून दिसून येत कारण तळेगाव च्या ढमढेरे घराण्यातील खडकवाडी घराण्यात छत्रपती घराण्याकडून नियमितपणे पूजा करण्यासाठी इनाम जमीन देऊन महाराणी ताराबाई माँसाहेब यांना सोयी केली आहे याचा कागदपत्रे उपलब्ध आहेत
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.
Credit – संतोष झिपरे.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य .

Leave a Comment