महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,753

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३५

By Discover Maharashtra Views: 7267 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३५…

छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत! भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असाच जागता राहावा!!’

मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दबतीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्य्याची फरसबंदी सोडून आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ

झालेल्या राजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला ‘सूर्व्या’ आपल्या कुलाची शान राखण्यासाठी

आपल्या सोन-सतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला! मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली.

देहझीज सोसलेल्या सोनोपंत डबीरांचीही सुवर्णतुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली, जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गर्जत होता –

“दे दा न सुटे गिऱ्हाण! दे दा न सुटे गिऱ्हाण!!”

तो संतोषल्या मनामनांचा घोष-गजर कानांवर घेत-घेत राजे, शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांडचोळणा असलेले उघडे-सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या पाटीएवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुषश्रेष्ठ, ग्रास पडू घातलेल्या सूर्याला, कृष्णेच्या नितळ पाण्याने भावओंजळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेले

शंभूराजे महाराजसाहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एकनजर पाहत

तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेणे महाबळेश्वर सोडून उताराला लागले जिजाबाईच्या मेण्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्यातरी विचारात हरवल्यागत

दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, “थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही

चुकलं….”

“नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे!”

जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत, लांबट डोळे हरवल्यासारखे झाले.

“कसली तुला मासाहेब?”

“त्याला कैक सालं गुदरली. तुमचे थोरले महाराजसाहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बट्ष्याची तुला करण्याची इच्छा झाली. पण एवढा थोर बच्चा जोखावा कसा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना!”

“मग?” बाळराजांचे कुतूहल वाढले.

“तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांनी पुढं होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढविण्यात आला. त्या

वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड-धोंडे नावेत चढविले. आणि त्या दगडांच्या भाराइतकं

सोनं-नाणं दान करण्यात आलं! तेव्हापासून सारी रयत त्या नांगरगावास ‘तुळापूर’ म्हणू लागली.”

शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बज्ष्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या

डोळ्यांसमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे – “इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली

थोरली नाव आणि त्या नावेत चढविलेला हत्तीचा भलामोठा बच्चा!’

▶ महाबळेश्वराहून भोसलेमंडळ राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता, पण ते राजगड सोडू शकत नव्हते. कारण शहाजीराजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकरभटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकरभटांनी गरुडपुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली.

स्रान करून पेहराव चढविलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईच्या खासेमहालात दर्शनासाठी आले. जिजाऊसाहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या! उदास आणि अचल. स्वतःतच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजीराजांच्या तडफदार, वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन तगाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की, सुन्न आणि निसूर होत

राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊसाहेबांनी आपली मान वर उठविली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत, जिजाऊ स्वत:शीच बोलल्यागत म्हणाल्या – “नको बाळराजे, आज तरी नको!!”

खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, “पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब… कानंद नदीच्या तीरावर जात आहोत….”

“या,” म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या.

त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की, आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले

नाही? बाळराजांचे काही चुकले तर नाही ना? राजांना उत्तर सापडत नव्हते

गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वत:ला म्हणत होत्या, “शंभूबाळ, तुम्ही – तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखे दिसता!! थेट आमच्या स्वारीसारखे!’

राजांनी शहाजीराजांच्या वर्षश्राद्वाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले.

“आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत?” शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आक्रशीत राजांनी

बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले, “गेल्या पिढ्या त्याने उद्धरून जातात बाळराजे! त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते.” राजांनी

शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तटसरनौबत सिदोजीरावांनी

पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली, “खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत. पेश होण्याची आज्ञा मागतात.” सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आटठ्यांचे जाळे दाटले. धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, “माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना.”

बाळराजांच्यासह राजे सदरमाचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदरबैठकीवर बसले. बसता बसताच हातखूण करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एकेक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदरचौकाबाहेर पडले. राजांच्यासमोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता.

▶ “बोला नाईक…” राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभूबाळांच्या पायांवर नजर जोडून बहिर्जीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली –

“धनी, जयसिंग मिरजा राजा तीस हजार स्वार, बराबर दिलेरखान, पाच हजार पठाण अशी मातबर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय.

जागजागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या!” बहिर्जींचा ऊर कोंदाटला.

ती खबर ऐकताच राजे सदरबैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली.

आपल्या सालगिराला – वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते.

एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा, काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही, यावर सख्त नजर ठेवण्यासाठी दिलेरखान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता.

बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागलीच स्वत:ला सावरून ते म्हणाले, “बहिर्जी, दूरची धावणी झाली. काही खाऊन घ्या. या!” बहिर्जी मुजरा करून निघून गेला.

विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बालेकिल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या

धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली.

मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून दोन मावळ्यांनी त्या वाकानं आगटी तयार केली. आगटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले. आणि राजांना भुयारवाट दाखविण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले!! पलोत्याच्या धूसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या.

राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा, असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच

राजांना विचारले, “महाराजसाहेब, हे भुयार संपणार केव्हा?” बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला, “महाराजसाहेब, हे भुयार संपणार केव्हा?”

त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, “शंभूबाळ, आमच्या मागून चालते या!! भुयारं कधीच संपत नसतात.

चाल कधीच थांबत नसते!!” राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले, “शंभूबाळ, आमच्या मागून चालते या!!…” आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाबरहुकूम त्यांचा भोसलाई फर्जद शंभो मागून चालू लागला!!

राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले, नेहमीप्रमाणे. बाळराजांना सराव देण्यासाठी फरीगदक्‍्याच्या मैदानात, कमर कसलेले गोमाजीबाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मांडचोळणा कचला होता. बुरणूस भरलेली, चामड्याची खोळ असलेली थाळीएवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील दीडहात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

1 Comment