महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,663

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०४

Views: 3904
6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०४…

निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले – “…ज्येष्ठ शुध द्वादशेस, गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सूनबाईस पुत्ररत्न प्राप्त जाहले. जगदंबेच्या आशीर्वादे करोन, आम्ही “थोरल्या आऊ ‘ जाहलो. ”

त्या बोलांनी राजांचे मन न्हाऊन निघाले. धावणीचा शिणोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप.. सप..सप.. करीत, टपटपीत पाणथेंबाची टिपरी घुमवीत वळिवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली.

हां-हां म्हणता राजांच्यासह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले! राजांच्या टोपावरची, दाढीवरची तांबडमाती वळिवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोतीथेंबांनी घेतली!! वळीवधारांत न्हाऊन निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेकपात्रातून वर्षणाऱ्या
जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे, तसे ते रूप होते. सह्याद्रीच्या शिवाचे! –

पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लालमहालात पडला. या लालमहालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या!

उमर कवळिकीची असताना याच लालमहालाच्या उंबरठ्यावरचे माथाभरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्या वेळी “एवढं भलंमोठं माप यांना दिसलं कसं नाही? याचं राजांना हसू आलं होतं! आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं.

रायगडावर सईबाईंच्या महालात ही लग्नातील आठवण चिराखदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती.

त्या आठवणी मनात घोळवीत राजे लालमहालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भोवतीचे छोटेखानी पुणे न्याहाळले. केदारवेस, कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटेखानी पुणे दुरडीतल्या दह्याच्या लोटक्‍्यासारखे दिसत होते! ते बघता-बघता राजांना पंधरा सालांपूर्वीचा काळ आठवला.

“पंधरा वर्षांपूर्वी हे सगळं गावठाण तसनस झालं होतं. त्याचं सुरूरपण सुकून गेलं होतं. या बेचिराख मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला! इथंच
आमच्या मनसुब्याला श्रीगणेशाचा शुभशकून सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं! !

त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले – श्रींच्या गोमट्या राज्याची आणभाक आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात येश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले. आजवर आऊसाहेबांच्या दोन चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं दोन हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा!

प्रसक्नशांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला; आणि राजे महालाच्या सदरेवर आले.

माणकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली

तांबड्या कुम्मैत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून माणकोजींनी राजांची लाडकी, काळ्याभोर भोर रंगाची ‘कृष्णा ‘ घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकाला भिडविला. विला. रिकिबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घेतली; तेव्हा राजांच्या ओठांतून शब्द निसटले – “सरनौबत, विघ्चहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू! ”

“जी!” माणकोजींनी पगडी डोलवली.

माणकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेशदर्शनासाठी धिम्या चालीने निघाले.

गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडेतुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती! राजे आपल्या “बाळराजां “चं आणि त्यांचे साथीदार आपल्या “धाकल्या
धन्या? चं चित्र कल्पनेनेच स्वत:शी रेखाटीत होते!

पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्याची वादी त्यांनी मुठीत पकडली. ‘जय भवानी ! असे
पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले.

बालेकिल्ल्याच्या सदरदरवाजातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोहोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एकवार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात
पसरलेल्या पुरंदरावर टेहेळती नजर फिरवली. आणि झपाझप कदम उचलीत, झडणारे मुजरे आपलेसे करीत, ते थेट दरुणीमहालाकडे चालले.

दरुणीमहालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायांतील बाकदार मोजड्या उतरल्या आणि समया तेवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या हसमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या
गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात तीन वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच पाच पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण
शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली

“आम्हाला वाटलं, बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलूखगिरीत राहतं की नाही कोण जाणे!” म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठविले. शांतपणे त्या सईबाईच्या मंचकाजवळ काजवळ गेल्या. “सूनबाई !” म्हणून
त्यांनी एक हळुवार साद घातली. सईबाईनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या. “राहू दे!” म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या, चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या,

“तुमची स्वारी गडावर आली. जागत्या राहा!”

क्रमशः………..!

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment